व्यापार आणि वाहतूक भूगोल

Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00
(-9%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373443614
Year: 2025
Pages: 46

भूगोलातील व्यापार आणि वाहतूक या विषयावर आधारित हे पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सुधारीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तयार केलेले आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी हे उपयुक्त ठरते. स्पर्धा परीक्षेतील विद्याथ, संशोधक, प्राध्यापक आणि पर्यटकांसाठी हे मार्गदर्शक पुस्तक आहे.
या ग्रंथात व्यापारी भूगोलाचा परिचय, त्याचे अर्थ, व्याप्ती आणि विविध घटकांचा अभ्यास सविस्तरपणे केला आहे. नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि तांत्रिक घटकांचा व्यापारावर होणारा परिणाम स्पष्ट केला आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रकार तसेच सिद्धांत यांचे विवेचन केले आहे.
वाहतूक भूगोल विभागात जमिनीवरील, जलमार्ग, हवाई आणि पाईपलाइन वाहतुकीचे प्रकार, त्यांचे महत्त्व आणि देशाच्या आर्थिक विकासातील भूमिका यांचे सखोल विश्लेषण केले आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक संदर्भ, प्राध्यापकांना अध्यापनासाठी मार्गदर्शन आणि वाचकांना विषयाची सखोल समज देणारे आहे. सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम असलेले हे पुस्तक महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी एक विश्वासार्ह संदर्भग्रंथ ठरेल.

1. व्यापारी भूगोल परिचय
(Introduction to Geography of Trade)
1.1 व्यापारी भूगोल परिचय - अर्थ, व्याख्या, व्याप्ती
(Introduction: Meaning, Definition, Nature and Scope of Trade)
1.2 व्यापारावर परिणाम करणारे घटक (Factors Affecting on Trade)
1.2.1 नैसर्गिक अथवा भौगोलिक घटक
(Natural or Geographical Factor)
1.2.2 आर्थिक घटक (Economic factors)
1.2.3 सामाजिक व सांस्कृतिक घटक (Socio-Cultural Factors)
1.3.4 राजकीय घटक (Political factors)
1.3.5 तांत्रिक घटक (Technical Factors)
1.3 व्यापाराचे सिद्धांत (Theories of Trade)
1.3.1 आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याचा रिकाडियन सिद्धांत
(Ricardian theory of International Trade)
1.4 व्यापाराचे प्रकार (Types of Trade)
1.4.1 स्थानिक व्यापार (Local Trade)
1.4.2 राष्ट्रीय व्यापार (National Trade)
1.4.3 आंतरराष्ट्रीय व्यापार (International Trade)

2. वाहतूक भूगोल
(Geography of Transport)
2.1 वाहतूक भूगोल- अर्थ, व्याख्या आणि वाहतूकीचे महत्त्व
(Introduction: Meaning and Definition and Significance of Transport)
2.2 वाहतुकीवर परिणाम करणारे प्राकृतिक घटक
(Physical Factors Affecting Transportation)
2.3 वाहतुकीचे प्रकार (अर्थ आणि प्रकार)
(Types of transportation - Meaning and Types)
2.3.1 जमीन वाहतूक (Land Transport)
2.3.2 जल वाहतूक (Water Transport)
2.3.3 हवाई वाहतूक (Air Transport)
2.3.4 पाईपलाइन वाहतूक (Pipeline Transport)
2.4 देशाच्या आर्थिक विकासात वाहतुकीची भूमिका
(Role of Transport in the Development)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - भूगोल (सत्र 4) (DSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!