प्राचीन भारताचा इतिहास फक्त राजे-महाराजे, युद्धे आणि राजवटींवरच आधारित नाही, तर तो एक समृद्ध बौद्धिक आणि वैज्ञानिक परंपरा दाखवतो. या परंपरेत भूगोल विषयाला विशेष महत्त्व मिळाले आहे. या पुस्तकात प्राचीन भौगोलिक विचारसरणी आणि आर्थिक भूगोल या दोन महत्त्वाच्या अंगांचा सविस्तर अभ्यास केला आहे. आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहिर यांसारख्या महान विद्वानांनी खगोलशास्त्र, गणित आणि भूगोल क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण मानवजात समृद्ध झाली.
भारताची आर्थिक समृद्धी त्याच्या भूगोलाशी निगडित आहे. सुपीक गंगा-सिंधूची मैदाने, मोठा समुद्रकिनारा, विपुल खनिजसंपत्ती आणि व्यापारी मार्गांवरील भारताचे स्थान यामुळे तो जगातील एक प्रमुख व्यापारी व सांस्कृतिक केंद्र ठरला. हडप्पा मोहेंजोदडो सारखी प्रगत शहरे व त्यांचे नगरनियोजन याचे पुरावे आहेत. या ग्रंथात वैदिक साहित्य, पुराणे, महाकाव्ये, अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा तसेच पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा भूगोल व अर्थकारणाचे सर्वांगीण चित्र स्पष्ट होते.
1. प्राचीन भारतातील भौगोलिक विचार
1.1 प्राचीन भारतीय विद्वानांचा परिचय
1.1.1 प्राचीन भारतीय विद्वान आणि भौगोलिकशास्त्रातील त्यांचे योगदान यांचा परिचय
1.1.2 आर्यभट्ट : (इ.स. 476-550)
1.1.3 भास्कराचार्य (इ.स. 600-680)
1.2 प्राचीन भारतीय विश्वनिर्मितीशास्त्र आणि जगद्दृष्टी
1.2.1 प्राचीन भारतीय विश्वनिर्मितीशास्त्र : विश्वाची संकल्पना, कालचक्र (युगे) आणि विश्वशास्त्रीय भूगोल
1.2.2 प्राचीन ग्रंथांमध्ये दर्शविल्याप्रमाणे पृथ्वीच्या आकाराची आणि संरचनेची कल्पना
1.3 पर्यावरणविषयक दृष्टीकोन आणि पवित्र भूदृश्ये
1.3.1 प्राचीन भारतात भूगोल आणि धर्म यांचा परस्परसंबंध
1.3.2 प्राचीन भौगोलिक विचारात नद्या, पर्वत आणि जंगलांचे महत्त्व
2. प्राचीन भारतातील आर्थिक भूगोल
2.1 व्यापार, वाणिज्य आणि भूगोल
2.1.1 प्राचीन भारतीय व्यापार जाळ्यांचा भौगोलिक आधार.
2.1.2 महत्त्वाचे व्यापारी मार्ग : मध्य आशिया, आग्नेय आशिया आणि भूमध्य समुद्राशी भारताला जोडणारे स्थलीय आणि समुद्री मार्ग.
2.1.3 प्राचीन भारतीय संस्कृतीच्या आर्थिक समृद्धीत भूगोलाची भूमिका
2.2 नागरी नियोजन आणि वस्तीचे स्वरूप
2.2.1 प्राचीन शहरांची भौगोलिक रचना
2.2.2 प्राचीन ग्रंथ आणि पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यांमध्ये दिसणारे नागरी नियोजनाचे तत्त्वे
2.2.3 भूगोल आणि नागरी केंद्रांच्या विकासातील परस्परसंबंध
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
एस.वाय.बी.ए. (सत्र 3) भूगोल (IKS) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक