आजच्या जागतिकीकरणाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात वित्तीय साक्षरता ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक जीवनकौशल्य बनले आहे. पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, बचत व गुंतवणुकीचे तंत्र कसे आत्मसात करावे, डिजिटल युगात सुरक्षित व्यवहार कसे करावे यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक ठरते. पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील मूलभूत घटक असून त्याचा योग्य वापर, नियोजन आणि व्यवस्थापन न झाल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वित्तीय साक्षरता म्हणजे फक्त आर्थिक व्यवहारांची माहिती नव्हे तर उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, विमा, कर्ज व्यवस्थापन आणि निवृत्ती नियोजन यांचा अभ्यास होय.
या पुस्तकाद्वारे वाचकांना वित्तीय साक्षरतेचा अर्थ, बँक खात्यांचे प्रकार, बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा, लघुवित्तीय संस्था, डिजिटल फायनान्स, गुंतवणूक, कर्जाचे प्रकार, बचत-गुंतवणुकीतील जोखीम आणि जोखमीचे व्यवस्थापन, विमा, पेन्शन इत्यादींची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे.
हे पुस्तक सर्व विद्यापीठांसाठी लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) नुसार सुधारित अभ्यासक्रमांशी सुसंगत आहे. त्यामुळे अर्थशास्त्र विषयाचे विद्याथ, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्याथ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
आधुनिक काळात वित्तीय साक्षरतेचे ज्ञान अभ्यासापुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीसाठी व गुंतवणुकीसाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमाबरोबर प्रत्यक्ष आयुष्यातही उपयोगी ठरेल, असा विश्वास आहे.
1. वित्तीय साक्षरता
(Financial Literacy)
1.1 वित्तीय साक्षरता : अर्थ, महत्त्व आणि घटक
(Financial Literacy : Meaning, Importance and Components of Financial Literacy)
1.2 बँकखात्यांचे प्रकार, KYC साठीचे मानदंड आणि बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा
(Types of Bank Accounts, KYC Norms and Services offered by Banks)
1.3 लघु वित्तीय संस्था : स्वरूप आणि कार्ये
(Small Financial Institutions: Nature Functions) :
1.4 डिजिटल फायनान्स अर्थ, फायदे, फसवणूक आणि फसवणूक टाळण्यासाठी घ्या खबरदारी
(Digital Finance : Meaning, Benefits, Frauds Precautions in Digital Finance)
2. वित्तीय सेवा
(Financial Services)
2.1 बचत : अर्थ, महत्त्व, प्रकार आणि व्याजदर
(Saving: Meaning Importance, Types of Saving and Rates of Interest)
2.2 गुंतवणूक : अर्थ, महत्त्व, गुंतवणूक क्षेत्र आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन
(Investment : Meaning Importance, Areas of Investment and Portfolio Management)
2.3 कर्जाचे प्रकार, व्याजदर आणि CIBIL गुणांकण
(Types of Loans, Interest Rates CIBIL Score)
2.4 बचत आणि गुंतवणुकीतील जोखीम आणि जोखमीचे व्यवस्थापन
(Risk involved in Saving & Investments and Its Management)
2.5 घरगुती वित्त-आर्थिक उद्दिष्टे आणि अर्थसंकल्प
(Household Finance: Financial Goals, Budget)
2.6 वृद्धापकाळातील आर्थिक तरतुद आणि पेन्शन योजनांची तरतुद
(Provision of Old Age Finance, Pension Schemes)
2.7 विमा : अर्थ आणि महत्व, विम्याचे प्रकार
(Insurance: Meaning Importance, Types of Insurance: Health, Life, General, Term, Crop)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
द्वितीय वर्ष - अर्थशास्त्र (सत्र 3) (VSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक