माझा हा प्रवास म्हणजे माझ्या जीवनातील एक सोनेरी पर्व आहे, जो ऋणानुबंधांमुळे आकाराला आला आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी कार्य करताना, संशोधक म्हणून ज्ञानाचा शोध घेताना, आणि सहकारी प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारी व मार्गदर्शक यांच्यासोबत एकत्र काम करताना मला कायमच नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली. हा प्रवास माझ्या अंतरमनाशी जोडला गेलेला आहे, जिथे प्रत्येक अनुभवाने मला अधिक संवेदनशील, सजग व सामर्थ्यवान बनवले आहे. या प्रवासातील प्रत्येक क्षण, प्रत्येक माणूस आणि प्रत्येक योगदानाबद्दल मी सदैव ऋणी आहे.
1. एक नवी सुरुवात
2. जुन्या आठवणी
3. नेमणूक आदेश
4. लघु दीर्घ शोध प्रकल्प
5. परराष्ट्रात संशोधन सादरीकरण
6. विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम
7. पुस्तक लेखन
8. पीएच.डी. मार्गदर्शक आणि रिसोर्स पर्सन
9. राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
10. नयन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूर
11. विभागप्रमुख, नॅक समन्वयक
12. अभ्यास मंडळ सदस्य
13. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष
14. कोरोना काळ आणि ऑनलाइन कार्यक्रम
15. युट्युब लाईव्ह कार्यक्रम
16. ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
17. विद्यापीठ निवडणुका
18. नॅकची यशस्वी कामगिरी
19. विविध पुरस्कार
20. दोन दिवशीय राष्ट्रीय परिषद
21. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020
22. प्राध्यापकपदी पदोन्नती
23. बोराडी महाविद्यालयात नॅक
24. उपप्राचार्यपदी नियुक्ती