शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन

Rs. 176.00
Rs. 195.00
Rs. 176.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373446479
Year: 2026
Pages: 2024

शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन हे पुस्तक आधुनिक शैक्षणिक क्षेत्रातील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे. समाजाच्या बदलत्या मागण्या आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातील सतत होणाऱ्या सुधारणा लक्षात घेऊन या विषयाची मांडणी करण्यात आली आहे. बी.एड. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी समाविष्ट केलेल्या या विषयाचा उद्देश शिक्षक प्रशिक्षणाथ आणि प्राध्यापकांना योग्य दिशा देणे हा आहे.
या ग्रंथात मूल्यमापनाची संकल्पना आणि हेतू, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन संबंधी दृष्टिकोन, अध्ययनाचे मूल्यनिर्धारण, मूल्यमापनाची तंत्रे व साधने, शाळांमधील मूल्यनिर्धारणासाठी चाचण्या, शिक्षक निर्मित संपादन चाचणी, मूल्यनिर्धारणाचे नियोजन व अंमलबजावणी, तसेच मूल्यमापनातील सुधारणा यांसारख्या महत्त्वपूर्ण घटकांचा सखोल विचार केला आहे. सर्व प्रकरणे मुद्देसुद स्वरूपात, साध्या आणि सरळ भाषेत मांडलेली असल्यामुळे वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते.
लेखकांनी विविध संदर्भग्रंथ, नियतकालिके, संशोधन लेख आणि इंटरनेटवरील माहितीचा आधार घेत अद्ययावत व सविस्तर माहिती दिली आहे. या पुस्तकातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मापन, मूल्यनिर्धारणाची उपयुक्तता, विविध चाचण्यांचे स्वरूप, तसेच सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाची गरज याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळते.
हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन या प्रक्रियांचा प्रभावी वापर कसा करावा याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.

1. मूल्यमापनाची संकल्पना आणि हेतू
(Concept and Purpose of Evaluation)
मूल्यांकन चाचण्यांची उद्दिष्टे.
मूल्यांकन चाचण्यांद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मापन.
आत्ममूल्यांकन आणि सहमूल्यांकनाचे महत्त्व
मापन, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन यामधील फरक.
मापनाची संकल्पना.
शिक्षण प्रक्रियेत मापनाचे महत्त्व.
मूल्यनिर्धारणाची संकल्पना आणि प्रकार.
अध्यापन प्रक्रियेत मूल्यनिर्धारणाची उपयुक्तता.
मूल्यमापनाची संकल्पना.
मूल्यनिर्धारणाचे गुण व दोष.
अध्ययन - अध्यापन प्रक्रियेत मूल्यनिर्धारणाची भूमिका
शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी मूल्यनिर्धारणाची उपयुक्तता.
शिक्षकांच्या मूल्यमापन पद्धतींचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम
शालेय अध्ययन अध्यापनात मूल्यमापन तत्त्वांची अंमलबजावणी.

2. मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन संबंधी दृष्टिकोन
(Prescriptive on Assessment and Evaluation)
मूल्यनिर्धारण संकल्पना.
मूल्यनिर्धारण व मूल्यमापन यातील फरक.
मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन प्रक्रियेत शिक्षकाच्या भूमिकेचे महत्त्व.
मूल्यनिर्धारणाची वैशिष्टे.
मूल्यनिर्धारण व मूल्यमापनाची तत्वे.
बोधात्मक दृष्टिकोनानुसार शिक्षणाची प्रक्रिया
बोधात्मक दृष्टिकोनानुसार समस्यांचे निराकरण करण्याची प्रमुख तत्त्वे.
बोधात्मक दृष्टिकोनातून समस्यांचे निराकरण करतांना शिक्षकाची भूमिका.
रचनावादी दृष्टिकोनानुसार शिक्षकाची भूमिका.
आकारिक मूल्यमापनाची वैशिष्ट्ये.
शाळाधारित मूल्यनिर्धारणाची वैशिष्ट्ये.
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यनिर्धारणाची गरज.
सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाची वैशिष्ट्ये व उद्दिष्टे.
सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यनिर्धारणाचे महत्त्व.
सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यनिर्धारणाचे फायदे.
सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या मर्यादा.

3. अध्ययनाचे मूल्यनिर्धारण
(Assessment of Learning)
बोधात्मक परिमिती - संकल्पना.
भावात्मक परिमिती - संकल्पना.
कार्यात्मक परिमिती - संकल्पना.
बोधात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण - संकल्पना व वैशिष्ट्ये
बोधात्मक अध्ययनाचे फायदे
भावात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण- वैशिष्ट्ये
भावात्मक अध्ययनाचे फायदे
श्रेणी पद्धतीचे फायदे.
अधिबोधन आणि विकास - संकल्पना.
स्वयंमूल्यनिर्धारणाचे महत्व.
शिक्षकांचे मूल्यनिर्धारण.
शिक्षक मूल्यनिर्धारणाची उद्दिष्टे.
शिक्षकांच्या मूल्यमापनाची प्रमुख तत्वे व उद्दिष्टे.
शिक्षकाच्या मूल्यनिर्धारणात विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाचे महत्त्व.
शिक्षकांच्या मूल्यनिर्धारण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर.

4. मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने
(Techniques and Tools of Evaluation)
चाचणीची संकल्पना - उद्दिष्टे व प्रकार
मूल्यमापनाचा अर्थ व संकल्पना.
मूल्यमापनाचे महत्त्व.
शिक्षणात मूल्यमापनाची भूमिका.
मूल्यमापनाचे प्रकार व मूल्यमापन तंत्रांचा वापर.
मूल्यमापनाची साधने व ती निवडताना विचारात घ्यावयाचे घटक.
कौशल्यांच्या मूल्यमापनासाठी वापरण्यात येणारी प्रभावी तंत्रे.
मूल्यमापनाची साधने निवडतांना शिक्षकांना येणारी आव्हाने.
मूल्यमापनाची तंत्रे व साधने प्रभावीपणे वापरण्याबाबतचे उपाय.
सहकार्यात्मक अध्ययनाची वैशिष्ट्ये व सहकार्यात्मक अध्ययनाची उदाहरणे.

5. शाळांमधील मूल्यनिर्धारणासाठी चाचण्या
(Tests for Assessment in Schools.)
संपादन चाचणीचा अर्थ व संकल्पना.
संपादन चाचणीची महत्त्वाची वैशिष्ट्ये.
अभिक्षमता चाचणी संकल्पना व मुख्य उद्दिष्टे.
अभिक्षमता चाचणीचे महत्त्व व उपयोग.
संपादन चाचणी व अभिक्षमता चाचणी यातील फरक.
कार्यमानाधारित संपादन चाचणीची वैशिष्ट्ये.
कार्यमानाधारित संपादन चाचणीचे फायदे.
निदानात्मक मूल्यनिर्धारण : संकल्पना व उद्दिष्टे.
निदानात्मक मूल्यनिर्धारण : वैशिष्ट्ये व फायदे.
नैदानिक चाचणीचे उद्देश, प्रकार, महत्त्व व फायदे.
नैदानिक चाचण्यांची गरज व महत्त्व.
उपचारात्मक कृतीची संकल्पना, उद्देश आणि आवश्यकता.
प्रश्नपेढीचे स्वरूप व तिचा विकास करण्याची प्रक्रिया.
प्रश्नपेढीची गरज व महत्त्व.
तोंडी परीक्षा : स्वरूप, आवश्यकता आणि महत्त्व.

6. शिक्षक निर्मित संपादन चाचणी
(Teacher Made Achievement Test)
शिक्षक निर्मित चाचणीची संकल्पना, प्रकार आणि हेतू
वस्तुनिष्ठ प्रश्नांचे फायदे व मर्यादा.
प्रत्यावहनात्मक प्रश्नाची संकल्पना.
निबंधवजा प्रश्नाची संकल्पना.
दिर्घोत्तरी प्रश्नांचे गुण, दोष आणि मर्यादा
शिक्षक निर्मिती चाचणीचे प्रशासन योजना तयार करतांना लक्षात ठेवावयाच्या बाबी.
चांगल्या गुणदान योजनेसाठी मार्गदर्शक तत्वे.
वर्गखोली मूल्यनिर्धारण: अर्थ, संकल्पना, उद्दिष्टे आणि हेतू

7. मूल्यनिर्धारणाचे नियोजन, संरचना, अंमलबजावणी आणि अहवाल
(Planning, Construction, Implementation and Reporting of assessment)
अनुदेशनची संकल्पना.
मूल्यनिर्धारणाचे स्वरूप.
तोंडी परीक्षेची उद्दिष्टे व स्वरूप.
लेखी परीक्षेची वैशिष्ट्ये.
लघुत्तरी प्रश्नांचे गुण व दोष.
पुस्तकासह परीक्षा: स्वरूप, गुण-दोष आणि गरज
पुस्तकासह परीक्षेची (Open Book Examination) उद्दिष्टे.
अभ्यासक्रमात नमूद केलेली जीवनकौशल्ये.
पुस्तकासह परीक्षेचे फायदे आणि मर्यादा.
शिक्षक-निर्मित चाचणी तयार करण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे.
संविधान तक्त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्व.
चांगली गुणदान योजना राबवण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे.
प्रमाणित गुणाची वैशिष्ट्ये.
झेड गुणांकाची वैशिष्ट्ये.
T गुणांकाचे वैशिष्ट्ये.
मध्यमान व मध्यांकाची वैशिष्ट्ये.
स्तंभालेखाची वैशिष्टे.
वारंवारिता बहुभुजाची वैशिष्टे.

8. मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापनातील सुधारणा 176
(Reforms in Assessment and Evaluation )
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील अपेक्षा.
सर्वंकष निरंतर मूल्यमापन: संकल्पना, मुख्य वैशिष्ट्ये, फायदे आणि त्यासंबंधी आव्हाने.
प्रश्नपेढीचे उपयोग.
श्रेणी मूल्यनिर्धारणाचे व मूल्यमापनाचे उपयोग.
ऑनलाइन परीक्षा: वैशिष्ट्ये, गरज, आवश्यक सुविधा, फायदे व मर्यादा
संगणकावर आधारित परीक्षांचे फायदे आणि मर्यादा.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!