भूगोल हा विषय केवळ नकाशे, प्रदेश किंवा पर्यावरणापुरता मर्यादित नसून मानवाच्या सांस्कृतिक आणि वैज्ञानिक वारशाशी घट्ट जोडलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय विद्वानांचे खगोलशास्त्रीय व गणितीय योगदान, ब्रह्मांडशास्त्र, विश्वदृष्टी, धार्मिक व पवित्र भूभागाशी असलेले निसर्गाचे संबंध तसेच प्राचीन भारतातील आर्थिक भूगोलाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे पृथ्वी व ब्रह्मांडाविषयीचे विचार, नद्या-पर्वतांचे सांस्कृतिक महत्त्व, व्यापारमार्गांचा भौगोलिक पाया, तसेच हडप्पा-मोहेंजोदडो ते लोथल-कालीबंगा या नगररचनांचा अभ्यास करून भौगोलिक दृष्टिकोनाची ऐतिहासिक परंपरा समजून घेता येईल.
🎯 पुस्तकाची वैशिष्ट्ये
-
अभ्यासक्रमाशी सुसंगत व सोपी मांडणी
-
प्राचीन भारतीय विद्वानांचे भूगोलातील योगदानाचे विवेचन
-
आर्थिक भूगोलातील व्यापार-जाळे व शहरी नियोजनाचा सखोल आढावा
-
परीक्षाभिमुख उदाहरणे, संदर्भ व मुद्देसूद विवेचन
हे पुस्तक SYBA (सत्र-III) GG-213 (DSC-9) अभ्यासक्रमाशी सुसंगत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून तयार केलेले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजावून घेण्यासाठी, परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्राचीन भारताच्या भौगोलिक वारशाविषयी अभिमानाची जाणीव करून देण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
1. प्राचीन भारतातील भौगोलिक विचार
(Geographical Thought in Ancient India)
1.1 प्राचीन भारतीय विद्वानांची ओळख
अ) प्राचीन भारतीय विद्वान व त्यांचे भूगोलातील योगदान
1.1.1 आर्यभट्ट (इ.स. 476-550) यांचे भौगोलिक योगदान
1.1.2 भास्कराचार्य (प्रथम) यांचे भौगोलिक योगदान
(इ.स. 600 ते 680)
1.2 ब्रह्मांडशास्त्र आणि विश्वदृष्टी
1.2.1 प्राचीन भारतीय ब्रह्मांडशास्त्र : विश्वाची संकल्पना,
कालचक्र (युगे) व विश्वविद्याशास्त्रीय भूगोल
1.2.2 पृथ्वीचा आकार व संरचनेची संकल्पना : प्राचीन भारतीय
ग्रंथांतील मांडणी
1.3 प्राचीन भारतातील पर्यावरणाची समज आणि पवित्र भूभाग
1.3.1 भूगोल आणि धर्म यांतील परस्परसंबंध
1.3.2 नद्या, पर्वत व अरण्यांचे महत्त्व
2. प्राचीन भारतातील आर्थिक भूगोल
(Economic Geography in Ancient India)
2.1 व्यापार, वाणिज्य आणि भूगोल
2.1.1 प्राचीन भारतीय व्यापार जाळ्याचा भौगोलिक आधार
2.1.2 प्राचीन भारताचे व्यापारमार्ग
2.1.3 प्राचीन भारतीय संस्कृतींच्या आर्थिक समृद्धीत भूगोलाची
भूमिका
2.2 शहरी नियोजन आणि वसाहतीचे आकृतीबंध
2.2.1 प्राचीन शहरांचे भौगोलिक आराखडे : हडप्पा, मोहेंजोदडो,
लोथल, कालीबंगा
2.2.2 प्राचीन ग्रंथ आणि पुरातात्त्वीय पुराव्यांमधील शहरी
नियोजनाचे तत्त्व
2.2.3 भूगोल आणि शहरी केंद्रांच्या विकासातील संबंध
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
एस.वाय.बी.ए. (सत्र 3) भूगोल (DSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक