इतिहास अध्यापनशास्त्र (भाग 2)

Rs. 196.00
Rs. 245.00
Rs. 196.00
(-20%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373440286
Year: 2026
Pages: 174

इतिहास अध्यापनशास्त्र हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्याथ, कार्यरत शिक्षक आणि शैक्षणिक संशोधक यांच्यासाठी मार्गदर्शक ठरावे, या उद्देशाने साकारले आहे. इतिहास विषयाचे अध्यापन केवळ माहितीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषण, तर्कशक्ती, सामाजिक जाणीव आणि मूल्यांची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करून अध्यापनाच्या विविध पद्धती, तंत्रे, साधने आणि मूल्यांकन प्रक्रियेची सुस्पष्ट माहिती या पुस्तकात दिली आहे.
अध्यापनशास्त्रातील सैद्धांतिक बाबी आणि त्यांचा प्रत्यक्ष अध्यापनातील उपयोग यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या पुस्तकात दिसून येतो. वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठयोजना, मूल्यनिर्धारण, अभ्यासक्रम सुधारणा, तसेच शिक्षकांचा व्यावसायिक विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण पैलूंवर सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. विविध उदाहरणे, आकृत्या, तक्ते आणि उपक्रमांच्या माध्यमातून विषय अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करणे, राष्ट्रीय भावना जागृत करणे आणि सामाजिक बांधिलकी विकसित करणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. अध्यापन अधिक सर्जनशील, प्रभावी आणि अर्थपूर्ण बनविण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.

1. इतिहास विषय अध्ययन आणि अध्यापनाचे नियोजन
(History Subject – Planning for Learning and Teaching)
2. इतिहास विषय अध्ययनार्थींचे मूल्यनिर्धारण
(Evaluation of History Learners)
3. शालेय स्तरावरील इतिहास व नागरिकशास्त्र
अभ्यासक्रमातील सुधारणा
(Reforms in School-Level History and Civics Curriculum)
4. इतिहास शिक्षकांचा व्यावसायिक विकास
आणि विविध पैलूंचे अध्यापन
(Professional Development of History Teacher
and Teaching of Various Aspects)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर बी.एड. (द्वितीय वर्ष) तृतीय सत्र नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक... तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!