संरक्षण पत्रकारितेची मूलतत्त्वे

Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373444239
Year: 2025
Pages: 168

पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. समाजातील अन्याय, त्रुटी आणि सत्तेतील जबाबदारी उघड करण्याबरोबरच माध्यमे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित जनजागृती घडवून आणतात. म्हणूनच “संरक्षण पत्रकारिता” (Defence Journalism) हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्करी बाब नसून तिच्यात राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि परराष्ट्र धोरणाचेही पैलू येतात. या पुस्तकात संरक्षण पत्रकारितेचे महत्त्व, गरज, कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्या यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.
पत्रकारितेची मूलतत्त्वे, संरक्षण पत्रकारितेतील विशिष्ट भूमिका, राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरण, संरक्षण संघटनांची माहिती, पारिभाषिक शब्दसंग्रह, संरक्षण वृत्तसंकलन व वृत्तलेखन या सर्व घटकांचा यात अभ्यासक्रमानुसार समावेश आहे. तसेच संरक्षण पत्रकारितेसाठी आवश्यक कायद्याचे ज्ञान, उपलब्ध साधने आणि करिअरच्या संधींचाही आढावा यात देण्यात आला आहे. भारतामध्ये स्पेशलाईज्ड संरक्षण पत्रकारांची मोठी उणीव आहे. त्यामुळे या क्षेत्रात संधींचे दरवाजे उघडे आहेत. वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच इलेक्ट्रॉनकि व डिजिटल माध्यमांमध्ये संरक्षण पत्रकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध आहे. हे पुस्तक संरक्षणशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वृत्तपत्रविद्येची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना व वाचकांना मार्गदर्शक ठरेल.

1. पत्रकारितेची मूलतत्त्वे
(Basics of Journalism)
1.1 अर्थ आणि संकल्पना (Meaning and Concept)
1.2 व्याख्या, संक्षिप्त इतिहास, स्वरूप
(Definitions, Brief History, Nature)
1.3 पत्रकारितेची व्याप्ती (Scope of Journalism)
1.4 पत्रकारांच्या जबाबदाऱ्या (Responsibilities of Journalists)

2. संरक्षण पत्रकारिता
(Defence Journalism)
2.1 अर्थ आणि संकल्पना (Meaning and Concept)
2.2 भारतातील संरक्षण पत्रकारिता (Defence Journalism in India)
2.3 संरक्षण बातम्या आणि युद्ध आघाडीचे वृत्तांकन
(Defence News and War front Reporting)
2.4 राष्ट्र उभारणीसाठी छपाई आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भूमिका
(Role of Electronic & Print Media for Nation Building)

3. परराष्ट्र व संरक्षण धोरण आणि संरक्षण पत्रकारिता
(Foreign and Defence Policy and Defence Journalism)
3.1 भारत आणि इतर देशांचे परराष्ट्र व संरक्षण धोरण
(Foreign and Defence Policy of India and Other Countries)
3.2 आंतरराष्ट्रीय संघटना (International Organisations)
3.3 संरक्षण खर्च (Defence Expenditure)
3.4 विविध देशांचे लष्करी सराव
(Military exercises of various countries)

4. भारताची संरक्षण संघटना
(Indias Defence Organisation)
4.1 भारताचे सेनादल व केंद्रीय सशस्त्र दल
(Indian Armed Forces and Central Armed Forces)
4.2 संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence)
4.3 संरक्षणावरील संसदीय नियंत्रण (Parliamentary control on Defence)
4.4 भारताच्या संरक्षण दलांचा परिचय
(Introduction of Indias Defence Forces)
4.5 संरक्षण संशोधन आणि विकास संघटना
(Defence Research and Development Organisation)

5. संरक्षण दलांचे समारंभ आणि संरक्षण परिभाषा
(Defence Ceremonies and Terminology)
5.1 संरक्षण दलांचे समारंभ (Defence Forces Ceremonies)
5.2 सन्मान आणि पदके (Honours and Medals)
5.3 संरक्षण आणि शस्त्र प्रणालीची संक्षिप्त रुपे व परिभाषा
(Abbreviations Terms of defence and Weapon System)

6. संरक्षण वृत्त संकलन आणि लेखन
(Defence News Gathering and Writing)
6.1 संरक्षण बातम्यांचे प्रकार (Types of Defense News)
6.2 संरक्षण बातम्यांचे स्रोत (Sources of Defense News)
6.3 संरक्षण पत्रकार : कार्य आणि स्वरुप
(Defence Correspondent: Function and Facet)
6.4 संरक्षण वृत्त लेखन (Defence News Writing)
6.5 संरक्षण वृत्तांत लेख आणि लेखन
(Defence Feature and Article Writing)

7. माध्यम कायदे आणि नैतिकता
(Media Law and Ethics)
7.1 माध्यम नैतिकता (Meaning and Concept)
7.2 माध्यमविषयक कायदे (Media Laws)
7.3 संरक्षण पत्रकारितेतील आव्हाने (Challenges in Defence Journalism)

8. संरक्षण पत्रकारिची साधने आणि कार्य
(Tools of Defence Journalism and Function)
8.1 सेनादल जनसंपर्क विभाग
(Public Relation Department of Armed Forces)
8.2 विविध स्रोत (Various Sources)
8.3 जनसंवाद प्रकाशने, अहवाल आणि वार्षिक पुस्तके
(Mass Media Publications Military Year Books)
8.4 संरक्षण तज्ज्ञ आणि सेवानिवृत्त लष्करी अधिकारी
(Defence Expert and Retired Military Officers)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - संरक्षणशास्त्र (सत्र 3 व 4) (IKS) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!