ग्रामविकासाचा दीपस्तंभ : पंचायतराज

Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN:
Year: 2026
Pages: 180

‘ग्रामविकासाचा दीपस्तंभ : पंचायतराज’ हे पुस्तक भारतातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा ऐतिहासिक प्रवाह, सांगोपांग रचना, तात्त्विक पाया आणि समकालीन आव्हाने समजून घेण्यासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरते.
पंचायतराज व्यवस्थेची निर्मिती ही केवळ प्रशासनिक चौकट नसून लोकशाहीचे लोकांपर्यंत पोहोचणारे प्रत्यक्ष रूप आहे. या ग्रंथातून वाचकांना त्रिस्तरीय व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सर्व घटकांचे कार्य, जबाबदाऱ्या आणि निर्णय प्रक्रियेची स्पष्ट ओळख होते.
याशिवाय समकालीन ग्रामीण समस्या, विकास योजना, स्थानिक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची भूमिका आणि सुधारणा दृष्टीकोन यावर आधारित मार्गदर्शन हे पुस्तक व्यवहारात कार्य करणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरते.
जिल्हा प्रशासन, पंचायत कर्मचारी, स्थानिक प्रतिनिधी, विद्याथ, संशोधक आणि ग्रामीण विकासात कार्यरत प्रत्येकासाठी हे पुस्तक ज्ञान, कौशल्य आणि दृष्टी यांचा संतुलित संगम घडवते.

1. पंचायतराज व्यवस्था
(Rural Self Government)
1.1 स्थानिक स्वराज्य संस्था - व्याख्या व अर्थ
1.2 स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार
1.3 ऐतिहासिक पार्श्वभूमी
1.4 स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायतराज व्यवस्था
1.5 केंद्रीय समित्या
1.6 महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था
1.7 73वी घटनादुरुस्ती - तरतूदी, प्रभाव आणि समस्या

2. ग्रामीण प्रशासनाची रचना
(Structure of Rural Administration)
2.1 जिल्हा परिषद
2.2 पंचायत समिती
2.3 ग्रामपंचायत

3. समकालीन ग्रामीण समस्या आणि सुधारणा
(Contemporary Rural Issues and Reforms)
3.1 ग्रामीण विकास कार्यक्रम आणि योजना
3.2 ग्रामीण विकासात पंचायतराज संस्थांची भूमिका
3.3 ग्रामीण प्रशासनासमोरील आव्हाने

पंचायतराज व्यवस्था सक्षम करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी उपयुक्त... तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!