भाषा : स्वरूप व लेखन

Rs. 158.00
Rs. 175.00
Rs. 158.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9788199054165
Year: 2025
Pages: 134

भाषा : स्वरूप व लेखन हे पुस्तक मराठी भाषेच्या मूलभूत अभ्यासावर प्रकाश टाकते. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती मानवी संस्कृती, विचार आणि संवेदनांचा आरसा आहे. या पुस्तकात भाषेचे स्वरूप, तिची निर्मिती, मानवी जीवनातील स्थान, तसेच बोलीभाषांचे वैविध्य यांचे सुलभ विवेचन केले आहे. वऱ्हाडी, मालवणी, कोकणी, अहिराणी, तावडी, दख्खनी अशा विविध बोलींच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवरही विचार करण्यात आला आहे.

पुस्तकात प्रमाणभाषेचे शास्त्रशुद्ध स्वरूप, तिची आवश्यकता आणि बोलीभाषांशी असलेले साम्य-भेद स्पष्ट केले आहेत. आधुनिक लेखनशैलीत विरामचिन्हांचा नेमका उपयोग कसा करावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच परिभाषेचे शुद्ध व तांत्रिक स्वरूप, विविध क्षेत्रांतील पारिभाषिक संज्ञा आणि आधुनिक परिभाषेची उपयुक्तता यांचे विवेचन केले आहे.

देवनागरी लिपीची ओळख, तिची वैशिष्ट्ये, उच्चारण व लेखनातील संबंध आणि मराठी लिपीसमोर असलेली आव्हाने यांचा सविस्तर आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि भाषाप्रेमींना मराठी भाषेचे स्वरूप, तिचे शास्त्र आणि व्यवहारातील स्थान समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

1. मराठी भाषा : स्वरूप व लेखन
1.1 मराठी भाषेचे स्वरूप व निर्मिती
1.2 भाषेची आवश्यकता
1.3 भाषेचे मानवी जीवनातील स्थान
1.4 भाषानिर्मिती विषयक विविध उत्पत्ती

2. बोलीभाषा
2.1 बोलीभाषा म्हणजे काय?
2.2 मराठीच्या विविध बोली
1. कोकणी बोली
2. वऱ्हाडी बोली
3. अहिराणी बोली
4. मालवणी बोली
5. तावडी बोली
6. दख्खनी बोली

3. प्रमाणभाषा
3.1 प्रमाणभाषा म्हणजे काय?
3.2 प्रमाणभाषेची आवश्यकता
3.3 प्रमाणभाषेचे स्वरूप
3.4 प्रमाणभाषेचे नियम
3.5 बोलीभाषा आणि प्रमाणभाषा : साम्य भेद

4. मराठीतील विरामचिन्हे
4.1 मराठीतील विरामचिन्हे
4.2 विरामचिन्हांची संकल्पना
4.3 विरामचिन्हांचा लेखनात उपयोग

5. परिभाषा म्हणजे काय?
5.1 परिभाषा म्हणजे काय?
5.2 विविध विषयांतील परिभाषा
5.3 परिभाषेचे महत्त्व
5.4 पारिभाषिक शब्द म्हणजे काय?
5.5 आधुनिक क्षेत्रांतील पारिभाषिक संज्ञा
5.6 विविध क्षेत्रीय परिभाषा

6. मराठीची लिपी
6.1 देवनागरी लिपीची ओळख
6.2 देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य
6.3 मराठी लिपीच्या समोर असलेली आव्हाने
6.4 मराठीच्या लिपीचे उच्चारण व लेखन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‌‘द्वितीय वर्ष कला - मराठी (OE)‌’ विषयाच्या नवीन NEP अभ्यासक्रमावर आधारित

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!