मराठी अध्यापनशास्त्र (भाग 2)

Rs. 200.00
Rs. 250.00
Rs. 200.00
(-20%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373440330
Year: 2026
Pages: 182

मराठी अध्यापनशास्त्र हे पुस्तक बदलत्या शैक्षणिक परिप्रेक्ष्यात मराठी भाषेचे अध्यापन अधिक सुसंगत, अनुभवाधारित आणि विद्याथकेंद्रित बनविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करून मातृभाषेतून शिक्षण, बहुभाषिकतेचा पुरस्कार आणि भाषिक कौशल्यांचा विकास यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या पुस्तकात वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठयोजना, ज्ञानरचनावाद, मूल्यमापनाच्या विविध पद्धती, अभ्यासक्रम व पाठ्यक्रमातील फरक, पाठ्यपुस्तकांचे चिकित्सक परीक्षण, तसेच भाषेची विविध कौशल्ये यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. शाब्दिक व अशाब्दिक अध्ययन अनुभव, अभ्यासानुवत उपक्रम, वाड्मय मंडळ, व्याकरण अध्यापन, लेखनकौशल्ये आणि कृतिसंशोधन यांसारख्या घटकांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.
विविध उदाहरणे, उपक्रम, आकृत्या आणि तक्ते यांच्या माध्यमातून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, कार्यरत शिक्षकांना आणि शैक्षणिक संशोधकांना अध्यापनशास्त्रातील सैद्धांतिक बाबींचा प्रत्यक्ष अध्यापनात उपयोग करता येईल.
विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण करणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि मातृभाषेचा वारसा पुढील पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचविणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. अध्यापन अधिक सर्जनशील, प्रभावी आणि अर्थपूर्ण बनविण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.

1. अध्यापनाचे नियोजन
2. अध्यापनाचे मूल्यमापन
3. अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक आणि आशय
4. मातृभाषा विविध अंगाचे अध्यापन व अध्ययन अनुभूती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर बी.एड. (द्वितीय वर्ष) तृतीय सत्र नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक... तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!