'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊ पंचभाई यांच्या कवितेचा आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनाचा जैव अनुबंध चितारलेला आहे.
भाऊ पंचभाई यांच्या सर्वच कवितासंग्रहांना आणि लेखसंग्रहांना यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना या पुस्तकात एकत्र प्रकाशित होत आहेत. शिवाय भाऊंच्या मृत्यूनंतर लिहिलेले दोन लेखही या पुस्तकात आहेत.
'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊंचे जीवन आणि भाऊंचे काव्य यांच्यातील आंतरसंबंध उलगडून दाखविले आहेत. वाचकांना या पुस्तकात भाऊ पंचभाई नावाच्या आकांताची उत्कट गोष्ट ऐकायला येईल...
1. आंबेडकरी कवितेतील गाणारे वादळ
(हुंकार वादळांचे ः 1989)
2. आगीत करुणेचे चांदणे फुलविणारी कविता
(निखाऱ्यांच्या रांगोळ्या ः 2004)
3. रान पेटवणाऱ्या अभंगांच्या ठिणग्या
(अभंगांच्या ठिणग्या ः 2014)
4. भाऊंचा ‘स्पंदनपिसारा’
(स्पंदनपिसारा ः 2014)
5. क्रंदनबनाची भाऊमयता
(क्रंदनबन ः 2016)
6. अश्रूंच्या सरी आणि विद्रोहाच्या विजा
(आकांतगंधा ः 2016)
परिशिष्ट : एक - (मृत्यूलेख)
1. भाऊ पंचभाई ः कवितेने निर्मिलेला कवी
(हस्तक्षेपाचे स्वातंत्र्य आणि सौंदर्य)
2. भाऊ पंचभाई ः ऊर्जेच्या अखंड कारंज्याचे थांबणे...
(आसवांची वेल ः 2025)
परिशिष्ट : दोन - (लेखसंग्रहांच्या प्रस्तावना)
1. आंबेडकरी विचारातील ज्वालांचे लावण्य
(जखमांचा अजिंठा ः 1992)
2 आंबेडकरी साहित्यातील ‘फाइन प्रोझ’
(आंबेडकरी साहित्यातील फाइन प्रोझ ः 1992)