पर्यटन भूगोल

Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373446615
Year: 2025
Pages: 82

अत्यंत पूव पासून मानव आपल्या सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या साधनसंपत्तीचा वापर करून आपल्या स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. मग त्यात आपला आर्थिक विकास असेल सामाजिक असेल किंवा भौगोलिक असेल या सर्व अंगाने मानव उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर आपल्या स्वतःच्या व्यवसायाला प्रगतिशील करण्यासाठी करत आलेला आहे. संपूर्ण पृथ्वीवर साधन संपत्तीचे वितरण देखील असमान आहे त्याचा वापर स्थळ काल परत्वे प्रत्येक मानव आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने आणि आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे करत आलेला आहे. 
पर्यटन ही मानवी भूगोलाची उपयोजित शाखा विसाव्या शतकाच्या मध्यंतरापासून प्रगत झालेली दिसून येते. पूव पासून मानवाला प्रवास करणे हे जीवन जगत असताना अत्यावश्यक बाब समजली जाते. पुरी पासून प्रत्येक माणूस आपला जीवनाचा आनंद घेण्यासाठी नवीन स्थळांना भेट देणे, धार्मिक स्थळांची भेटी देऊन आत्मिक आनंद शोधणे, व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांना भेट देणे किंवा नवीन प्रदेश शोधण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक विविध उद्देशाने माणूस हा प्रवास करत राहिला आणि त्यामधून पर्यटन ही आधुनिक संकल्पना उदयाला आली. खऱ्या अर्थाने पर्यटन हा शब्द तेराव्या शतकापासून प्रचलित झालेला असून विशिष्ट उद्देशाने प्रवास करून ठराविक ठिकाणी परत आला म्हणजे त्याला पर्यटन म्हणतात अशी संकल्पना त्या काळात उदयास आली. या उद्देशाने अत्यंत सर्वंकषपणे पर्यटन भूगोलाचा अभ्यास या पुस्तकात मांडण्याचा लेखकांनी प्रयत्न केला आहे.

1. पर्यटनाच्या भूगोलाचा परिचय
(Introduction to Geography of Tourism)
1.1 पर्यटनाची प्रस्तावना
1.1.1 पर्यटनाचा अर्थ आणि व्याख्या
1.1.2 पर्यटनची व्याख्या आणि प्रकार
1.1.3 पर्यटन व्यवसायाचे महत्त्व व फायदे
1.1.4 पर्यटनाची गुणवैशिष्ट्ये
1.1.5 पर्यटनचे विविध ट्रेंड
अ. ग्रामीण पर्यटन, ब. कृषी पर्यटन, क. साहसी पर्यटन,
ड. शैक्षणिक पर्यटन, इ. आरोग्य आणि वैद्यकीय पर्यटन
1.2 पर्यटनाचे प्रकार
1.2.1 राष्ट्रीयत्वाच्या आधारावर केलेले पर्यटनाचे वगकरण
1.2.2 प्रवास अंतराच्या आधारावर केलेले पर्यटनाचे वगकरण
1.2.3 प्रवासी संख्येच्या आधारावर केलेले पर्यटनाचे वगकरण
1.2.4 पर्यटनाच्या हेतूवर आधारावर केलेले पर्यटनाचे वगकरण.
1.3 पर्यटन भूगोलाची प्रस्तावना
1.3.1 पर्यटन भूगोलाची व्याख्या
1.3.2 पर्यटन क्षेत्रात भूगोलाची महत्त्वाची भूमिका
1.4 पर्यटन भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती

2. पर्यटनावर परिणाम करणारे घटक
(Factor Affecting on Tourism)
2.1 पर्यटन क्षेत्रावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक
2.1.1 भौगोलिक स्थान
2.1.2 सुलभता
2.1.3 अंतराळ पर्यटन
2.1.4 निसर्गातील भुरूप
2.1.4 हवामान
2.1.6 नैसर्गिक वनस्पती
(अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाच्या दृष्टिकोनातून)
2.2 पर्यटनावर परिणाम करणारे सामाजिक व सांस्कृतिक घटक
2.2.1 धार्मिक घटक
2.2.2 ऐतिहासिक अवशेष
2.2.3 क्रीडा
2.2.4 परंपरा आणि उत्सव
2.2.5 नृत्य व संगीत
2.3 पर्यटनावर परिणाम करणारे आर्थिक घटक
2.3.1 वाहतूक सुविधा
2.3.2 औद्योगीकरण
2.3.3 निवास
2.3.4 हॉटेल

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, एस.वाय.बी.ए. (सत्र 3) भूगोल (DSC) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!