किरकोळ विक्री व्यवस्थापन हे पुस्तक विद्यार्थ्यांना किरकोळ विक्री व्यवस्थापनाच्या मूलभूत संकल्पना सखोलपणे समजावून सांगण्यासाठी तयार केलेले आहे. विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात संकल्पना, उदाहरणे, आकृत्या आणि तक्त्यांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा केला आहे.
पुस्तकात किरकोळ विक्री व्यवस्थापनाची ओळख, किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार, महत्त्व आणि कार्य, वितरण साखळीतील भूमिका, व्यवसाय स्थापनेचे टप्पे, दुकानाचे स्थान, कायदेशीर नोंदणी प्रक्रिया, आराखडा आणि जबाबदाऱ्या यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे. तसेच बदलते प्रवाह, भारतातील किरकोळ विक्री व्यवस्थेची उत्क्रांती, जागतिक व भारतीय किरकोळ विक्रीची सद्यस्थिती, भविष्यातील संधी आणि आव्हाने यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त ठरेल. किरकोळ विक्री व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची जाणीव करून देण्याचा आणि व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे.
1. किरकोळ विक्री व्यवस्थेची तोंड ओळख
(Introduction to Retailing)
1.1 किरकोळ विक्री
1.2 किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार
1.3 किरकोळ विक्रेता किंवा किरकोळ वस्तू विक्री व्यवस्थेची कार्य
1.4 किरकोळ विक्रेत्याचे महत्त्व
1.5 वस्तू वितरण साखळीत किरकोळ विक्रेत्याची भूमिका
2. किरकोळ विक्री व्यवस्थेची रचना
(Retail framework)
2.1 किरकोळ विक्री व्यवसाय स्थापनेचे टप्पे किंवा पायऱ्या
2.2 किरकोळ विक्री दुकानाचे स्थान
2.3 किरकोळ विक्री व्यवसाय नोंदणी करण्यासाठीची कायदेशीर पद्धत
2.4 किरकोळ विक्री भांडार रचना व आराखडा
2.5 दुकान व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या
3. किरकोळ विक्रीतील बदलते प्रवाह
(Trends of retail)
3.1 भारतातील किरकोळ विक्रीचा विकास/उत्क्रांती
3.2 जागतिक किरकोळ विक्री सद्यस्थिती/परिस्थिती
3.3 भारतीय किरकोळ विक्रीची सद्यस्थिती
3.4 भारतातील किरकोळ विक्रीचे भवीतव्य
3.5 भारतातील किरकोळ विक्री विकासासमोरील आव्हाने
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
द्वितीय वर्ष - वाणिज्य (सत्र 3) (OE) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक