मानवी विकासाचे मानसशास्त्र

Rs. 122.00
Rs. 135.00
Rs. 122.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373449845
Year: 2025
Pages: 88

“मानवी विकासाचे मानसशास्त्र (भाग 1)” हे पुस्तक व्यक्तीच्या जन्मापासून बाल्यावस्थेपर्यंतच्या विकास प्रक्रियेचा सखोल अभ्यास या ग्रंथात केला आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्ती विकासाची विविध अंगे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, नैतिक आणि भाषिक  यांचे विश्लेषण या ग्रंथात केले आहे.
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड, एरिक्सन आणि पियाजे यांच्या विकासाच्या उपपत्तींवर आधारित विचारमंथन वाचकांना व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचा वैज्ञानिक आधार समजावून सांगते. जन्मपूर्व अवस्था, नवजात शिशूंचा विकास, शैशवावस्था आणि बाल्यावस्थेतील शारीरिक, भावनिक व सामाजिक बदल यांचा तपशीलवार अभ्यास या पुस्तकात मांडलेला आहे.
पूर्व व उत्तर बाल्यावस्थेतील पोषण, झोप, आरोग्य, भावनिक समायोजन, पालकांची शैली, ‘स्व’ संकल्पना, मानसिक आरोग्य आणि वर्तनात्मक समस्या यांचा समावेश करून बालकाच्या सर्वांगीण विकासाचा समतोल दृष्टिकोन प्रस्तुत केला आहे.
हे पुस्तक शिक्षण, मानसशास्त्र आणि बालविकास क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तसेच पालक, शिक्षक आणि बालविकास कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरते. मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्याचे सुसंगत आणि शास्त्रीय विश्लेषण करणारा हा ग्रंथ आहे.

1. व्यक्ती विकास
1.1 विकास
1.1.1 प्रस्तावना
1.1.2 व्यक्ती विकासाचा अर्थ
1.1.2.1 विकास व्याख्या
1.1.2.2 विकासाची गुणवैशिष्ट्ये
1.1.3 व्यक्ती विकासाची अंगे
1.1.3.1 शारीरिक व कारक विकास
1.1.3.2 बौद्धिक किंवा मानसिक विकास
1.1.3.3 सामाजिक विकास
1.1.3.4 भावनिक विकास
1.1.3.5 नैतिक विकास
1.1.3.6 भाषिक विकास
1.1.4 व्यक्ती विकासाचे दृष्टिकोन
1.1.5 आयुर्मानात्मक दृष्टिकोन
1.1.6 छेद/छेदात्मक दृष्टिकोन
1.2 विकासाच्या उपपत्ती
1.2.1 सिग्मंड फ्राईड यांची मनोविश्लेषणात्मक विकासाची उपपत्ती
1.2.1.1 मानसिक नियतत्त्ववाद
1.2.2 एरिकसन यांची मनोसामाजिक विकासाची उपपत्ती
1.2.3 पियाजे यांची बोधात्मक विकासाची उपपत्ती
1.3 जन्मपूर्व अवस्था व जन्म
1.3.1 जीवनाची सुरुवात
1.3.2 गर्भधारणेचे महत्त्व
1.3.3 जन्मपूर्व विकासाचा कालखंड
1.3.4 जन्मांचे प्रकार
1.3.5 बहुजन्मता संकल्पना
1.4 नवजातावस्था
1.4.1 नवजातावस्थेचा शारीरिक विकास
1.4.2 नवजातावस्थेची प्रमुख समायोजने
1.5 शैशवावस्था
1.5.1 शैक्षवावस्थेतील शारीरिक विकास
1.5.2 शैक्षवावस्थेतील वाचिक विकास
1.5.3 शैक्षवावस्थेतील भावनिक विकास
1.5.4 शैक्षवावस्थेतील सामाजिक विकास
1.5.6 शैक्षवावस्थेतील बोधात्मक किंवा खेळाबाबतचा विकास
1.6 समारोप

2. पूर्व व उत्तर बालावस्था
2.0 प्रस्तावना
2.1 बाल्यावस्थेचे स्वरूप
2.1.1 पूर्व बाल्यावस्था
2.1.2 पूर्व बाल्यावस्थेचा शारीरिक विकास
2.1.2.1 शरीराची वाढ व बदल
2.1.2.2 पोषण
2.1.2.3 झोपेचा नमुना
2.1.2.4 आरोग्य व सुरक्षा
2.1.3 पूर्व बाल्यावस्थेचा भावनिक विकास
2.1.4 पूर्व बाल्यावस्थेचा सामाजिक विकास
2.1.5 उत्तर बाल्यावस्था
2.1.5.1 उत्तर बाल्यावस्थाचा शारीरिक विकास
2.1.5.2 शरीराची वाढ व बदल
2.1.5.3 पोषण
2.1.5.4 झोपेचा नमुना
2.1.5.5 आरोग्य व सुरक्षा
2.1.6 उत्तर बाल्यावस्था चा भावनिक विकास
2.1.7 उत्तर बाल्यावस्थेचा सामाजिक विकास
2.2 पालकांची शैली व त्यांचे बालकाच्या विकासावरील परिणाम
2.2.1 अधिकृत पालकत्व शैली
2.2.2 हुकूमशाही पालकत्व शैली
2.2.3 परवानगी देणारा
2.2.4 दुर्लक्ष करणारा
2.3 ‌‘स्व‌’ चा विकास
2.3.1 स्व संकल्पना
2.3.2 भावनांचे आकलन
2.3.3 आत्मसन्मान
2.4 बालकाचे मानसिक आरोग्य आणि त्याच्या उपचाराची तंत्रे-
2.4.1 शाळेची भीती
2.4.2 चिंतेचे विकार
2.4.3 बालपणीचे नैराश्य
2.5 बालावस्थेतील वर्तनात्मक समस्या
2.5.1 अंगठा चोखणे
2.5.2 अंथरून ओले करणे
2.5.3 रागाचा झटका येणे
2.5.4 हट्टीपणा
2.5.5 चोरी करणे
2.6 समारोप

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष कला - मानसशास्त्र (सत्र 3) (MIN) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!