सिंहनाद !
कर्तृत्वाच्या ध्येयपथावरील ध्येयबिंदू...
आनंदाने न्याहाळतांना
समाधानाची लकेर उमटून जावी
शरीर आणि मनभर...
रस्ताळलेल्या थांबा ठिकाणांची
गणती जोखावी
यशस्वी श्वासभर...
जिद्दीचा वारा शोषून घ्यावा
कणाकणात...
मनामनात शौर्याचा सिंहनाद निनादावा
ध्येयबिंदूच्या दिशेने!
प्रगल्भ... प्रज्ञावंत
यशवंत... आणि
कीतवंत
बनवावे प्रत्येक पेशीतील
कलापांना...
सिंहनादाच्या साक्षीने!
सिंहनादाच्या गर्जनेने!!
सिंहनादाच्या आक्रमकतेने!!!