ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाच्या सर्वांगीण अभ्यासासाठी तयार केलेला हा ग्रंथ, यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या बी.लिब., एम.लिब., एम.फिल. तसेच पीएच.डी. (PET) अभ्यासकांसाठी हा एक उपयुक्त आणि विश्वासार्ह संदर्भग्रंथ आहे. तसेच NET/SET व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल.
या ग्रंथामध्ये ग्रंथालय व माहितीशास्त्रातील मूलभूत ते प्रगत संकल्पनांचा सुसंगत आणि सोप्या भाषेत आढावा घेतला आहे. विषयांची मांडणी अभ्यासक्रमानुसार व्यवस्थित करण्यात आलेली असून, प्रत्येक घटक विद्यार्थ्यांच्या समज वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल.
या संचातील दहा पुस्तकांमध्ये पुढील विषयांचा समावेश आहे –
माहिती विज्ञान, ग्रंथालयशास्त्राचा विकास, माहिती स्रोत व संसाधने, ग्रंथालय सेवा व प्रणाली, ज्ञान संघटन, ग्रंथालय व माहिती व्यवस्थापन, संगणक व माहिती तंत्रज्ञान, ग्रंथालय यांत्रिकीकरण व डिजिटायझेशन, संशोधन पद्धती आणि ग्रंथालय व माहिती प्रणाली.
संपूर्ण अभ्यासासाठी एकच विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून हा ग्रंथ विद्यार्थ्यांना नक्कीच यशाच्या दिशेने मार्गदर्शन करेल.