प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र

Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373442853
Year: 2026
Pages: 140

प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र हा ग्रंथ विद्यार्थ्यांना समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना तसेच आधुनिक सिद्धांतांची सखोल समज देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. विषयाची मांडणी शैक्षणिक दृष्टिकोनातून काटेकोरपणे करण्यात आली असून, संकल्पनांची स्पष्टता आणि भाषेची सुलभता यावर विशेष भर दिला आहे.
या ग्रंथामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे लेखांकन, उपभोग व गुंतवणूक फलन, पैशाची मागणी व पुरवठा, उत्पन्न व रोजगाराचे सिद्धांत, व्यापारचक्र व चलनवाढ यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे. प्रत्येक प्रकरणात संकल्पना, सिद्धांत, त्यांचे परिणाम आणि मर्यादा यांचे विवेचन केले असून, आवश्यक तेथे आकृती, तक्ते आणि उदाहरणांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासक्रमाशी सुसंगतता राखून विद्यार्थ्यांना विषय सहजपणे आत्मसात करता यावा यासाठी केलेली मांडणी. संकल्पनांचा मूळ अर्थ अबाधित ठेवून त्यांचे सुलभ स्पष्टीकरण दिल्यामुळे विद्यार्थ्यांना गुंतागुंतीच्या आर्थिक प्रक्रियांची समज सुलभ होते.
स्पर्धा परीक्षा, छएढ-डएढ सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा ग्रंथ उपयुक्त ठरतो. अभ्यासक्रमातील संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगण्याबरोबरच, विविध सिद्धांतांचे व्यावहारिक उपयोग आणि परिणाम यांचे विवेचन केले आहे.  प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र हा ग्रंथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यावहारिक दृष्टिकोनातून सक्षम बनवणारा, अभ्यासक्रमाशी सुसंगत आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

1. समग्रलक्षी अर्थशाखाची ओळख
1.1 समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ,स्वरूप आणि उद्दिष्टे
1.2 अलीकडील काळातील समग्रलक्षी अर्थशास्त्रातील विकास
1.3 समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्व आणि मर्यादा.
1.4 सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रातील फरक

2. राष्ट्रीय उत्पन्न आणि चक्राकार प्रवाह
2.1 राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या.
2.2 राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना
स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP),
निव्वळ देशांतर्गत उत्पादन (NDP),
स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP),
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन (NNP),
वैयक्तिक उत्पन्न (PI),
व्ययशक्य/खर्च करण्याजोगे उत्पन्न (DI),
दरडोई उत्पन (PCI)
2.3 द्विक्षेत्रीय आणि त्रिक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह (बंदिस्त अर्थव्यवस्था),
खुल्या अर्थव्यवस्थेत चार क्षेत्रीय उत्पनाचा चक्राकार प्रवाह
2.4 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती - मूल्यवर्धित पद्धत आणि खर्च पद्धत, या पद्धतीतील दोष/समस्या

3. उपभोग फलन/प्रवृत्ती
3.1 उपभोग फलनाचा अर्थ आणि उपभोग - उत्पन्न संबंध
3.2 उपभोग प्रवृतीची संकल्पना (सरासरी उपभोग प्रवृत्ती APC, सीमांत उपभोग प्रवृत्ती MPC), केन्स यांचा उपभोग प्रवृतीचा मानसशास्त्रीय सिद्धांत
3.3 केन्सच्या उपभोग फलनाचे परिणाम, उपभोग प्रवृत्तीवर परिणाम करणारे घटक
3.4 वाढत्या उपभोग प्रवृत्तीचे मापन, सापेक्ष, निरपेक्ष, कायम आणि जीवन चक्र परिकल्पना

4. गुंतवणूक फलन/प्रवृत्ती
4.1 गुंतवणूक फलनाचा अर्थ
4.2 स्वायत्त आणि प्रेरित गुंतवणूक, निवासी आणि उद्योजकीय गुंतवणूक
4.3 भांडवलाची सीमांत कार्यक्षमता/लाभक्षमता आणि गुंतवणुकीची सीमांत कार्यक्षमता
4.4 गुंतवणूक आणि भांडवलाची सीमांत कार्यक्षमता यातील सहसंबंध
4.5 गुणक तत्व
अ) गुणकाचा अर्थ आणि व्याख्या
ब) गुणकाची प्रक्रिया

5. पैशाची मागणी व पैशाचा पुरवठा
5.1 पैशाची मागणी
अ) पैशाची मागणीची संकल्पना
ब) पैशाची मागणीचे हेतू
5.2 चलन संख्यामान सिद्धांत
अ) फिशरचा दृष्टीकोन
ब) केंब्रीज दृष्टीकोन
5.3 पैशाचा पुरवठा
अ) पैशाच्या पुरवठ्याची संकल्पना
ब) पैशाच्या पुरवठ्याचा अर्थ आणि स्वरूप
क) रिझर्व बँकेची पैशाच्या पुरवठ्याची मापने (M1, M2, M3, M4)

6. उत्पादन व रोजगाराचे सिद्धांत
6.1 सनातनवादी रोजगार सिद्धांत - जे.बी.से. चा बाजार नियम
6.2 सनातन सिद्धांतावर केन्स यांची टीका
6.3 अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचा केन्स यांचा आधुनिक दृष्टीकोन
a) प्रभावी मागणीचे तत्व
6.4 एकूण मागणी फलन आणि एकूण पुरवठा फलन
6.5 मागणी आधारित उत्पादन संकल्पना

7. व्यापारचक्र आणि भाववाढ
7.1 व्यापार चक्राचा अर्थ आणि वैशिष्टे
7.2 व्यापार चक्राच्या अवस्था
7.3 चलनविस्तार/भाववाढ- अर्थ आणि भाववाढीचे प्रकार
7.4 मागणी ताणनिर्मित आणि खर्चदाबनिर्मित चलन विस्तार
7.5 चलन विस्ताराची कारणे आणि परिणाम

8. समग्रलक्षी आर्थिक धोरणे
8.1 समग्रलक्षी आर्थिक धोरणांचा अर्थ आणि वैशिष्टे
8.2 फिलिप्स वक्र
8.3 पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र
a) मुख्य संकल्पना
b) कर कपात
c) एकूण पुरवठा
8.4 लाफर वक्र

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष कला - अर्थशास्त्र (सत्र 3 व 4) (DSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!