राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाला सर्वांगीण, समावेशक व कौशल्याधारित करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक विकासाला समान महत्त्व दिले गेले आहे. या पुस्तकात महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप, प्रकार व प्रयोजन यांचे सविस्तर विवेचन केले आहे.
पहिल्या प्रकरणात रांगोळी, स्वागतगीत, भित्तिपत्रक, अतिथी परिचय, आभार प्रदर्शन, रचना, वर्तमानपत्र लेखन व वार्षिकांक यांचा परिचय दिला आहे. दुसऱ्या प्रकरणात कविता, संकलन, सांस्कृतिक उपक्रम, रॅली, निबंध व विविध राष्ट्रीय/सांस्कृतिक दिन यांचे स्वरूप व प्रकार स्पष्ट केले आहेत. तिसऱ्या प्रकरणात सुत्रसंचालन, कथा, वाद्यकला, एकपात्री प्रयोग, अभिनय, फॅशन शो व लोककला यांचे स्वरूप व प्रकार मांडले आहेत. चौथ्या प्रकरणात वादविवाद, कथाकथन, अभिवाचन, सांस्कृतिक स्पर्धा, सजावट व साहित्य संमेलन यांचे स्वरूप व प्रयोजन दिले आहे.
या पुस्तकातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, भारतीय परंपरा व विविधतेबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मता यांचा विकास साधता येईल. तसेच कला, संस्कृती, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, नाट्य, संगीत व चित्रपट या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतील.
सांस्कृतिक उपक्रम हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना संवेदनशील, सर्जनशील आणि जबाबदार नागरिक बनविण्याचे प्रभावी साधन ठरतात. हे पुस्तक महाविद्यालयीन विद्याथ, शिक्षक तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.
1. रांगोळी, स्वागतगीत, भित्तिपत्रक, अतिथी परिचय, आभार, रचना, वर्तमान पत्र, वार्षिकांक यांचा परिचय
1.1 रांगोळी काढणे - पांरपरिक रांगोळी व फुल/पुष्प यांची रांगोळी
1.2 स्वागतगीत - स्वरूप व प्रकार
1.2.1 स्वागत गीताचे स्वरूप
1.2.2 स्वागत गीताचे प्रकार
1.3 भित्तिपत्रक - स्वरूप व प्रयोजन
1.3.1 भित्तिपत्रकाचे स्वरूप
1.3.2 भित्तिपत्रकाचे प्रयोजन
1.4 अतिथी परिचय
1.4.1 अतिथी परिचयाचे स्वरूप
1.5 आभार प्रदर्शन - प्रयोजन व स्वरूप
1.5.1 आभार प्रदर्शनाचे प्रयोजन
1.5.2 आभार प्रदर्शनाचे स्वरूप
1.6 रचना / आराखडा - एक कौशल्य
1.7 वर्तमान पत्रातील लेख - प्रकार व स्वरूप
1.7.1 वर्तमानपत्रातील लेखांचे प्रकार
1.7.2 वर्तमानपत्रातील लेखांचे स्वरूप
1.8 वार्षिकांक - स्वरूप व प्रयोजन
1.8.1 स्वरूप
1.8.2 प्रयोजन
1.8.3 निष्कर्ष
2. कविता, संकलन, सांस्कृतिक उपक्रम, रॅली, निबंध, विविध दिन यांचे स्वरूप व प्रकार
2.1 कविता - वाङ्मय प्रकाराचे स्वरूप, काव्याचे प्रकार
2.1.1 कविता - वाङ्मय प्रकाराचे स्वरूप
2.1.2 काव्याचे प्रकार
2.2 संकलन - स्वरूप व पद्धती
2.2.1 स्वरूप
2.2.2 पद्धती
2.3 सांस्कृतिक उपक्रम - स्वरूप व प्रकार
2.3.1 सांस्कृतिक उपक्रमाचे स्वरूप
2.3.2 सांस्कृतिक उपक्रमांचे प्रकार
2.4 रॅली (फेरी) - स्वरूप, प्रयोजन आणि प्रकार
2.4.1 रॅलीचे स्वरूप
2.4.2 रॅलीचे प्रयोजन
2.4.3 रॅलीचे प्रकार
2.5 निबंध लेखन - स्वरूप आणि प्रकार
2.5.1 निबंध लेखनाचे स्वरूप
2.5.2 निबंधाचे प्रकार
5.7 विविध राष्ट्रीय / सांस्कृतिक दिन - महत्त्व व प्रयोजन
3. सुत्रसंचालन, कथा, वाद्यकला, एकपात्री, अभिनय, फॅशन शो, लोककला यांचे स्वरूप व प्रकार
3.1 सुत्रसंचालनाचे स्वरूप, कौशल्ये
3.1.1 सुत्रसंचालनाचे स्वरूप
3.1.2 सुत्रसंचालनासाठी आवश्यक कौशल्ये
3.2 कथा - स्वरूप व प्रकार
3.2.1 कथाचे स्वरूप
3.2.2 कथाचे प्रकार
3.3 वाद्यकला - एक कौशल्य, वाद्याचे प्रकार
3.3.1 वाद्यकला - एक कौशल्य
3.3.2 वाद्याचे प्रकार
3.4 एकपात्री प्रयोग - स्वरूप व प्रयोजन
3.4.1 एकपात्री प्रयोगाचे स्वरूप
3.4.2 एकपात्री प्रयोगाचे प्रयोजन
3.5 अभिनय कला - स्वरूप व प्रकार
3.5.1 अभिनय कलाचे स्वरूप
3.5.2 अभिनय प्रकार
3.6 फॅशन शो (वेशभूषा) - स्वरूप
3.7 लोककला - प्रकार, स्वरूप, वैशिष्टये
3.7.1 प्रकार (Types of Folk Art)
3.7.2 स्वरूप (Form/Structure of Folk Art)
3.7.3 वैशिष्ट्ये (Characteristics of Folk Art)
4. वादविवाद, कथाकथन, अभिवाचन, सांस्कृतिक स्पर्धा, सजावट, साहित्य संमेलन यांचे स्वरूप व प्रकार
4.1 वादविवाद - स्वरूप, कौशल्य
4.1.1 वादविवादाचे स्वरूप
4.1.2 वादविवाद कौशल्ये
4.2 कथाकथन (Storytelling) - स्वरूप आणि कौशल्य
4.2.1 कथाकथनाची स्वरूपे
4.2.2 कथाकथनाचे कौशल्य
4.3 अभिवाचन - स्वरूप, प्रयोजन
4.3.1 अभिवाचनाचे स्वरूप
4.3.2 अभिवाचनाचे प्रयोजन
4.3.3 अभिवाचनाचे प्रकार
4.4 सांस्कृतिक स्पर्धांचे प्रकार
4.5 सजावट - एक कला
4.6 साहित्य संमेलन - स्वरूप व प्रयोजन
4.6.1 साहित्य संमेलन स्वरूप
4.6.2 साहित्य संमेलन प्रयोजन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार,
बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी./बी.बी.ए./बी.सी.ए. पदवी अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक