शिक्षणातील नवसंकल्पना व नवप्रवाह या पुस्तकात लेखक डॉ. ह. ना. जगताप यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलांचा परामर्श घेत प्रस्तुत ग्रंथाची मांडणी केली आहे. 25 वर्षांपूव त्यांनी ‘शिक्षणातील नवप्रवाह व नवप्रवर्तने’ हा ग्रंथ लिहिला होता आणि 2017 मध्ये डॉ. नागनाथ येवले व डॉ. तुषार साळुंखे यांच्यासोबत ‘शिक्षणातील नवप्रवाह’ हा ग्रंथ प्रकाशित केला होता.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि कोविड-19 नंतरच्या बदलत्या परिस्थितीमुळे शिक्षणात झालेल्या मूलगामी परिवर्तनांचा अभ्यास या ग्रंथात मांडलेला आहे.
या ग्रंथात पाच अभ्यासपूर्ण भाग समाविष्ट आहेत. डॉ. युवराज पवार यांनी तंत्रज्ञान, मूल्यमापन व शैक्षणिक सुधारणा यांचे विश्लेषण केले आहे. डॉ. अनिल पाटील यांनी स्वयं, चजजउ, दीक्षा आणि ऑनलाइन शिक्षणाच्या प्रभावीतेवर प्रकाश टाकला आहे. तिसऱ्या भागात डॉ. जगताप यांनी मूल्यनिर्धारण व मूल्यमापनाच्या विविध पैलूंवर सविस्तर विवेचन केले आहे. चौथ्या व पाचव्या भागात डॉ. मोरे व डॉ. येवले यांनी नवसंकल्पना, शैक्षणिक योजना व राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे.
ग्रंथात सैद्धांतिक दृष्टिकोनाबरोबरच व्यवहार्य उपक्रम, संकल्पना आणि सर्जनशील विचार समाविष्ट आहेत. विद्याथ केंद्रित शिक्षण, शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण व मूल्याधिष्ठित दृष्टिकोन यावर भर देण्यात आलेला आहे.
शेवटच्या प्रकरणात डॉ. जगताप यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा थोडक्यात परामर्श घेतलेला आहे. हा ग्रंथ केवळ बी.एड., एम.एड., पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथ आणि सर्व शिक्षणप्रेमींसाठी उपयुक्त ठरेल.