व्यवस्थापनाची तत्वे हे पुस्तक विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्रातील आधुनिक संकल्पना, धोरणात्मक दृष्टिकोन, जागतिक व्यवस्थापन पद्धती, नैतिकता, नेतृत्व, डिजिटल व शाश्वत व्यवस्थापन यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरेल. विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात सैद्धांतिक माहितीबरोबरच व्यावहारिक दृष्टिकोन, उदाहरणे, तक्ते आणि आकृत्यांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा केला आहे.
पुस्तकात धोरणात्मक व्यवस्थापन, नावीन्य आणि बदल, जागतिक व आंतरसंस्कृती व्यवस्थापन, व्यावसायिक नैतिकता व कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कार्यक्षमता व नेतृत्व तसेच डिजिटल व शाश्वत व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. व्यवस्थापनातील नैतिकता, पारदर्शकता, जबाबदारी, नेतृत्वशैली, भावनिक बुद्धिमत्ता, कर्मचारी विकास, कोचिंग व मेंटॉरिंग यांसारख्या घटकांचा अभ्यास विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक जीवनात निश्चितच उपयोगी ठरेल.
या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्रातील बदलत्या प्रवाहांची जाणीव होईल, तसेच जागतिकीकरणाच्या युगात आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास साधता येईल. विषयाचे विवेचन शास्त्रशुद्ध, मुद्देसूद आणि सुबोध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
1. धोरणात्मक व्यवस्थापन
1.1 धोरणाचे अर्थ व महत्त्व
1.1.1 परिचय
1.1.2 धोरण (Strategy) संकल्पना
1.1.3 धोरण - व्याख्या
1.1.4 धोरणात्मक व्यवस्थापनाची व्याख्या
1.1.5 धोरणात्मक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये / गुणधर्म
1.1.6 धोरणात्मक व्यवस्थापनाची गरज व महत्त्व
1.1.7 धोरण (Strategy) तयार करण्याच्या दृष्टिकोन
1.2 धोरणाची पातळी आणि धोरणात्मक व्यवस्थापन : कॉर्पेारेट, व्यवसाय, कार्यात्मक
1.3 पर्यावरणीय विश्लेषण आणि SWOT
1.3.1 पर्यावरणीय विश्लेषण (Environmental Scanning)
1.3.2 SWOT विश्लेषण
1.4 स्पर्धात्मक विश्लेषण (पोर्टरचे पाच शक्ती मॉडेल)
1.5 धोरणात्मक आघाड्या आणि विलिनीकरण
1.5.1 धोरणात्मक आघाड्या
1.5.2 विलिनीकरण
2. नावीन्य आणि बदल
2.1 उत्पादन नावीन्य
2.2 प्रक्रिया नावीन्य
2.3 व्यवसाय मॉडेल नावीन्य
3. जागतिक आणि आंतर संस्कृती व्यवस्थापन
3.1 जागतिकीकरण आणि व्यवस्थापन पद्धती
3.2 आंतर संस्कृती नेतृत्व
3.3 जागतिक संघटनात्मक रचना
3.4 हॉफस्टेडेचे सांस्कृतिक परिमाण सिद्धांत
3.5 जागतिक व आंतरराष्ट्रीय टीमचे व्यवस्थापन
4. व्यावसायिक नैतिकता आणि कॉर्पेारेट गव्हर्नन्स
4.1 नैतिकता म्हणजे काय?
4.1.1 व्यावसायिक नैतिकता (अर्थ)
4.2 नैतिक निर्णय घेण्याची पद्धती
4.3 कॉर्पेारेट गव्हर्नन्स म्हणजे काय?
4.3.1 कॉर्पेारेट गव्हर्नन्सचे फायदे
4.4 कॉर्पेारेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) आणि पर्यावरण, सामाजिक आणि गव्हर्नन्स (ESG)
4.5 नैतिक नेतृत्व, पारदर्शकता आणि जबाबदारी
5. कार्यक्षमता आणि नेतृत्व
5.1 प्रस्तावना
5.2 कार्यक्षमता व्यवस्थापन प्रणाली
5.2.1. कार्यक्षमता मूल्यांकनापासून कार्यक्षमता व्यवस्थापनाकडे
5.2.2 कार्यक्षमता व्यवस्थापन प्रणालीचा अर्थ
5.2.3 व्याख्या
5.2.4 कार्यक्षमता व्यवस्थापन चक्र
5.2.5 कार्यक्षमता व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये
5.2.6 कार्यक्षमता व्यवस्थापनाचे उद्दिष्टे
5.2.7 कार्यक्षमता व्यवस्थापनाचे तत्त्वे
5.3 मुख्य कार्यक्षमता निर्देशक आणि उद्दिष्टे व प्रमुख निकाल (OKRs)
5.3.1 मुख्य कार्यक्षमता निर्देशक (KPIs)
5.3.3 KPIs चे प्रकार
5.3.4 KPIs चे फायदे
5.3.5 Key Performance Indicators (KPIs) चे मर्यादा
5.3.6 उद्दिष्टे आणि मुख्य निकाल
5.3.7 OKRs चे उत्पत्ती आणि महत्त्व
5.3.8. ज्या संस्थांमध्ये OKRs विशेषतः उपयुक्त ठरतात
5.3.9. OKRs ची रचना
5.3.10 KPI आणि OKR : मुख्य फरक आणि उपयोग
5.3.11 KPIs विरुद्ध OKRs : कधी वापरावे
5.4 अभिप्राय आणि कामगिरी मूल्यांकन पद्धती
5.4.1 कामगिरी मूल्यांकनाचे अर्थ
5.4.2 कामगिरी मूल्यांकन पद्धती
5.5 नेतृत्व शैली आणि भावनिक बुद्धिमत्ता
5.5.1 नेतृत्व शैली
5.5.2 अर्थ आणि संकल्पना
5.5.3 नेतृत्व शैलींचे प्रकार
5.5.4 नेतृत्व शैलींची तुलना
5.5.5 भावनिक बुद्धिमत्ता
5.5.6 नेतृत्वात भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व
5.5.7. नेतृत्वशैली आणि भावनिक बुद्धिमत्ता : संबंध
5.5.8. संस्थांमध्ये लागूकरण
5.5.9. आव्हाने आणि विकास
5.6 कोचिंग, मार्गदर्शन आणि कर्मचारी विकास
5.6.1 कर्मचारी विकास
5.6.2 कोचिंग
5.6.3 मेंटॉरिंग (मार्गदर्शन)
5.6.4 कोचिंग, मेंटॉरिंग आणि विकास यांचे एकत्रीकरण
5.6.5 कर्मचारी विकासातील आव्हाने
5.6.6 सर्वेात्तम पद्धती आणि धोरणे
6. डिजिटल आणि शाश्वत व्यवस्थापन
6.1 व्यावसायिक कार्यांमध्ये डिजिटल साधनांचा वापर
6.2 व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन
6.3 शाश्वत व्यवस्थापन पद्धती
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
एस.वाय.बी.कॉम. (सत्र 4) साठी नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त