मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 - 1818)

Rs. 297.00
Rs. 330.00
Rs. 297.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373442143
Year: 2025
Pages: 218

‘मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 - 1818)’ हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याच्या घडामोडींची सखोल आणि सर्वांगीण माहिती मिळावी या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रच नव्हे, तर त्यांच्या पश्चात घडलेल्या राजकीय, लष्करी आणि सामाजिक घडामोडींचाही परिचय व्हावा, अशी आमची भावना आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक इतिहासाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपल्या राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अभिमान बाळगावा, हीच या पुस्तकाची प्रेरणा आहे. शिवचरित्राच्या सांगोपांग माहितीबरोबरच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर या ग्रंथात विशेष प्रकाश टाकण्यात आलेला आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना या काळातील संकटांचा, संघर्षांचा आणि मराठी सामर्थ्याचा प्रत्यय अनुभवता यावा, तसेच अभ्यासात नव्या दृष्टीकोनाची जाण निर्माण व्हावी, हा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. सहसा क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये न येणारी, पण संशोधनाधारित आणि संदर्भयुक्त माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, त्यांच्या इतिहासाविषयीच्या जिज्ञासेला चालना देईल आणि मराठा इतिहासाविषयी अभिमानाची भावना दृढ करेल.

1. मराठा सत्तेचे साधने आणि उदय
(Sources and Rise of the Maratha Power)
1.1 साहित्यिक साधने : मराठी आणि परदेशी स्रोत
1.2 मराठा शक्तीच्या उदयाची पार्श्वभूमी
1.3 शहाजी राजे, राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रारंभिक जीवन

2. स्वराज्याची स्थापना ते राज्याभिषेकापर्यंत
(Foundation of Swarajya to the Coronation)
2.1 दख्खन सत्तेशी संबंध : जावळी आणि अफझल खान प्रकरण आणि त्याचे महत्त्व
2.2 मुघलांशी संबंध : शाइस्ताखानची मोहीम, सुरतची तोडफोड, जयसिंगची मोहीम, आग्रा भेट
2.3 राज्याभिषेक आणि कर्नाटक मोहीम

3. प्रशासन आणि अर्थव्यवस्था
(Administration and Economy)
3.1 न्यायिक, नागरी आणि लष्करी प्रशासन
3.2 शेती, व्यापार आणि चलन
3.3 उत्पन्न-खर्च

4. मराठा स्वातंत्र्ययुद्ध
(Maratha War of Independence)
4.1 छत्रपती संभाजी महाराज : सत्तेचे एकत्रीकरण, मुघलांशी संबंध
4.2 छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई
4.3 संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि रामचंद्रपंत अमात्य

5. मराठा सत्तेचे दृढीकरण व विस्तार
(Consolidation and Expansion of the Maratha Power)
5.1 महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज
5.2 बाळाजी विश्वनाथ-स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा
5.3 बाजीराव पहिला - दक्षिण व उत्तरेकडील मोहिमा

6. मराठा सत्तेचे दृढीकरण
(Strengthening of the Maratha Power)
6.1 मराठा मंडळ आणि मराठा सत्तेचा विस्तार
6.2 बाळाजी बाजीराव (नानासाहेब) - दक्षिणेतील धोरण आणि आंग्रे व भोसले यांच्याशी संबंध :
6.3 पानिपतची तिसरी लढाई : कारणे आणि परिणाम, मराठ्यांच्या पराभवाची कारणे

7. पानिपत युद्धानंतरचा काळ
(Post Panipat Period)
7.1 माधवराव पहिला : दक्षिणी आणि उत्तरी धोरण
7.2 बारभाई मंडळ
7.3 इंग्रज-मराठा युद्धे आणि मराठा सामर्थ्याचा अस्त

8. प्रशासन आणि अर्थव्यवस्था
(Administration and Economy)
8.1 नागरी, लष्करी आणि न्यायव्यवस्था
8.2 शेती, उद्योग, व्यापार आणि बँकिंग
8.3 समाज - जात व्यवस्था आणि महिलांचे स्थान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - इतिहास (सत्र 3 व 4) (Major) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!