डॉ. म. ना. वानखडे यांनी जीवनाच्या आणि साहित्याच्या चर्चाविश्वात एका प्रगमनशील सौंदर्याचं नवं युग निर्माण केलं. त्यात रॅशनल नीतीचं वैश्विक सौंदर्य आहे आणि साहित्याच्या सौंदर्याची पुनर्रचनाशील नीती आहे. एवढंच नाही तर त्यांनी उभारलेल्या पायाभूत ज्ञानव्यवहारात या दोन्हींची अविभाज्यताच आपल्या प्रत्ययाला येते.
या क्रांतदर्शी ज्ञानमंथनातून म.ना. वानखडे नावाचा एक अस्सल तत्त्ववेत्ता आपल्याला दिसतो. सर्वसमावेशकता आणि सर्वांचे समान हितसंबंध या पायावर त्यांची सौंदर्यसंकल्पना अधिष्ठित आहे. या बंडखोर प्रज्ञावंतानं जीवन आणि साहित्य या दोन्हींसाठी अनिवार्य तत्त्वज्ञान मांडलं आहे.
या अस्सल प्रज्ञावंताच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा कृतज्ञताग्रंथ निर्माण झाला आहे. या ग्रंथातील प्रत्येकच शब्दावर म.ना. वानखडे हे विशेषनाम कोरलेलं आहे आणि या ग्रंथातील सर्वच शब्दांच्या बेरजेचं नावही कृतज्ञता हेच आहे. हे एका खन्ऱ्याच क्रांतदर्शित्वाला केलेले विनम्र अभिवादन आहे.
'क्रांतदर्शी डॉ.म.ना. वानखडे' हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या अनेक चाहत्यांनी निर्माण केलेला कृतज्ञतेचा दीपस्तंभ आहे. या ग्रंथातून पुढल्या पिढ्यांना म.ना. वानखडे नावाचा गगनभेदी दीपस्तंभ वाचताही येईल, बघताही येईल आणि विश्वासू मार्गदर्शक म्हणून सोबतही घेता येईल.
1. दलित साहित्याचे भाष्यकार ः डॉ.वानखडे - डॉ.भालचंद्र फडके
2. डॉ.वानखडे यांचे अध्यक्षीय भाषण ः एक अन्वय - प्रा.रा.ग.जाधव
3. निळी जखम - प्रा.रा.ग.जाधव
4. ओ कॅप्टन! माय कॅप्टन!! - प्रा.रा.ग.जाधव
5. डॉ.म.ना.वानखडे ः दलित साहित्य चळवळीचे उद्गाते - डॉ.जनार्दन वाघमारे
6. प्राचार्य डॉ.म.ना.वानखडे ः स्मृतीस नमन - प्रभाकर बागले
7. दलित साहित्यातील ज्येष्ठ विचारवंत ः डॉ.वानखडे - अर्जुन डांगळे
8. मिलिंद आणि डॉ.म.ना.वानखडे - डॉ.मनोहर जिलठे
9. माझे आदरणीय प्राचार्य - यशवंत मनोहर, वामन निंबाळकर
10. विद्रोहाचे तत्त्वज्ञानसौंदर्य ः डॉ.म.ना.वानखडे - यशवंत मनोहर
11. आंबेडकरवादी समीक्षक ः म.ना.वानखडे - यशवंत मनोहर
12. डॉ.वानखडे सर ः प्रगल्भ ‘अस्मिता’दर्शक - ज.वि.पवार
13. क्रांतिकारी दलित साहित्यचळवळीचे प्रवर्तक डॉ.म.ना.वानखडे - डॉ.सुरेश वाघमारे
14. साहित्याचे बुद्धिवादी भाष्यकार डॉ.वानखडे - हरीश खंडेराव
15. डॉ.म.ना.वानखडे यांचा साहित्यविचार - डॉ.प्रकाश खरात
16. क्रांतदश साहित्याची प्रेरणा ः डॉ.म.ना.वानखडे - डॉ.वंदना महाजन
17. क्रांतदश विचारवंत ः डॉ.म.ना.वानखडे - डॉ.शैलेंद्र धर्मदास लेंडे
18. वाङ्मयीन विद्रोहाचे उद्गाते ः डॉ.वानखडे - डॉ.मनोहर नाईक
19. ‘मिलिंद’चे नायक डॉ.म.ना.वानखडे - डॉ.मनोहर जाधव
20. डॉ.म.ना.वानखडे ः दलित वाङ्मयीन चळवळीचे द्रष्टे सरसेनापती - डॉ.अनमोल शेंडे
21. दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक - महेंद्र भवरे
22. ‘मिलिंद’ संस्कारातील लढवय्या अधिनायक - युवराज गंगाराम
23. साहित्याकाशातील व्याकूळ मनाची अभिव्यक्ती - डॉ.युवराज सोनटक्के
24. डॉ.म.ना.वानखडे विद्रोही साहित्याचे ऊर्जास्रोत - शशिकांत हिंगोणेकर
25. आंबेडकरवादी साहित्याच्या पार्श्वभूमीचे चिंतनगर्भ भाष्यकार ः डॉ.म.ना.वानखडे - महेंद्र ताजणे
26. आंबेडकरी साहित्यातील विद्रोहाचे उद्घोषक डॉ.म.ना.वानखडे - डॉ.प्रमोद नारायणे
27. डॉ.म.ना.वानखडे यांची सौंदर्यदृष्टी - डॉ.युवराज मानकर
28. आंबेडकरवादी साहित्याचे प्रेरणाबीज डॉ.वानखडे - डॉ.विवेकवर्धन (कोंडबा) हाटकर
29. डॉ.म.ना.वानखडे ः आंबेडकरी साहित्य चळवळीचे घटनाकार - प्रशांत वंजारे
30. विद्रोहाचे शिल्पकार ः डॉ.म.ना.वानखडे - डॉ.विनोद जीवनतारे