पत्रसंवाद

Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9788198915795
Year: 2025
Pages: 106

‘पत्रसंवाद’ हा अरुणकुमार जोशी यांचा पत्रसंग्रह वाचकांना समाजहितार्थ चिंतनशील विचारांची दिशा दाखवतो. दैनंदिन वर्तमानपत्रातील बातम्या, लेख वाचून त्यावर तटस्थ वृत्तीने केलेले चिंतन आणि त्यातून व्यक्त झालेली सामाजिक जाणीव ही या पत्रांची मूळ प्रेरणा आहे. या संग्रहातील एकही पत्र हे वैयक्तिक नातेसंबंधासाठी लिहिलेले नाही, तर समाजहितासाठीच लिहिलेले आहे. म्हणूनच संपादकांनी त्यांना प्रसिध्दीसाठी स्थान दिले आणि वाचकांनी त्यांचा स्वीकार केला.

जोशींच्या पत्रलेखनात संवेदनशीलता, तर्कशुद्धता आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम दिसतो. ‘पत्रसंवाद’ वाचताना वाचकाला जाणवते की प्रत्येक पत्र हे एका विचारवंताचे समाजाशी साधलेले संवाद आहे. यातून वाचकांना ‘‘हे खरं आहे, असं व्हायला नको होतं, असं व्हायलाच हवं’’ अशा प्रतिक्रिया उमटतात आणि विचारांची नवी दालने खुली होतात.

या पत्रसंग्रहाबरोबरच ‘अंतर्मनातील एकान्त स्वर’ हा कवितासंग्रहही प्रकाशित होत आहे. दोन्ही ग्रंथ वाचकांना चिंतन, संवेदनशीलता आणि साहित्यिक आनंदाचा अनुभव देतील. अरुणकुमार जोशी यांच्या या अक्षरसाधनेला शुभेच्छा!

1. निर्मात्याविषयी प्रतारणा नको
2. देव लेकुरवाळा !
3. कट उघड झाला, हे महाभाग्य !
4. मानसिकता शाबूत राखली पाहिजे.
5. संभ्रमातूनच होताहेत युवक सैरभैर
6. चिंतनातूनच कार्यसिध्दी
7. चिंतनातूनच प्रेरणा
8. संवेदनशील मनाला गरज शांततेची !
9. अंतर्मनही स्वच्छ-सुंदर असावे
10. विनयशीलता राखण्याचं भान यावं !
11. निरागस भाव ठरतील कळस
12. कलेचे माहात्म्य
13. वय आणि प्रगती
14. ‘काटेरी’ वाटेतून जीवनमार्ग !
15. स्वत:ला बदलाची अपेक्षा हवी
16. मानसिकता तत्पर हवी
17. माणसाची मानसिकता
18. माणूस म्हणून नांवारूपास यावे
19. समाज जीवनाची मानसिकता बदलण्याची गरज
20. विचारांची दालने खुली.....

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!