शेअर बाजाराची ओळख

Rs. 122.00
Rs. 135.00
Rs. 122.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373442839
Year: 2025
Pages: 88

आपल्या देशाच्या आर्थिक विकासात गुंतवणुकीला मोठे महत्त्व आहे. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी शेअर बाजार हा सर्वात महत्त्वाचा आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. यात काही प्रमाणात जोखीम असली तरी योग्य माहिती आणि समज असलेला गुंतवणूकदार नक्कीच चांगला फायदा मिळवू शकतो. त्यामुळेच शेअर बाजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
या पुस्तकात शेअर बाजाराशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. भारतीय शेअर बाजाराचा इतिहास, प्राथमिक व दुय्यम बाजार, बीएसई व एनएसईची माहिती, सेबीची भूमिका, निर्देशांक, डिमॅट खाते, आयपीओ-एनएफओ-एफपीओ, म्युच्युअल फंड, डखझ व डथझ अशा अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य वाचकांना समजतील अशा पद्धतीने मांडल्या आहेत.
हे पुस्तक सर्व विद्यापीठांसाठी लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ-2020) नुसार सुधारित अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. त्यामुळे अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. याचबरोबर शेअर बाजारात नवीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या वाचकांसाठीही हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
आजच्या काळात शेअर बाजाराचे ज्ञान केवळ अभ्यासापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि गुंतवणुकीच्या योग्य संधी शोधण्यासाठी ते अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातही उपयुक्त ठरेल, हा विश्वास आहे.

1. भारतातील शेअर बाजारांची ओळख
(Introduction to Stock Markets in India)
1.1 भारतीय शेअर बाजाराचा उगम आणि इतिहास :
1.2 बाजाराची रचना : प्राथमिक आणि दुय्यम बाजार : अर्थ
1.2.1 प्राथमिक बाजार
1.2.2 दुय्यम बाजार
1.3 बीएसई, एनएसईचा परिचय
1.3.1 मुंबई शेअर बाजार (बीएसई)
1.3.2 राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)
1.4 शेअर बाजाराचे निर्देशांक : सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी
1.4.1 सेन्सेक्स
1.4.2 निफ्टी 50
1.4.3 बँक निफ्टी
1.5 सेबीची भूमिका : सीडीएसएल, एनएसडीएल
1.5.1 भारतीय प्रतिभूती विनियम मंडळ
(सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया : सेबी)
1.5.2 डिपॉझिटरी
1.5.2.1 सीडीएसएल
1.5.2.2 एनएसडीएल

2. शेअर बाजारातील व्यापार
(Trading in Stock Market)
2.1 डिमॅट खाते अर्थ आणि खाते उघडण्याची प्रक्रिया
2.2 आयपीओ,एनएफओ आणि एफपीओ-अर्थ आणि प्रक्रिया
2.2.1 प्राथमिक सार्वजनिक भागविक्री
2.2.2 फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग
2.2.3 नवीन निधी ऑफर (एनएफओ)
2.3 शेअर ट्रेडिंगचे प्रकार
2.3.1 इंट्रा-डे ट्रेडिंग
2.3.2 डिलिव्हरी ट्रेडिंग
2.3.3 ऑप्शन ट्रेडिंग
2.3.4 भविष्यातील बाजार/ फ्युचर बाजार
2.2.5 स्वॅप मार्केट
2.4 म्युच्युअल फंड : अर्थ आणि प्रकार
2.4.1 म्युच्युअल फंड : अर्थ
2.4.2 म्युच्युअल फंडांचे प्रकार
2.4.2.1 ला‍र्ज-कॅप फंड
2.4.2.2 मिड-कॅप फंड
2.4.2.3 स्मॉल कॅप फंड
2.5 पद्धतशीर गुंतवणूक योजना
2.6 पद्धतशीर पैसे काढण्याची योजना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - अर्थशास्त्र (सत्र 3) (OE) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!