विज्ञान : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास

Rs. 158.00
Rs. 175.00
Rs. 158.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373446301
Year: 2026
Pages: 164

विज्ञान : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक आधुनिक शालेय शिक्षणातील विज्ञान विषयाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक सर्वसमावेशक ग्रंथ आहे. विज्ञान शिक्षणाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारशक्ती, निरीक्षण कौशल्य, प्रयोगशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. या दृष्टीने विज्ञान अभ्यासक्रमाची रचना व अध्यापनशास्त्रीय मांडणी प्रभावी असणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.
या ग्रंथात विज्ञान अध्यापनाच्या विविध पद्धती, प्रयोगशाळा तंत्र, क्षेत्रभेटी, स्वयंशोधन पद्धती, तसेच अध्यापन प्रतिमानांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (खउढ) वापर, प्रात्यक्षिके, घटक चाचण्या, नैदानिक चाचण्या आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यांचा विज्ञान शिक्षणातील उपयोग स्पष्ट करण्यात आला आहे. याशिवाय विज्ञान शिक्षकाची भूमिका, व्यावसायिक विकास, पर्यावरण जागृती आणि शाश्वत विकासातील योगदान यांचा विचार केला आहे.
पुस्तकात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भूविज्ञान यांचा मूलभूत आशय सोप्या भाषेत मांडला आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन अध्यापन नियोजन, पाठयोजना तयार करणे, अध्यापन कौशल्ये विकसित करणे, साधनसामग्रीचा योग्य वापर करणे आणि आधुनिक मूल्यमापन पद्धती समजून घेणे यासाठी हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणार्थींना विशेषतः उपयुक्त ठरेल.

1. विज्ञान अध्यापनाच्या पद्धती, तंत्रे
(Methods, Techniques of Teaching Science)
प्रास्ताविक
प्रयोगशाळा पद्धती : अर्थ व संकल्पना
विज्ञान अध्यापनातील प्रयोगशाळा पद्धती : अर्थ, संकल्पना व स्वरूप
प्रयोगशाळा पद्धती : वैशिष्ट्ये, गरज, गुण व दोष
क्षेत्रभेट (Field Work) पद्धती : संकल्पना, आयोजन, फायदे व तोटे
स्वयंशोधन पद्धती : अर्थ, संकल्पना, स्वरूप, पायऱ्या तसेच गुण व दोष
क्रमान्वित अध्ययन तंत्र : अर्थ, संकल्पना व स्वरूप, चौकट व प्रमुख वैशिष्ट्ये, गुण व दोष
क्रमान्वित अध्ययन तंत्रावर आधारित आदर्श नमुना पाठयोजना.

2. अध्यापनाची प्रतिमाने
(Models of Teaching)
प्रास्ताविक
अध्यापन प्रतिमान : अर्थ व संकल्पना, घटक व महत्त्व तसेच अध्यापन प्रतिमानांचे वगकरण
संकल्पना प्राप्ती प्रतिमान : स्वरूप व घटक
संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे घटक व त्यांची उदाहरणांसह मांडणी (तक्ता)
संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे घटक : उदाहरणांसह तक्ता (उदा. संकल्पना “फळे”)
अग्रत संघटक प्रतिमान : अर्थ, स्वरूप, संरचना, गुण व दोष
न्यायतत्त्व शास्त्रीय अन्वेषण प्रतिमान : संकल्पना, पायऱ्या तसेच गुण व दोष

3. विज्ञान अध्यापनासाठी सुविधा आणि साधने
(Facilities and Equipment's for Science Teaching)
प्रास्ताविक
विज्ञान प्रयोगशाळा : संकल्पना, गरज आणि महत्त्व
आदर्श विज्ञान प्रयोगशाळेचे वैशिष्टे
शैक्षणिक तंत्रविज्ञान प्रयोगशाळा : संकल्पना, स्वरूप व हेतू
विज्ञान अध्यापनामध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर
विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनासाठी प्रगत आय.सी.टी. तंत्रज्ञानाचा वापर

4. मूल्यमापन आणि चाचणी
(Evaluation and Test)
प्रास्ताविक
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन : संकल्पना व उद्दिष्टे
परीक्षेचे प्रकार : लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा
घटक चाचणी रचनेचा अभ्यास : अर्थ, महत्त्व व निर्मितीच्या पायऱ्या
इयत्ता 7 वी नमुना घटक चाचणी (Unit Test)
प्रश्नपेढी : विकास, उद्देश, निर्मितीचे टप्पे, प्रश्नपेढी तयार करण्याचा Flowchart
नैदानिक चाचणी : संकल्पना, महत्त्व, वैशिष्ट्ये, फायदे व मर्यादा, तयार करण्याची पद्धती
नैदानिक चाचणीसाठी नमुना
उपचारात्मक अध्यापन : महत्त्व, गुण आणि दोष

5. विज्ञान शिक्षक
(Science Teacher)
प्रास्ताविक
विविध शालेय स्तरावर विज्ञान शिक्षकासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व शिक्षकाचे विशेष गुण.
विज्ञान शिक्षकाचा व्यावसायिक : संकल्पना व व्यावसायिक विकासाची गरज.
पर्यावरण जाणीव जागृतीसाठी शिक्षकाची भूमिका.
शाश्वत विकास शिक्षण व शास्वत विकासात विज्ञान शिक्षकाची भूमिका.

6. भौतिकशास्त्राचा मुलभूत आशय
(Core Content of Physics)
भौतिक राशींचे मापन : व्हर्नियर कॅलिपर, स्क्रू प्रमापी, मापनातील त्रुटी. क्षेत्रफळाचे मापन.
गती : संकल्पना, गतीचे प्रकार व गतीचे नियम
बल : संकल्पना, बलाचे प्रकार.
गुरुत्वाकर्षण : संकल्पना.
उष्णता : संकल्पना, उष्णता निर्मितीचे प्रमुख स्रोत, उष्णतेचे संक्रमण व त्याचे प्रकार, उष्णतेचे परिणाम :
प्रकाश : संकल्पना, प्रकाशाचे संक्रमण, परावर्तन व अपवर्तन
कार्य आणि ऊर्जा, उर्जेची रूपे.
धारा विद्युत, विद्युत परिपथ, ओहमचा नियम
विद्युत चुंबकीय परिवर्तन. दोलने, तरंग आणि प्रकाशशास्र, तरंगांचे प्रकार व वैशिष्ट्ये

7. रसायनशास्त्राचा मुलभूत आशय
(Core Content of Chemistry)
मुलद्रव्यांचे आवत वगकरण
मेंडेलीव्हची आवर्तसारणी : वैशिष्ट्ये, गुण, दोष
रासायनिक बंध : रासायनिक बंधाचे प्रकार, रासायनिक समतोल
रासायनिक अभिक्रिया व रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, रासायनिक समीकरणे
धातू आणि अधातू : भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म
दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र

8. जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भूविज्ञानाचा मुलभूत आशय
(Core Content of Biology, Environmental Science Earth Science)
पेशी : रचना, पेशीचे भाग
पेशी अंगके : संकल्पना व कार्ये
पेशीचे जैवरसायनशास्त्र व जैवतंत्रज्ञान
आनुवंशिकीशास्त्र आणि उत्क्रांती व उत्क्रांतीचा सिध्दांत
आनुवंशिकता आणि भिन्नता
मानवी शरीरविज्ञान
नैसर्गिक संसाधने : पृथ्वीचे अंतरंग आणि अवकाश अभियान, अवकाश अभियान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्.च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!