किरकोळ विक्री व्यवस्थापन हे पुस्तक विद्यार्थ्यांना किरकोळ विक्री व्यवस्थापनाच्या प्रगत संकल्पना समजावून सांगण्यासाठी तयार केलेले आहे. विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात संकल्पना, उदाहरणे, आकृत्या आणि तक्त्यांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा केला आहे.
पुस्तकात किरकोळ विक्रीचे स्वरूप, मालकीनुसार संस्था, स्टोअर-आधारित धोरण मिश्रण, दुकानाबाहेरील विक्रीचे प्रकार, किरकोळ विपणन मिश्र, वस्तू विक्रीची योजना, मर्चंडायझिंग व किंमतीची संकल्पना, दुकान प्रशासन, व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या आणि ग्राहक सेवा यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे. तसेच किरकोळ विक्री धोरण, शाश्वत स्पर्धात्मक फायदा, धोरणात्मक नियोजन प्रक्रिया आणि किंमत धोरण यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त ठरेल. किरकोळ विक्री व्यवस्थापनातील बदलत्या प्रवाहांची जाणीव करून देण्याचा आणि व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे.