पुरुषाच्या व्यथा

Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373447636
Year: 2025
Pages: 92

    समकालीन समाजात सर्वच स्रिया आळशी, बेफिकीर व अहमी नाहीत; पण बऱ्याच शिक्षित गृहिणी तशा दिसून येतात. त्यामुळे अशा बायका ज्यांच्या नशिबात आल्या असतील त्याला हे ‘पुरुषवादी’ काव्य त्याच्या जीवनाचे प्रतिरूप वाटेल, असे अनुभव प्रस्तुत संग्रहात काव्यात्म पद्धतीने सांगितलेले आहेत. मध्यमवगय नोकरदार पुरुषाच्या जीवनाचे ते भीषण वास्तव आहे; म्हणून घर घर की कहाणी अशीच काहीशी प्रचिती त्यातील कवितांमधून वाचकांना येईल. मात्र ती कोण्या स्त्रीबाबत तक्रार नाही, की कोणा स्त्रीचे दोष दाखवून पुरुषांचे श्रेष्ठत्त्वही इथे सांगितले नाही. आजच्या काळात काही बायका नवऱ्याशी चांगल्या वागत नाही, त्यामुळे बिचाऱ्याची फार घुसमट होते, ती अनेक दृष्टीने, हेच इथे समजून घ्यावे लागते, ते एका नवऱ्याच्या भावविरेचनातून, त्याच्या दुखऱ्या मनाच्या व भावनेच्या प्रकटनातून. अशावेळी ती बायकोविषयी केलेली तक्रार न मानता आजच्या पुरुषांच्या व्यथा-वेदनांचा तो उद्गार आहे, असे म्हणता येईल. काही कवितांमधून मात्र मैत्रीण किंवा प्रेयशी हिच्याबाबत मात्र हळुवार भावना प्रकट झालेल्या आहेत. म्हणजे बायकोपेक्षा मैत्रीण अधिक चांगली वाटते, असे का होते ? बायकोनेच नवऱ्याची मैत्रीण का होऊ नये ? असे काही प्रश्नही इथे पडतील. केवळ पुरुषाचे भावविश्व कवितेतून अधोरेखित करायचे असल्याने त्याच्या व्यथांचे स्वरूप वाचक समजून घेतील.

1

केला होता अट्टाहास
त्याचा घडला उपवास
तिची शब्दांची चूक
त्याची रात झाली मूक

श्रृंगाराच्या शपथेची
ठरली कहाणी खोटी
दिसभराच्या कटकटी
गोष्ट ज्याची त्याची मोठी

कोण घेईल माघार
जशी जिंदगी उधार
लोडशेडींग घडीघडी
कसं व्हायचं उदार

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!