वस्ती भूगोल हे पुस्तक ग्रामीण व नागरी वस्त्यांच्या उत्पत्ती, उत्क्रांती आणि स्वरूपाचा सखोल अभ्यास सादर करते. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत वस्त्यांचे विविध प्रकार, त्यांचे सांस्कृतिक व औद्योगिक महत्त्व, तसेच ग्रामीण-नागरी समस्यांचा विचार या पुस्तकात सुबोध भाषेत व सुबक आकृत्यांच्या सहाय्याने केला आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. वस्ती भूगोलाच्या अभ्यासातून खेडी व शहरे यांचा परस्पर संबंध स्पष्ट होतो आणि मानवी जीवनातील सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रगतीचे दर्शन घडते. हे पुस्तक भूगोलाच्या अभ्यासकांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.
1. प्रस्तावना
1.1 वस्ती भूगोलाच्या व्याख्या, स्वरुप आणि व्याप्ती
1.2 वस्ती भूगोलाच्या अभ्यासाचे महत्व
1.3 वसाहतींची उत्पत्ती आणि उत्क्रांती
1.4 वस्ती भूगोलाच्या अभ्यासाचे महत्व
2. भारतातील ग्रामीण वस्ती
2.1 ग्रामीण वस्त्यांचे प्रकार
2.2 ग्रामीण वस्त्यांची प्रारुपे
2.3 भारतातील ग्रामीण वस्त्यांचे वितरण
2.4 ग्रामीण वस्त्यांच्या/वसाहतींच्या समकालीन समस्या
3. शहरांची उत्पत्ती आणि शहरीकरण/नागरीकरण
3.1 शहरांच्या उत्पत्तीचे सिध्दांत - गॉर्डन चाइल्ड, हेन्री पिरेन
3.2 शहरीकरणाची प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये
3.3 शहरीकरणाचा कल आणि शहरी भागातील कार्ये
3.4 प्रमुख नगर/मुख्य नगर/प्रथम नगर आणि श्रेणी आकार नियम
4. नागरी संकल्पना
4.1 नागरी संकल्पना- प्रमहानगर, संकलितनगर, नागरी प्रदेश, स्मार्ट सिटी/सुंदर शहर
4.2 केंद्रीय व्यापारी क्षेत्राची संकल्पना (उइऊ)
4.3 नगर प्रभावक्षेत्र संकल्पना आणि त्याची वैशिष्टये
4.4 ग्रामिण - नागरी पट्टा, उपनगरीय रिंग आणि उपग्रह शहरे
5. नागरी भूमीउपयोजनाचे सिध्दांत
5.1 ख्रिस्टॉलरचा मध्यवत स्थान सिध्दांत / केंद्रीय स्थल सिध्दांत
5.2 पेरॉक्स आणि बाऊडविले यांचा विकास ध्रुव सिध्दांत
5.3 ई. डब्ल्यू. बर्गेसचा समकेंद्र वर्तूळ सिध्दांत
5.4 होमर हॉईटचा त्रिज्याखंड सिध्दांत आणि हॅरीस व उलमनचा बहुकेंद्र सिध्दांत
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी नविन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक
M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक