प्रसारमाध्यमांसाठी लेखन हे पुस्तक आधुनिक माध्यमसृष्टीतील लेखनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. वृत्तपत्र, रेडिओ आणि दूरचित्रवाणी यांसारख्या प्रमुख माध्यमांवरील लेखनाची संकल्पना, स्वरूप, भूमिका आणि त्यातील विविध प्रकार—बातमी, निवेदन, जाहिरात, मुलाखत, माहितीपर कार्यक्रम—यांचे सुलभ आणि स्पष्ट विवेचन येथे केले आहे.
विद्यार्थ्यांना माध्यमविषयक लेखन समजून घेणे सोपे व्हावे आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरावे, हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. आधुनिक काळात विद्यार्थी केवळ वाचक नसून संभाव्य लेखक, निवेदक, पत्रकार आणि सर्जकही आहे; त्याला दिशा दाखवणारे आणि भाषिक जाणिवांना पोषक ठरणारे हे लेखन ठरेल.
पुस्तकात वृत्तपत्रांसाठी बातमी लेखन, वैचारिक व ललित लेखन, जाहिरात लेखन, रेडिओवरील उद्घोषणा, बातम्या, रूपक, श्रुतिका, भाषण, जाहिरात तसेच दूरचित्रवाणीवरील बातम्या, मुलाखती, वृत्तनिवेदन आणि माहितीपर कार्यक्रम यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना, पत्रकारितेच्या अभ्यासकांना आणि प्रसारमाध्यमांच्या जाणिवेत रस असणाऱ्या वाचकांना उपयुक्त मार्गदर्शक ठरेल. माध्यमांच्या स्वरूप, जबाबदाऱ्या आणि समाजावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणारे हे लेखन विचारप्रवृत्तीला चालना देईल आणि संवादकौशल्ये अधिक प्रभावी बनवेल.
1. प्रसारमाध्यमे : स्वरूप व भूमिका
1.1 प्रसारमाध्यमांचे स्वरूप
1.2 पारंपरिक प्रसारमाध्यमांचे स्वरूप
1.3 पारंपरिक माध्यमांचे महत्त्व
1.4 पारंपरिक माध्यमांतील आव्हाने
1.5 आधुनिक प्रसारमाध्यमे
1.6 प्रसारमाध्यमांची भूमिका
1.7 माध्यमांचा परिणाम आणि जबाबदाऱ्या
2. वृत्तपत्रासाठी लेखन
2.1 प्रसारमाध्यमांसाठी लेखन
2.2 प्रसारमाध्यमांसाठी लेखन करताना आवश्यक कौशल्ये
2.3 वृत्तपत्रांसाठी लेखनाचे स्वरूप
2.4 वृत्तपत्रांसाठी बातमीचे स्वरूप
2.5 बातमी लेखनात येणारी आव्हानं
2.6 वृत्तपत्रांसाठी वैचारिक लेख : स्वरूप
2.7 वृत्तपत्रांसाठी ललित लेख : स्वरूप
2.8 वृत्तपत्रांसाठी पुस्तक परिचयपर लेखन : स्वरूप
2.9 वृत्तपत्रामधील जाहिरात : स्वरूप आणि वैशिष्ट्ये
2.10 जाहिरात लेखनाची काही मूलभूत वैशिष्ट्ये
2.11 जाहिरातींचं महत्त्व
3. नभोवाणीसाठी लेखन
3.1 नभोवाणीसाठी लेखनाचे स्वरूप
3.2 नभोवाणीवरील उद्घोषणा
3.3 नभोवाणीवरील बातम्या : स्वरूप, वैशिष्ट्ये आणि आजचं महत्त्व
3.4 रूपक
3.5 श्रुतिका
3.6 भाषण
3.7 जाहिरात
3.8 नभोवाणी जाहिरातीची वैशिष्ट्ये
4. दूरचित्रवाणीसाठी लेखन
4.1 दूरचित्रवाणीसाठी लेखन
4.2 दूरचित्रवाणीवरील बातम्यांचे स्वरूप
4.3 दूरचित्रवाणीवरील बातम्यांची रचना
4.4 दूरचित्रवाणीवरील बातम्यांची वैशिष्ट्ये
4.5 दूरचित्रवाणीवरील मुलाखतीचे स्वरूप
4.6 दूरचित्रवाणीवरील मुलाखतींची वैशिष्ट्ये
4.7 दूरचित्रवाणीवरील वृत्तनिवेदनाचं स्वरूप
4.8 दूरचित्रवाणीवरील माहितीपर कार्यक्रम
4.9 दूरचित्रवाणीवरील जाहिरात - स्वरूप, रचना व वैशिष्ट्ये
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘द्वितीय वर्ष - मराठी (MINOR/VSC)’ विषयाच्या
नवीन NEP अभ्यासक्रमावर आधारित