राष्ट्रीय सुरक्षेचे संकल्पनात्मक पैलू

Rs. 248.00
Rs. 275.00
Rs. 248.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373445878
Year: 2025
Pages: 184

एकविसाव्या शतकात राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना अधिक व्यापक, गतिमान आणि बहुआयामी झाली आहे. सुरक्षेच्या पारंपरिक लष्करी पैलूंसोबतच आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि पर्यावरणीय पैलूदेखील आता राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग झाले आहेत.
आजच्या गुंतागुंतीच्या आणि वेगवान काळात दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, मादक पदार्थ व शस्त्रांची तस्करी, सायबर सुरक्षा, स्थलांतरित व निर्वासितांचे प्रश्न, पर्यावरणीय असंतुलन आणि नैसर्गिक आपत्ती या सर्व बाबींनी राष्ट्रीय सुरक्षेला नवे स्वरूप दिले आहे. राष्ट्रशक्तीची घडण भूगोल, नैसर्गिक संसाधने, औद्योगिक क्षमता, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, आर्थिक व व्यापारी सामर्थ्य, तसेच सामाजिक व राजकीय घटकांवर अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात “राष्ट्रहित” हाच प्रत्येक देशाचा सर्वोच्च ध्येय मानला जातो, कारण हितसंबंध बदलत नसतात; बदलतात ती फक्त परिस्थिती आणि नाती. आज राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पना अधिक संवेदनशील बनल्या असून प्रादेशिक व जागतिक अस्थिरतेमुळे नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या संकल्पनात्मक पैलूंचे अध्ययन अपरिहार्य ठरते.
या पुस्तकात राष्ट्रीय सुरक्षेतील विविध घटकांचा आढावा घेण्यात आला असून, भूगोल, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, संस्कृती व समाजशास्त्र या सर्व दृष्टीकोनातून विषयाची मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक, स्पर्धा परीक्षाथ तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षणशास्त्रात रस असलेल्या सर्वांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.

1. राष्ट्रीय सुरक्षा
1.1 प्रस्तावना
1.2 अर्थ आणि स्वरूप
1.3 व्याप्ती : संकल्पनात्मक पैलू
1.4 राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय संरक्षण यांच्यातील फरक

2. राष्ट्रीय सुरक्षेचे घटक
2.1 भूगोल
2.2 खनिज संसाधने
2.3 सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटक
2.4 विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विकास
2.5 लष्करी तयारी

3. समकालीन विचारसरणीच्या विशेष संदर्भात राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना
3.1 प्रस्तावना
3.2 राष्ट्रीय संरक्षण
3.3 धोक्यांची धारणा
3.4 क्षेत्रीय सुरक्षा
3.5 जागतिक सुरक्षा

4. लष्करी आघाडी आणि 21 व्या शतकात त्यांची भूमिका
4.1 प्रस्तावना
4.2 अर्थ आणि महत्त्व
4.3 नाटो, वॉर्सा करार आणि सामूहिक सुरक्षा धोके संघटना
4.4 सुरक्षा आणि समकालीन जग

5. राष्ट्रीय सुरक्षेची अंतर्गत आव्हाने
5.1 प्रस्तावना
5.2 सीमापार दहशतवाद
5.3 बेकायदेशीर स्थलांतर आणि निर्वासितांची समस्या
5.4 मादक पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी
5.5 शेजारी देशातील अस्थिरता

6. राष्ट्रीय सुरक्षेची बाह्य आव्हाने
6.1 प्रस्तावना
6.2 लष्करी किंवा सायबर हल्ला
6.3 दहशतवादी हल्ला
6.4 संघटित गुन्हेगारी
6.5 नैसर्गिक आपत्ती

7. राष्ट्रीय सत्तेचे घटक
7.1 लोकसंख्या
7.2 प्रदेशाचा विस्तार
7.3 राष्ट्रीय संसाधने
7.4 औद्योगिक क्षमता
7.5 आर्थिक क्षमता
7.6 विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्षमता
7.7 लष्करी क्षमता

8. संकल्पनात्मक विश्लेषण
8.1 प्रस्तावना
8.2 राष्ट्र-राज्य
8.3 राष्ट्रीय हित
8.4 विप्लव (बंडखोरी) आणि प्रती विप्लव

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - संरक्षणशास्त्र (सत्र 3 व 4) (DSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!