प्रात्यक्षिक भूगोल (सर्वेक्षण)

Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373443102
Year: 2026
Pages: 98

प्रात्यक्षिक भूगोल (सर्वेक्षण) हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील मानव्यविज्ञान शाखे अंतर्गत एस.वाय.बी.ए. (S.Y.B.A.) सत्र - IV च्या भूगोलशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले सर्वसमावेशक व विद्यार्थी अनुकूल मार्गदर्शक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सर्वेक्षणाच्या मूलभूत तंत्रांचे स्पष्ट व क्रमबद्ध मार्गदर्शन करण्यात आले असून विशेषतः समतल पाट सर्वेक्षण (Plane Table Survey) आणि जीपीएस सर्वेक्षण (GPS Survey) या पद्धतींवर आधारलेले आहे. सर्वेक्षणाच्या प्रात्यक्षिक पद्धती साध्या, सोप्या आणि शैक्षणिक भाषेत समजावून सांगितल्या असल्यामुळे हे पुस्तक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.

या पुस्तकामध्ये टप्प्याटप्प्याने सांगितलेल्या सर्वेक्षण पद्धती, आवश्यक आकृत्या, क्षेत्रीय सर्वेक्षणाची प्रक्रिया, आराखडा तयार करण्याच्या पध्दती आणि विविध प्रात्यक्षिक उदाहरणांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भूमापन, नकाशांकन, आराखडा तयार करणे तसेच क्षेत्रफळ मोजणी या बाबी सहजपणे समजण्यास मदत होते. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० (NEP-2020) च्या शिफारसीनुसार कौशल्य विकास व क्षेत्राधारित शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. या प्रात्यक्षिक पुस्तकाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अचूकता, निरीक्षण क्षमता आणि क्षेत्रीय सर्वेक्षण करण्याबाबत आत्मविश्वास विकसित करणे हा आहे. प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी तसेच विद्यापीठाच्या परीक्षांच्या दृष्टीने हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.

1. सर्वेक्षणाचा परिचय
(Introduction to Surveying)
1.1 सर्वेक्षणाची ओळख : व्याख्या
1.2 सर्वेक्षणाची मुलभूत तत्वे
1.3 सर्वेक्षणाचे प्रकार : समतल सर्वेक्षण, भूवक्रीय सर्वेक्षण
1.4 सर्वेक्षणाचे वगकरण
अ) क्षेत्र आणि हेतू नुसार
ब) वापरल्या जाणाऱ्या साधनांनुसार

2. समतल पाट सर्वेक्षण
(Plane Table Survey)
2.1 समतल पाट सर्वेक्षण : व्याख्या
2.2 समतल पाट सर्वेक्षणाचे आवश्यक साधने
2.3 समतल पाट मांडणी
अ) केंद्रसंयोजन
ब) समतलीकरण
क) स्थान निश्चितीकरण
2.4 समतल पाट सर्वेक्षणाच्या पध्दती
अ) विकिरण पध्दत
ब) आंतरछेदन पध्दत
2.5 समतल पाट सर्वेक्षणाचे फायदे आणि तोटे

3. जीपीएस सर्वेक्षण
(GPS Survey)
3.1 जीपीएस : परिचय आणि विभाग / घटक
3.2 जीपीएसचे उपयोजन
3.3 जीपीएस सर्वेक्षणाची प्रक्रिया
3.4 जीपीएस वापरून सर्वेक्षण
अ) दिलेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण
ब) आराखडा तयार करणे
क) सर्वेक्षण क्षेत्राचे मापन

4. अभ्यास सहल / खेडे गाव सर्वेक्षण
(Study Tour / Village Survey)
4.1 भौगोलिक शैक्षणिक सहल अहवाल
4.2 खेडे गाव सर्वेक्षण अहवाल

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, एस.वाय.बी.ए. (सत्र 4) भूगोल (DSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!