सामाजिक संशोधन पद्धती

Rs. 446.00
Rs. 495.00
Rs. 446.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373440156
Year: 2026
Pages: 150

‘सामाजिक संशोधन पद्धती’ हा ग्रंथ मानवी वर्तन, सामाजिक संबंध, संस्था आणि सामाजिक समस्यांचा शास्त्रीय व पद्धतशीर अभ्यास करून नवीन तथ्ये शोधण्याची किंवा जुन्या तथ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया स्पष्ट करतो. सामाजिक जीवनातील गुंतागुंती समजून घेण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून विश्वसनीय ज्ञाननिर्मिती कशी होते, याचे सविस्तर विवेचन या ग्रंथात आढळते.
या पुस्तकाची रचना अत्यंत पद्धतशीर असून त्यात संशोधनाची व्याख्या, वैशिष्ट्ये, उद्दीष्ट्ये, उद्देश, कार्ये आणि व्याप्ती यांचा सखोल आढावा घेतला आहे. संशोधनाचे प्रकार-मुलभूत, उपयोजित, आंतरशास्त्रीय, कृती संशोधन आणि बहुविद्याशाखीय संशोधन-यांची स्पष्ट मांडणी केली आहे. ऐतिहासिक, वर्णनात्मक, व्यष्टी अध्ययन, तौलनिक, प्रायोगिक, क्षेत्रीय, सहभागी, गुणात्मक संशोधन पद्धतींसह डेल्फी तंत्र, आशय विश्लेषण, उद्धरण विश्लेषण, परिदृश्य लिखाण आणि भविष्यकालीन कल अंदाज यांसारख्या आधुनिक तंत्रांचा समावेश या ग्रंथाला विशेषत्व देतो.
संशोधन समस्या, आराखडा, गृहीतके, नमुना निवडीचे तंत्र, साहित्य पुनरावलोकन, तथ्य संकलन, विश्लेषण व निर्वचन, सांख्यिकीय विश्लेषण, तथ्य सादरीकरण, अहवाल लेखन, शैली मार्गदर्शक, संदर्भ व्यवस्थापन साधने, अहवालाचे मूल्यमापन, वाड्मयचौर्य तपासणी साधने, संशोधन मोजणी, प्रभाव घटक आणि संशोधन नीतीशास्त्र या सर्व घटकांचा सखोल अभ्यास या पुस्तकात करण्यात आला आहे.
डझडड, चखछखढअइ, चअढङअइ यांसारख्या सांख्यिकीय सॉफ्टवेअर्सची ओळख, एपवछेींश, चशपवशश्रशू, नेींशेी यांसारख्या संदर्भ व्यवस्थापन साधनांची माहिती, तसेच ढीपळींळप आणि णीज्ञपव सारख्या वाड्मयचौर्य तपासणी साधनांचा उपयोग यामुळे संशोधन अधिक दर्जेदार आणि विश्वसनीय ठरते. स्पर्धा परीक्षा, छएढ/डएढ तसेच संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा हा संदर्भग्रंथ प्रत्येक अभ्यासकाच्या संग्रही असायलाच हवा.

1. संशोधन
2. संशोधनाचे प्रकार
3. संशोधन पध्दती
4. संशोधन समस्या
5. संशोधन आराखडा
6. गृहीतके/गृहीतकृत्य/अभ्युपगम
7. नमुना निवडीचे तंत्र
8. साहित्य आणि संशोधनाचा आढावा
9. माहिती/तथ्य संकलन
10. तथ्यांचे विश्लेषण आणि निर्वचन
11. सांख्यिकीय विश्लेषण
12. तथ्य सादरीकरण
13. संशोधन अहवाल लेखन
14. शैली मार्गदर्शक/लेखन शैली
15. संदर्भ व्यवस्थापन साधने
16. संशोधन अहवालाचे मूल्यमापन
17. वाड्मयचौर्य तपासणी आज्ञावली साधने
18. संशोधन मोजणी
19. प्रभाव घटक
20. संशोधन नीतीशास्त्र

युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित असून या ग्रंथाचा उपयोग महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी-पदव्युत्तर, एम.फिल., पीएच.डी. व स्पर्धा परीक्षा या सर्वासाठी हा उपयुक्त संदर्भ ग्रंथ असून यात सामाजिक शास्त्र या विषयातील जास्तीत जास्त माहितीचा समावेश केलेला आहे.

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!