राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणणारे ठरले आहे. या धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय, समग्र व जीवनाशी निगडित शिक्षण मिळावे, हा प्रमुख हेतू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ग्रंथालय व माहितीशास्त्र’ हा विषय Open Elective (OE) स्वरूपात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना ग्रंथालय व माहितीशास्त्राची प्राथमिक ओळख करून देते. ग्रंथालयांचे प्रकार, माहिती साधने व स्त्रोत, शैक्षणिक ग्रंथालयांची रचना व नियम, नीतिशास्त्र, संग्रह व्यवस्थापन, प्रवेश प्रणाली, तसेच मूलभूत व विशेष सेवा या सर्व गोष्टी सोप्या भाषेत मांडल्या आहेत. संदर्भ सेवा, ग्रंथालय अभिमुखता, आंतरग्रंथालय देवघेव, प्रलेखन, भाषांतर, साहित्य शोध आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आधुनिक सेवा यांचा उपयोग विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा पद्धतीने स्पष्ट केला आहे.
‘ग्रंथालय व माहितीशास्त्र प्रणाली’ हा ग्रंथ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता वाचनसंस्कृतीची जाणीव करून देणारा, माहितीच्या शोधकौशल्यांचा विकास करणारा आणि ग्रंथालयीन सेवांचे महत्त्व अधोरेखित करणारा उपयुक्त मार्गदर्शक ठरतो.
1. ग्रंथालयाचा परिचय
(Introduction to Library)
1.1 ग्रंथालयाची मूलतत्त्वे (Basics of a Library)
1.1.1 ग्रंथालयांचे प्रकार (Types of Libraries)
1.1.2 संग्रहावर आधारित ग्रंथालयांचे प्रकार
(Types of libraries based on the Collection)
1.2 माहिती साधने (Information Sources) :
1.2.1 माहिती स्त्रोताचे प्रकार
(Types of Information Sources)
1.3 शैक्षणिक ग्रंथालय (Academic Library) :
1.3.1 ग्रंथालयाचे नियम (Library Rules)
1.3.2 शैक्षणिक ग्रंथपालन शिस्त
(Academic library discipline)
1.3.3 नीतिशास्त्र
1.4 ग्रंथालय संग्रह व्यवस्थापन (Library Collection Management)
1.4.1 ग्रंथालय प्रवेश प्रणाली (Library access systems)
2. ग्रंथालय सेवांचा परिचय
(Introduction to Library Services)
2.1 मूलभूत किंवा अत्यावश्यक सेवा
(Basic or Essential Services)
2.1.1 ग्रंथालय देवघेव सेवा (Library Circulation)
2.1.2 ग्रंथांचे आरक्षण (Reservation of Documents)
2.1.3 आंतर ग्रंथालय देवघेव सेवा
(Inter Library Loan System)
2.1.4 ग्रंथालय आणि ग्रंथालय साधनांच्या वापरात मदत
(Assistance in the Use of Library and Library Tools)
2.1.5 संदर्भ सेवा (Reference Service)
2.1.6 वाचक सल्लागार सेवा (Reader Advisory Service)
2.1.7 ग्रंथालय अभिमुखता (Library Orientation)
2.2 इतर इच्छित सेवा (Other Desirable Services)
2.2.1 प्रचलित जागरूकता सेवा (CAS)
(Current Awareness Service)
2.2.2 साहित्य शोध (Literature Search)
2.2.3 विषय ग्रंथसूची (Subject Bibliography)
2.2.4 प्रतिरूप लेखन सेवा (Reprography Services)
2.2.5 प्रलेख वितरण सेवा (Document Delivery Service)
2.2.6 भाषांतर सेवा (Translation Service)
2.2.7 रेफरल सेवा (Referral Service)
2.2.8 उपयोजकाचे/वाचकांचे प्रशिक्षण (User Training)
2.2.9 माहिती तंत्रज्ञान संबंधित सेवा
(Information Technology (IT) Related Services)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यविद्या आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखाअंतर्गत
प्रथम वर्ष (सत्र 1) (Open Elective) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक