प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन

Rs. 212.00
Rs. 235.00
Rs. 212.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373444932
Year: 2025
Pages: 158

‘पृथ्वीमध्ये बहु लोक | परिभ्रमणे करे कौतुक |
नाना प्रकारचे विवेक | आढळो लागती ॥

'प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना पर्यटनाचे स्वरूप, नियोजन, विपणन, वाहतूक, निवास व्यवस्था, पर्यटन संघटना, मार्गदर्शकाची भूमिका तसेच भारतातील वारसा स्थळे, कला, हस्तकला आणि महाराष्ट्रातील किल्ले, स्मारके, लेणी व धार्मिक स्थळे यांचा सखोल आढावा देते.
सहा प्रकरणांमध्ये विभागलेले हे पुस्तक पर्यटनाच्या विविध पैलूंना सोप्या भाषेत स्पष्ट करते. इतिहास विषयाबरोबरच पर्यटन व व्यवस्थापन या घटकांची समज वाढविणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्थानिक वारसा, कला-कौशल्ये आणि उद्योगांचे महत्त्व जाणून घेण्यास प्रेरित करते.
सुबोध भाषा, अभ्यासक्रमाशी सुसंगत मांडणी आणि संशोधनपर दृष्टिकोनामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि पर्यटन क्षेत्रात रस घेणाऱ्या वाचकांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शक ठरते.
 हे पुस्तक केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून, पर्यटन क्षेत्रातील करिअर घडविण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीही प्रेरणादायी ठरेल. प्रवास, पर्यटन आणि व्यवस्थापन यांचा संगम समजून घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक वाचकासाठी एक विश्वासार्ह साथीदार आहे.

1. पर्यटन संकल्पना आणि प्रकार
1.1 पर्यटन आणि प्रवास
1.2 पर्यटक अर्थ व व्याख्या
1.3 स्वरूप व व्याप्ती
1.4 पर्यटनाचे ऐतिहासिक संबंध आणि विकास
1.5 पर्यटनाचे प्रमुख प्रकार

2. पर्यटन : नियोजन आणि व्यवस्था
2.1 नियोजन - कारणे, घटक
2.2 विपणन - कार्ये, वैशिष्ट्ये
2.3 वाहतूक - वाहतुकीचे प्रकार
2.4 निवास - निवासाचे प्रकार

3. पर्यटन संस्था आणि मार्गदर्शक
3.1 भारतीय पर्यटन विकास महामंडळ
3.2 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
3.3 पर्यटन मार्गदर्शक

4. पर्यटन : महत्त्व आणि राष्ट्रीय विकास
4.1 ऐतिहासिक पर्यटनाचे महत्त्व
4.2 वारसा जागरूकता
4.3 कला आणि हस्तकला

5. भारतातील लोकप्रिय ऐतिहासिक स्थळे
5.1 किल्ले : लाल किल्ला (दिल्ली), लाल किल्ला (आग्रा), चित्तोडगड
5.2 वारसास्थळे : ताजमहाल (आग्रा), गोल घुमट (गुंबज) (विजयपुरा)
5.3 धार्मिक स्थळे : वाराणसी, बोधगया, सुवर्ण मंदिर (अमृतसर), जामा मशीद (दिल्ली), बॅसिलिका ऑफ बाम जीझस चर्च (गोवा).

6. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ
6.1 लेणी : अजिंठा, वेरूळ (ऐलोरा), घारापुरी (एलिफंटा), कार्ले-भाजे
6.2 किल्ले : रायगड, शिवनेरी, पन्हाळा, सिंधुदुर्ग किल्ला, देवगिरी
6.3 धार्मिक स्थळे : पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, जेजुरी, माहूर किंवा माहूरगड

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - इतिहास (सत्र 3 व 4) (VSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!