ताओ एक जीवनप्रवाह

Author: B G Wagh
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373440903
Year: 2026
Pages: 140

    रिक्तताच (Emptiness) असते जीवनाचा प्रारंभ. जेव्हा आपण पूर्ण रिक्त होतो तेव्हाच आपण भरून उसळू लागतो. ताओ आहे न भरणाऱ्या घड्यासारखा. त्याला जाणायचे असेल तर या अमर्याद पोकळीचा अर्थ समूजन घ्यावा लागेल. 
    भरणे आणि रिक्त होणे हाच तर जीवनाचा नियम आहे. आपला जन्म आणि मृत्यू भरणे आणि रिक्त होण्याची प्रक्रियाच आहे. हे विश्व म्हणजे अमर्याद अस्तित्वाची साखळी आहे. ती कार्यकारण संबंधांवर (Causal Relationship) असली तरी तिचे दृश्यरूप म्हणजे विश्वव्यवस्था होय. 
    या अमर्याद अस्तित्व प्रक्रियेतील परस्परसंबंधाचं रहस्य जाणणे म्हणजे ‘ताओ’ जाणणे होय. ही स्थलकालातीत व्यवस्था एखाद्या अमर्याद महानदीसारखी आहे. ती निरंतर वाहते आहे. तिला कुठलाही किनारा नाही. तिचा आरंभ, अंत आणि मध्य कल्पिता येणार नाही; परंतु तिचे ‘अस्तित्व’ यिन (Yin) व यांग (Yang) या दोन महाशक्तीच्या अंतर्गत ‘समन्वय’ - समतोल आणि ‘सुसंवाद’ प्रक्रियेने (Harmony and Balance) पद्धतीने घडत असते. विकसित होत असते. हे अस्तित्व कधीही विनाश पावत नाही. त्याचे फक्त स्थित्यंतर होत असते. म्हणून ज्ञानी माणसासाठी अंधार आणि प्रकाश एकच गोष्ट असते.

ज्याला आपण सुंदर म्हणतो  
ते बहुधा असते कुरूपच  
ज्याला आपण सत्य म्हणतो  
ते असते असत्यच  

- ताओ ते चिंग (ताओत्से)

1. चिरतरुण जग
2. हाक द्या, निसर्ग प्रतिसाद देईल
3. अराजक मनात असते, निसर्गातच नव्हे!
4. रिक्तता म्हणजे जीवनप्रारंभ!
5. जेवढे खोल जाल तेवढे वर याल
6. द्वंद्वात्मकता जाणणे म्हणजे ताओ जाणणे
7. आनंददायी सहअस्तित्व
8. सत्य जाणावे सापेक्षतेने
9. मुक्त जीवनप्रवाह...
10. अस्तित्वाला जाणून घ्या
11. सर्जनशील सत्ता
12. मुक्तीतून मन:शांती
13. अस्तित्वाचं अति गूढशास्त्र
14. ताओ जाणण्यासाठी हवी अनासक्त तटस्थता
15. ऐका आतला आवाज
16. तपश्चर्येतून अजिंक्यपद
17. संपत्तीचे सामाजिक महत्त्व
18. ज्ञान म्हणजे अंतर्दृष्टीच
19. वसुधैव कुटुंबकम
20. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन

इतरांना समजून घेणे शहाणपण आहे, स्वतःला समजून घेणे आत्मज्ञान आहे.

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!