मूल्यनिर्धारण व मूल्यमापन

Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373442815
Year: 2026
Pages: 254

शिक्षणप्रक्रियेत अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन हे तीन घटक परस्परावलंबी असून गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य करण्यासाठी त्यांचा समन्वय आवश्यक आहे. अध्यापनाचे खरे फलित विद्यार्थ्यांच्या अध्ययनातून कितपत साध्य झाले आहे, याचे शास्त्रशुद्ध परीक्षण म्हणजेच मूल्यमापन. आधुनिक शिक्षणपद्धतीत मूल्यमापन केवळ परीक्षांपुरते मर्यादित न राहता अध्ययनासाठी, अध्ययन म्हणून आणि अध्ययनाचे मूल्यमापन या व्यापक दृष्टिकोनातून पाहिले जाते.
हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमातील विद्याथ, कार्यरत शिक्षक तसेच शैक्षणिक संशोधक यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. यात मापन, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन या संकल्पनांचा सखोल उलगडा, शैक्षणिक उद्दिष्टे व अध्ययन निष्पत्ती, ब्लूमचे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वगकरण, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नंतर झालेल्या बदलांचा सविस्तर आढावा घेतला आहे.
पुस्तकात मूल्यमापनाची विविध तंत्रे व साधने, क्षमताधारित व संचिका मूल्यनिर्धारण, तसेच Google Forms, Kahoot, Quizizz, Mentimeter, Padlet यांसारख्या आधुनिक डिजिटल साधनांचा व्यवहार्य उपयोग स्पष्ट केला आहे. स्वयं व सहाध्यायी मूल्यमापन, रुब्रिक व समग्र प्रगतीपत्रक यांचा प्रत्यक्ष शालेय व्यवहाराशी निगडित अभ्यास करण्यात आला आहे. याशिवाय सांख्यिकीतील केंद्रीय प्रवृत्ती, विचलनशीलता, सहसंबंध व प्रसामान्य वक्र यांचा सुलभ व उदाहरणाधारित अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे.
हे पुस्तक वाचकांना केवळ सैद्धांतिक ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांना परिणामकारक, विद्याथ-केंद्रित व आधुनिक मूल्यमापन पद्धती आत्मसात करण्यास सक्षम करते. शिक्षकांनी या पुस्तकाचा उपयोग करून आपल्या अध्यापनात मूल्यमापनाला योग्य स्थान दिल्यास शिक्षणप्रक्रिया अधिक अर्थपूर्ण, आनंददायी व फलदायी बनेल.
हे पुस्तक म्हणजे आधुनिक शिक्षणातील मूल्यमापनाची सखोल समज आणि व्यवहार्य मार्गदर्शन देणारा विश्वासार्ह साथीदार!

1. मूल्यमापन संकल्पना व प्रक्रिया
1.1 शिक्षणातील मापन, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन संकल्पना व संबंध व मूल्यनिर्धारणाची तत्त्वे
1.2 शैक्षणिक उद्दिष्टे व अध्ययन निष्पत्ती - अध्यापन अध्ययन क्रियेतील महत्त्व व ते लिहिण्याचे निकष
1.3 डॉ. ब्लूम यांचे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वगकरण - ब्लूमच्या व ठक दवे व अँडरसन यांची सुधारित रचना व महत्त्व
1.4 अध्ययन अनुभूतिचे प्रकार व अध्ययन अनुभूति निवडण्याचे निकष - अध्ययन अनुभूति म्हणजे काय? - अध्ययन अनुभूतिचे प्रकार - अध्ययन अनुभूतिंचे स्त्रोत
1.5 शैक्षणिक उद्दिष्टे, अध्ययन अनुभूति, आशय व मूल्यमापन यातील परस्परसंबंध - उद्दिष्टे - उद्दिष्टांचे प्रकार - आशय - अध्ययन अनुभूति - मूल्यमापन
1.6 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व मूल्यमापन ठळक मुद्दे व प्रमुख बदल

