प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र हे पुस्तक विद्यार्थ्यांना समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना सखोलपणे समजावून सांगण्यासाठी तयार केलेले आहे. आधुनिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले आहे, ज्यामुळे अभ्यासकांना संकल्पना सहज समजतील.
पुस्तकात समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख, राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याचा चक्राकार प्रवाह, रोजगार व उत्पादनाचे सिद्धांत, अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचा केन्सचा आधुनिक दृष्टिकोन, उपभोग फलन तसेच बचत-गुंतवणूक फलन या महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश आहे. प्रत्येक प्रकरणात संकल्पना, मुद्दे, आकृत्या आणि तक्ते यांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट आणि सुलभ करण्यात आला आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरण्याबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा, नेट-सेटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल. विषयाचे विवेचन शास्त्रशुद्ध, मुद्देसूद आणि सुबोध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
1. समग्रलक्षी अर्थशाखाची ओळख
(Introduction to Macro Economics)
1.1 समग्रलक्षी अर्थशास्त्र
1.2 समग्रलक्षी अर्थशास्त्रातील विकास
2. राष्ट्रीय उत्पन्न आणि चकाकार प्रवाह
(National Income Circular Flow)
2.1 राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या.
2.2 राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना
2.3 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत
2.3.1.बाजार किंमतीनुसार आणि घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न
2.3.2 राष्ट्रीय उत्पन्न मापणातील अडचणी
2.4 राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह
3. रोजगार व उत्पादनाचे सिद्धांत
(Theories of Output and Employment)
3.1 रोजगाराचा सनातन सिद्धांत- जे.बी. सेचा बाजार नियम
3.2 सनातन सिद्धांताचे सुचितार्थ.
3.3 सनातन सिद्धांतावर केन्स यांची टिका.
4. अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचा केन्सचा आधुनिक दृष्टीकोन
(Modern Keynesian Approach to Equilibrium of Economy)
4.1 केन्सचा रोजगाराचा सिद्धांत
(प्रभावी मागणीचे तत्व, पूर्ण रोजगार आणि अपूर्ण रोजगार समताल)
4.2 चलन विस्तारक अंतर आणि चलन संकोचात्मक अंतर
4.3 बचतीचा विरोधाभास
5. उपभोग फलन/प्रवृत्ती
(Consumption Function)
5.1 उपभोग फलनाचा अर्थ आणि महत्त्व
5.2 उपभोग फलन ठरविणारे घटक
5.3 उपभोग प्रवृतीची संकल्पना
5.4 केन्स याचा उपभोग प्रवृतीचा मानसशास्त्रीय सिद्धांत
6. बचत आणि गुंतवणूक फलन/प्रवृती
(Saving and investment function)
6.1 बचत प्रवृती
6.2 गुंतवणूक फलन
6.3 भांडवलाची सीमांत कार्यक्षमता/लाभक्षमता
6.4 गुणक
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
एस.वाय.बी.कॉम.(सत्र 3) साठी नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त