“आई” हा शब्द जसा छोटा, तसा त्यामध्ये सामावलेलं विश्व अनंत आहे. हे पुस्तक म्हणजे एका मुलाने आपल्या आईच्या आयुष्याचं प्रतिबिंब शब्दांत जपलेलं आहे. रोहिणी हिरालाल वाघ ते रोहिणी ज्ञानेश्वर पवार—हा प्रवास फक्त नात्यांचा नाही, तर जिद्दीचा, प्रेमाचा आणि श्रद्धेचा आहे.
लेखकाने या पुस्तकात 15 लेख, 20 कविता आणि आठवणींची डायरी लिहून आईच्या आयुष्याचं एक जिवंत चित्र उभं केलं आहे. आईचं मूक प्रेम, तिच्या अदृश्य लढाया, तिचं घरासाठी झिजणं, आणि तिच्या ओठांवर कायमचं असणारं हसू—हे सगळं या पानांमध्ये जपलेलं आहे.
हे पुस्तक समीक्षण नाही, साहित्यिक प्रयोग नाही—हे एका मुलाचं आपल्या आईसाठीचं अर्पण आहे. आईने दिलेल्या आयुष्याचं ऋण शब्दांनी फेडण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक लेख, प्रत्येक कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करेल आणि आईच्या प्रेमाचा सुगंध त्यांच्या हृदयात दरवळेल.
1. बालपण आणि माहेर
2. लग्न आणि नवीन संसार
3. आई - प्रेमाचं मूर्त रूप
4. आई आणि तिच्या आईचं नातं - एक अतूट बंध
5. आईचा धार्मिक स्वभाव आणि श्रद्धेचा दीप
6. आई - आजची रणरागिणी
7. आई आणि आम्ही - एक जिव्हाळ्याचं नातं
8. आईचं आयुष्य - एक प्रेरणादायी जिद्द
9. आई - आजच्या जगात प्रेरणादायी स्त्री
10. आई - माझ्या आयुष्याचं केंद्रबिंदू
11. आईच्या आठवणी माझ्या हृदयातली जपलेली चित्रं
12. आईसाठी एक पत्र तिच्या चरणांमध्ये माझं आयुष्य
13. आई - देवाचं भांडार जमिनीवर
14. माझी आई - रोहिणी हिरालाल वाघ ते रोहिणी ज्ञानेश्वर पवार
15. आई - माझं अंतिम उत्तर
कविता संग्रह ...
1. माझी आई विल्हाळ्याच्या वाऱ्यातली गंध
2. ती रात्र... जिथे मी आणि आई दोघं जागत होतो
3. आई आणि आजी - दोन देह, एकच आत्मा
4. आईच्या ओंजळीतील देव
5. आईचं मौन तिचं सर्वात मोठं भाष्य
6. आई आणि तिचा दररोजचा दिवस
7. सायली आणि आई दोन मैत्रिणी
8. आई आणि तिची आतली लढाई
9. आई, तुझ्यासाठीच हे पुस्तक
10. आईचा पदर - झोपेचा गोधडीसारखा
11. आईच्या पावलांचे ठसे
12. आई आणि घरचा आवाज
13. सगळं देत गेली
14. आई माझं अंतिम उत्तर
15. आई, तुला अर्पण...
16. आई आणि तिचं हसू-तुझ्या दु:खावर फुंकर घालणारं
17. आईचा स्वयंपाक प्रेमाच्या रांधणाचा वास
18. आई आणि आठवणीतली आजी
19. आई आणि तिचं टिकून राहणं
20. आई - अखंड प्रकाश
आईच्या आठवणींची डायरी ...
1. त्या वेळचा सुगंध आजही हवेत आहे
2. वरणभात, पाऊस आणि नॉडी
3. आईचा मजेशीर पंगा
4. मुंबईतलं धाडस आणि आईची साथ
5. शेवटी आठवणीच गाठोडं.