2. मूल्यमापनाची तंत्रे व साधने
2.1 मूल्यमापन साधनांची वैशिष्टये - सप्रमाणता - विश्वसनीयता - वस्तुनिष्ठता - पर्याप्तता - व्यवहार्यता - भेदभावक्षमता
2.2 मूल्यमापनाची तंत्रेव साधने -
2.3 क्षमताधारित मूल्यनिर्धारण आणि संचिका मूल्यनिर्धारण
2.4 मूल्यनिर्धारणाची डिजिटल साधने - गुगल फॉर्मस - कहूत - क्विझिझ - मेंटीमीटर - पॅडलॅट - एङपझल
2.5 गुणात्मक, संख्यात्मक व डिजिटल तंत्राच्या वापरातील समस्या व दक्षता
2.6 परख - स्वाध्याय

3. अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण
3.1 मूल्यनिर्धारणाचे महत्त्व - गरज - उद्दिष्टे - नीतीतत्त्वे -
3.2 (अ) आकारिक मूल्यनिर्धारण - महत्त्व - साधने - दैनंदिन निरीक्षण - तोंडी काम - प्रात्यक्षिके - विविध उपक्रम व कृती - प्रकल्प - स्वाध्याय - कालिक चाचण्या - प्रासंगिक नोंदी व संकलित नोंदपत्रक - आकारिक मूल्यनिर्धारणाचे फायदे - समाकलित मूल्यनिर्धारण - फायदे
3.2 (ब) बोधात्मक, भावात्मक, व क्रियात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण - प्रासंगिक नोंदी - अभिरुची शोधिका - अभिवृत्ती मापन - व्यक्तिमत्त्व चाचणी -
3.2 (क) - स्वयं मूल्यनिर्धारण - कशासाठी? - कार्यवाही - वैशिष्टये - फायदे - मर्यादा - सहाध्यायी मूल्यनिर्धारण - कशासाठी? - कार्यवाही - फायदे - मर्यादा
3.3 मूल्यनिर्धारणासाठी वापरली जाणारी नोंदपत्रके
अ) मूल्यमापन रुब्रिक - स्वरूप - महत्त्व - प्रकार - वैशिष्ट्ये - वापराच्या मर्यादा
ब) संकलित नोंदपत्रक - प्रास्ताविक - नमुना
क) संचिका (पोर्टफोलिओ) - संकल्पना - स्वरूप - प्रकार - संचिकेची वैशिष्टये - हेतू - प्रकार - मूल्यमापन साधन म्हणून मर्यादा
ड) समग्र प्रगती पत्रक - प्रास्ताविक - व्याख्या - हेतू व उद्दिष्टे - वैशिष्टये - स्तरनिहाय समग्र प्रगतीपत्रक - समग्र प्रगतिपत्रकाचे महत्त्व - गरज - समग्र प्रगतिपत्रकाचे घटक
3.4 परीक्षा सुधारणा
अ) - सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन - अर्थ व स्वरूप - हेतू - कार्ये - वैशिष्ट्ये - साधने - मूल्यमापन श्रेणी योजना - शिक्षकाची भूमिका - फायदे - मर्यादा
ब) निवड आधारित श्रेयांक प्रणाली - पाश्वभूमी - कशासाठी - सत्र परीक्षा पद्धतीचा स्वीकार - श्रेयांक प्रणालीचा स्वीकार - श्रेयांक म्हणजे काय? - श्रेयांक व गुण यातील संबंध - आंतर विद्याशाखा श्रेयांक व भारांश निश्चिती - अध्ययन अध्यापनात सुधारणा - निवा आधारित श्रेयांक प्रणाली व मूल्यमापन - श्रेणीपद्धती - मर्यादा
क) ऑनलाईन परीक्षा संकल्पना - गरज - स्वरूप - आयोजन
ड) ऑन डिमांड परीक्षा - स्वरूप - परीक्षा पद्धत - दक्षता, स्वाध्याय

4. चाचण्यांच्या गुणांचे अर्थनिर्वचन
4.1 केंद्रीय प्रवत्तीची परिमाणे - मध्यमान, मध्यांक ‌‘बहुलक - अर्थ गणन वैशिष्टये व उपयोग, केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय?
4.2 विचलनशीलत्वाची परिमाणे
4.3 शतनमक व शतमकक्रम - संकल्पना - शततमकाच्या किंमती काढणे - शततमक क्रम - शततमकाच्या मर्यादा
4.4 सहसंबंध गुणक - सहसंबंधाचे प्रकार -
4.5 माहितीचे आलेखात्मक चित्रण
4.6 प्रसामान्यवक्र - संकल्पना - प्रसामान्य वक्राचे गुणधर्म - प्रसामान्य वक्राचे उपयोग

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!