राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार उच्च शिक्षणात बहुविद्याशाखीय व समग्र दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची ओळख करून देणे, माहिती संसाधनांचा योग्य वापर शिकवणे आणि संशोधनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. या ग्रंथात ग्रंथालय सेवा, सुविधा, संशोधन साधने तसेच सामाजिक माध्यमांचा शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उपयोग यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. ओपॅक व वेब ओपॅक सारख्या आधुनिक शोध तंत्रांचा वापर, इलेक्ट्रॉनिक माहिती संसाधनांची ओळख, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याशी निगडित नैतिक मुद्दे यांचा समावेश विद्यार्थ्यांना ज्ञानसमृद्ध बनवतो. ‘ओपन इलेक्ट्रिव्ह’ (OE) स्वरूपात सादर होणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वाचनसाहित्य शोधणे, हाताळणे व त्याचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण देतो. ग्रंथालय व माहितीशास्त्र प्रणाली- हा ग्रंथ विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर व्यावहारिक दृष्टिकोनातूनही सक्षम करतो.
1. ग्रंथालय सेवा
(Library Services)
1.1 ग्रंथ देवघेव सेवा (Library Lending Service)
1.2 संदर्भ सेवा (Reference Service)
1.3 ग्रंथालयातील मुक्त प्रवेश सेवा (Open Access Service)
1.4 वैयक्तिकृत सेवा (Personalized services)
1.5 ग्रंथ राखीव सेवा (Book Reservation Service)
1.6 रेफरल सेवा (Referral Services)
1.7 ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पोर्टल
(Library and Information Science Portal)
1.8 प्रलेख वितरण सेवा (DDS) (Document Delivery Service)
1.9 ओपॅक, वेब ओपॅक इ. वापरून शोध तंत्रे
(Searching techniques using OPAC, Web OPAC etc)
2. ग्रंथालय सुविधा
(Library facilities)
2.1 ग्रंथ देवघेव सुविधा (Book Lending Facility)
2.2 ग्रंथालयात ग्रंथ आरक्षण सुविधा (Book Reservation Facilities)
2.3 आंतर ग्रंथालय देवघेव सुविधा (Inter Library Loan Facility)
2.4 ग्रंथालयात OPAC ची भूमिका
2.5 आंतरजाल/महाजाल (Internet)
2.6 वाचन कक्ष सुविधा (Reading Room Facility)
2.7 पुस्तक पेढी योजना (Book Bank Facilities)
2.8 वापरकर्ता शिक्षण (User Education)
3. ग्रंथालय संशोधन सुविधा
(Library Research Facilities)
3.1 ग्रंथसूची (Bibliography)
3.2 योग्य ग्रंथालय संसाधन निवडणे
(Selecting Right library Resource)
3.3 प्रचलित जागरूकता सेवा (CAS) (Current Awareness Services)
3.4 इलेक्ट्रॉनिक माहिती संसाधने
(Electronic Information Resources)
3.5 माहिती पुनर्प्राप्ती प्रणाली (Information Retrieval System)
4. सामाजिक माध्यमे
(Social Media)
4.1 समाज माध्यमे मूलभूत गोष्टी (Social media Basics)
4.2 सामाजिक माध्यमे अनुप्रयोग/व्यासपीठ
(Social Media Application/Platforms)
4.3 सोशल मीडियाच्या नैतिक चिंता
(Ethical concerns of social media)
4.4 माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000
(Information Technology Act- 2000)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यविद्या आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखाअंतर्गत
प्रथम वर्ष (सत्र 2) (Open Elective) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक