स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र

Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395605144
Year: 2024
Pages: 220

स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यशास्त्र हा महत्त्वाचा व गुणनिर्धारक विषय आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधान, महाराष्ट्राचा इतिहास व प्रशासन, भारतीय राजकीय विचारवंत, संशोधन पद्धती, निवडणूक व्यवस्थापन, राजकीय विचारधारा, राजकीय विश्लेषण व समाजशास्त्र, सनदी सेवा व लोकप्रशासन, राजकीय सिद्धांत तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण व संघटना या सर्व घटकांचा सखोल व सोप्या भाषेत अभ्यास केलेला आहे.

हे पुस्तक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, NET/SET परीक्षा, तसेच संघ व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यासाठी उपयुक्त ठरेल. प्रत्येक प्रकरणात संकल्पनांची स्पष्ट मांडणी, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा विचार आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोन ठेवलेला आहे.

🎯 पुस्तकाची वैशिष्ट्ये

  • स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत रचना

  • वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी उपयुक्त माहिती

  • संकल्पनांची सोपी व स्पष्ट मांडणी

  • अध्यापन व संशोधनासाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त

लेखन प्रक्रियेत कुटुंब, मित्रपरिवार व हितचिंतकांचा पाठिंबा तसेच प्राईम पब्लिशिंग हाऊस चे प्रदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.

हे पुस्तक विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयाची सखोल समज देईल, परीक्षेची तयारी अधिक परिणामकारक करेल आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी आवश्यक आधार ठरेल.

  1. भारतीय संविधान
  2. महाराष्ट्र इतिहास आणि प्रशासन
  3. भारतीय राजकीय विचारवंत
  4. राज्यशास्त्रातील संशोधन पद्धती
  5. निवडणूक व्यवस्थापन
  6. राजकीय विचारधारा
  7. राजकीय विश्लेषण व राजकीय समाजशास्त्र
  8. सनदी सेवा आणि लोकप्रशासन
  9. राजकीय सिद्धांत
  10. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संघटना

MPSC, UPSC, NET-SET, पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे विद्याथ यांना अत्यंत उपयुक्त असा सर्वसमावेशक संदर्भ

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!