मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण हे पुस्तक आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. आजच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. शाळेत येणारा प्रत्येक विद्याथ वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला असतो. त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच सामाजिक स्थिती वेगळी असते. या विविधतेचा विचार करून शिक्षकाने अध्यापन करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकाला मार्गदर्शन व समुपदेशनाचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.
या पुस्तकात शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची संकल्पना, उद्दिष्टे व प्रक्रिया, शालेय मार्गदर्शन समितीची भूमिका व कार्य, समुपदेशनाचे प्रकार, तत्वे व प्रक्रिया, विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन, समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे व सामाजिक फायदे, शिक्षकाची सज्जता, जबाबदाऱ्या व व्यावसायिक नीती, विविध गरजा असणाऱ्या बालकांचे शैक्षणिक व सामाजिक प्रश्न तसेच सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या बालकांच्या समस्या व उपाययोजना यांचा सखोल विचार केलेला आहे.
लेखकांनी या सर्व पैलूंचा सुसंगत व सर्वसमावेशक आढावा घेतला असून हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर कसा करावा याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते.
1. शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शनाचे आकलन (Understanding Edcational and Career Guidance)
मार्गदर्शनाचा अर्थ आणि स्वरूप
करियर मार्गदर्शनाची उद्दिष्टे
करियर मार्गदर्शनाची व्याप्ती
करियर मार्गदर्शनाची प्रक्रिया
2. शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमातील आवश्यक सेवा
(Essential Services in Educational Guidance Programme)
मार्गदर्शन सेवा प्रकार
मार्गदर्शनाची उद्दिष्टे
शालेय मार्गदर्शन समिती शिक्षण
शालेय मार्गदर्शन समितीची भूमिका व कार्य
शालेय अभ्यासक्रमात मार्गदर्शनाचे स्थान
शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात मुख्याध्यापक शिक्षक यांची भूमिका
3. समुपदेशन
(Understanding Counseling)
समुपदेशनाचा अर्थ
समुपदेशनाचे मुख्य उद्दिष्ट
मार्गदर्शन आणि समुपदेशन यातील संबंध
समुपदेशनाची तत्वे समुपदेशन प्रक्रियेचे टप्पे
4 मार्गदर्शन आणि समुपदेशनाचे प्रकार
(Types and Guidance and Counseling)
मार्गदर्शनाचे प्रकार
व्यावसायिक मार्गदर्शनाची व्याप्ती व मर्यादा
विद्यार्थ्यांसाठी समूह प्रक्रियेचे उपयोग
समुपदेशनाचे क्षेत्रे
विशेष गरज असलेल्या बालकांचे समुपदेशन
समवयस्क समुपदेशनाचे उद्दिष्ट
5. समावेशक शिक्षणाची ओळख
(Introduction to Inclusive Education)
समावेशक शिक्षणाची संकल्पना
समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये
समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे
समावेशक शिक्षणाची व्याप्ती
समाजासाठी समावेशक शिक्षणाचे फायदे
विशेष शिक्षण, एकात्मिक शिक्षण व समावेशक शिक्षण यातील फरक
अपंगांसाठी राष्ट्रीय धोरण 2006 च्या शिफारशी
6. समावेशक शिक्षणासाठी शिक्षक सज्जता
(Teacher Preparation for Inclusive Education)
समावेशक वातावरणात माध्यमिक शिक्षणासाठी शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षकांची क्षमता
समावेशक शिक्षणात शिक्षकाच्या भूमिका
समावेशक शिक्षणात शिक्षकाच्या जबाबदाऱ्या
समावेशक शिक्षणातील शिक्षकाची व्यावसायिक नीती तत्वे
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005
बोधात्मक व्यतिरिक्त इतर निष्पत्तीच्या समावेशक मूल्यमापनासाठी मूलभूत साधने
समावेशक शिक्षणातील संशोधनाचे नवीन प्रवाह
समावेशक शिक्षणातील आधारभूत सेवा
7. विविध गरजा असणारी बालके आणि संसाधनाचे उपयोग
(Children with Diverse Needs and Utilization of Resources)
अपंग बालकांचे वैशिष्ट्ये
श्रवणदोष असणाऱ्या बालकांची वैशिष्ट्ये
दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्ये
विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले बालके व्याख्या व वैशिष्ट्ये
समावेशक शाळेतील कार्यनीती
पर्यावरणीय समस्या असलेली बालकांची वैशिष्ट्ये
समावेशक शिक्षणात पालकांच्या जबाबदाऱ्या
समावेशक शिक्षणात वैयक्तिक सहभाग म्हणून शिक्षकांच्या जबाबदाऱ्या
8. भारतातील सामाजिक दृष्ट्या मागासलेली बालके :
दर्जा आणि सुविधा
(Socially Disadvantaged Children in India: Status and Provisions)
सामाजिक दृष्ट्या मागासलेले बालके अर्थ व शिक्षणातील दृष्ट्या मागासलेले घटक
अनुसूचित जातीच्या शिक्षणातील समस्या व उपाययोजना
शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले अल्पसंख्यांक संकल्पना
झोपडपट्टीत राहणाऱ्या बालकांच्या समस्या
शिक्षणाच्या समान संधीसाठी संविधानात्मक तरतुदी
1986 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे
1992 च्या कृती कार्यक्रमाचे मुख्य घटक
नवीन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे
सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या बालकांची संपादणूक
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