कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण

Rs. 356.00
Rs. 395.00
Rs. 356.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373449982
Year: 2026
Pages: 270

आजच्या वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक युगात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. पारंपरिक शिक्षण चौकट मोडून अधिक परिणामकारक, वैयक्तिकृत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणप्रणाली विकसित करण्यामध्ये तिची भूमिका निर्णायक ठरत आहे. या ग्रंथात कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना, तिचा इतिहास, वैशिष्ट्ये, प्रकार आणि शिक्षणातील विविध उपयोगांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
शिक्षणातील डिजिटल परिवर्तन, स्मार्ट वर्गखोल्या, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, चॅटबॉट्स, स्वयंचलित मूल्यमापन प्रणाली यांसारख्या आधुनिक साधनांचा उपयोग करून शिक्षण अधिक प्रभावी कसे बनवता येते, याचे मार्गदर्शन या ग्रंथात दिले आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतांचा विकास, त्यांच्या शिकण्याच्या शैलीनुसार मार्गदर्शन, तसेच शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात सुधारणा करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल, याचा सखोल विचार येथे करण्यात आला आहे.
या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ सैद्धांतिक नसून व्यवहार्य दृष्टिकोनातूनही तयार करण्यात आलेला आहे. शिक्षक, विद्याथ, संशोधक, अभ्यासक्रम रचनाकार आणि धोरणनिर्माते यांना शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. नैतिक व सामाजिक मुद्दे, डेटा गोपनीयता, डिजिटल सुरक्षितता, समान संधी आणि रोजगारावर होणारा परिणाम यांसारख्या संवेदनशील बाबींचाही विचार येथे करण्यात आला आहे.
आजच्या काळात शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा पर्याय नसून आवश्यकता बनली आहे. योग्य पद्धतीने आणि संवेदनशीलतेने याचा वापर केल्यास शिक्षण अधिक परिणामकारक, समावेशक आणि सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकते. या दृष्टीने हा ग्रंथ वाचकांना शिक्षणाच्या नव्या प्रवाहाशी सुसंगत राहण्यास मदत करेल आणि भविष्यातील शैक्षणिक परिवर्तनासाठी मार्गदर्शक ठरेल.

1. कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना
(Artificial Intelligence Concept)
1.1 कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) ओळख व अर्थ
1.2 कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास व विकास
1.3 कृत्रिम बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये व मूलभूत तत्त्वे
1.4 कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रकार
1.5 मशीन लर्निंग, डीप लर्निंग व न्यूरल नेटवर्क
1.6 कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रमुख घटक
1.7 शिक्षणक्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय
1.8 कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वाच्या संज्ञा
1.9 कृत्रिम बुद्धिमत्तेचा समाजावर होणारा प्रभाव
1.10 शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व

2. शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
(The Use of Artificial Intelligence in Education)
2.1 शिक्षणातील डिजिटल परिवर्तन
2.2 अध्यापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
2.3 विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
2.4 स्मार्ट वर्गखोल्या (Smart Classroom)
2.5 कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण प्लॅटफॉर्म
2.6 चॅटबॉट्स व व्हर्च्युअल ट्यूटर
2.7 स्वयंचलित मूल्यमापन प्रणाली
2.8 शिक्षण व्यवस्थापन प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
2.9 शिक्षकांसाठी एआय आधारित सहाय्यक साधने
2.10 ऑनलाइन शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

3. अध्यापन-अधिगम प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व
(The Importance of Artificial Intelligence in the Teaching-Learning Process)
3.1 विद्याथ-केंद्रित शिक्षणात कृत्रिम बुध्दिमत्तेची भूमिका
3.2 वैयक्तिकृत शिक्षण (Personalized Learning)
3.3 अनुकूली शिक्षण प्रणाली (Adaptive Learning)
3.4 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण
3.5 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अध्ययनातील अडचणी ओळखणे
3.6 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढविणे
3.7 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण प्रक्रियेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे
3.8 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात सुधारणा
3.9 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संशोधन आणि नवकल्पना
3.10 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ

4. शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने आणि तंत्रज्ञान
(Artificial Intelligence-Based Tools and Technologies for Education)
4.1 कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शैक्षणिक सॉफ्टवेअर
4.2 शैक्षणिक चॅटबॉट्स
4.3 व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि ऑगमेंटेड रिॲलिटी (AR)
4.4 लर्निंग ॲनालिटिक्स
4.5 स्पीच रिकग्निशन तंत्रज्ञान म्हणजे काय
4.6 नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) म्हणजे काय?
4.7 रोबोटिक्स आणि शिक्षण
4.8 कृत्रिम बुध्दिमत्ता आधारित मूल्यांकन साधने
4.9 ई-लर्निंग प्लॅटफॉर्म
4.10 डिजिटल शिक्षण संसाधने

5. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना नैतिक व सामाजिक मुद्दे
(Ethical and Social Issues in the Use of Artificial Intelligence)
5.1 AI चा नैतिक वापर
5.2 डेटा गोपनीयता व सुरक्षा
5.3 अल्गोरिदममधील पक्षपात (Bias)
5.4 कृत्रिम बुद्धिमत्तेतील शिक्षकांची भूमिका व जबाबदारी
5.5 विद्यार्थ्यांची डिजिटल सुरक्षितता
5.6 कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे रोजगारावर होणारा परिणाम
5.7 कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षणातील समान संधी
5.8 तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर
5.9 कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे
5.10 कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामाजिक परिणाम

6. शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य व संधी
(The Future and Opportunities of Artificial Intelligence in Education)
6.1 भविष्यातील शिक्षण प्रणाली
6.2 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कौशल्य विकास
6.3 शिक्षणातील नवकल्पना
6.4 संशोधनाच्या नवीन दिशा
6.5 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षक प्रशिक्षण
6.6 आजीवन शिक्षण (Lifelong Learning)
6.7 स्मार्ट शिक्षण परिसंस्था
6.8 भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण धोरण
6.9 कृत्रिम बुद्धिमत्ता मूळे भारतातील शिक्षणातील आव्हाने
6.10 कृत्रिम बुद्धिमत्ता मूळे भविष्यकालीन शैक्षणिक परिवर्तने

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!