संवाद कौशल्ये

Rs. 122.00
Rs. 135.00
Rs. 122.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373443768
Year: 2025
Pages: 90

हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी संवाद आणि भाषिक कौशल्य यांचा सर्वसमावेशक अभ्यास उपलब्ध करून देते. यात संवाद कौशल्याचे तंत्र, संवादकौशल्याची आवश्यकता आणि वैशिष्ट्ये यापासून सुरूवात करून सूत्रसंचालन कौशल्य, वक्तृत्त्व कौशल्य, भाषण कौशल्य आणि वादविवाद कौशल्य यांपर्यंत प्रत्येक पैलू सविस्तर समजावून सांगितला आहे. पुस्तकात सूत्रसंचालनाचे तंत्र, वैशिष्ट्ये, पाळावयाची पथ्य, वक्तृत्वपटूचे गुण आणि प्रभावी भाषणासाठी आवश्यक तयारी यावर भर दिला आहे. तसेच, भाषणाचे सादरीकरण, भाषिक उपयोजन, प्रभावी भाषण कसे करावे, वादविवादासाठी विषयाची निवड, प्रत्यक्ष खंडन मंडण, वादविवादाचे परीक्षण आणि स्पर्धेतील सहभाग या सर्व गोष्टींवर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. 
प्रा. डॉ. संदीप माळी लिखित हे पुस्तक विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून नव्हे, तर व्यावहारिक जीवनात संवाद साधताना आत्मविश्वास, प्रभावी व्यक्तिमत्व आणि सार्वजनिक बोलण्याची कला विकसित करण्यासही उपयुक्त ठरते. सहज वाचता येणारी भाषा, उदाहरणे आणि सुस्पष्ट स्पष्टीकरणे यामुळे हे पुस्तक अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे.

- प्रोफेसर डॉ. किशोर एन. सोनवणे 
अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव 
प्रभारी प्राचार्य, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे 
दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा 

1 संवाद कौशल्य : तंत्र
1.1 संवाद कौशल्य म्हणजे काय?
1.2 संवादाची गरज
1.3 संवाद कौशल्याचे घटक
1.4 संवाद कौशल्याचे महत्त्व
1.5 संवादातील अडथळे
1.6 संवाद कौशल्य सुधारण्याचे उपाय
1.7 संवाद कौशल्याची आवश्यकता
1.8 संवाद कौशल्याचे तंत्र
1.9 संवाद कौशल्याची वैशिष्ट्ये
1.10 समारोप

2. सूत्रसंचालन कौशल्य
2.1 प्रस्तावना : सूत्रसंचालन कौशल्य
2.2 सूत्रसंचालन एक कला
2.3 सूत्रसंचालनातील भाषेचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये
2.4 सूत्रसंचालकाने पाळावयाची पथ्ये
2.5 समारोप

3. वक्तृत्त्व कौशल्य
3.1 प्रस्तावना
3.2 वक्तृत्त्वाचे स्वरूप
3.3 अष्टपैलू वक्तृत्त्वपटूचे गुण
3.4 वक्तृत्त्वकलेची वैशिष्ट्ये
3.5 समारोप

4. संवाद कौशल्याचे उपयोजन
4.1 प्रास्ताविक
4.2 सूत्रसंचालनाचे उपयोजन
4.3 सूत्रसंचालनाच्या पायऱ्या
4.4 सूत्रसंचालनातील सर्वसामान्य मुद्दे
4.5 वक्तृत्त्वाचे उपयोजन
4.6 सूत्रसंचालन व वक्तृत्त्व यातील फरक
4.7 समारोप

5. भाषण कौशल्य
5.1 प्रस्तावना
5.2 भाषणाची तयारी
5.3 भाषणासाठी विषयाची निवड व तयारी
5.4 भाषणाचे सादरीकरण
5.5 भाषिक उपयोजनाचे ज्ञान
5.6 प्रभावी भाषण कसे करावे?
5.7 समारोप

6. वादविवाद कौशल्य
6.1 प्रास्ताविक
6.2 वादविवादासाठी विषयाची निवड
6.3 वादविवादाचे प्रत्यक्ष सादरीकरण - खंडन मंडण
6.4 वादविवादाचे परीक्षण
6.5 वादविवाद स्पर्धेचे आयोजन व सहभाग
6.6 समारोप

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, एस.वाय.बी.ए. (सत्र 3 व 4) मराठी (SEC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!