गणित अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक बी.एड. द्वितीय वर्षातील गणित विषयाच्या सर्व घटकांवर आधारित असून शिक्षक प्रशिक्षणाथ, विद्याथ आणि संशोधकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरते. या ग्रंथाचा मुख्य उद्देश म्हणजे गणित विषयाची भीती दूर करून नवनवीन संज्ञा, संकल्पना, अध्यापन पद्धती, तंत्रे व उपागम यांचे सखोल स्पष्टीकरण देत शिक्षकाची अध्यापनदृष्टी विकसित करणे.
या पुस्तकात माध्यमिक स्तरावरील गणिताचा अभ्यासक्रम, अध्यापनाचे उपागम व प्रतिमाने, अध्ययन संसाधने व आयसीटीचा वापर, सर्वांसाठी गणित शिक्षण, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन, शिक्षकाचा व्यावसायिक विकास तसेच अंकगणित, बीजगणित व भूमितीचा मूलभूत आशय यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सक्रिय अध्ययन, ज्ञानरचनावादी उपागम, सहकार्यात्मक अध्ययन पद्धती आणि प्रश्नोत्तर तंत्र यांचा शैक्षणिक उपयोग स्पष्ट करून गणितातील संकल्पना दृढ करण्यावर विशेष भर दिला आहे.
याशिवाय पुस्तकात गणित अध्यापनासाठी आवश्यक असलेली विविध संसाधने, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्याथकेंद्रित अध्यापनाची गरज आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी संशोधनाचे महत्त्व यांचा सखोल विचार केला आहे. उजळणी, सराव, पर्यवेक्षित अभ्यास तंत्र तसेच मूल्यनिर्धारणाच्या विविध पद्धतींचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा कशी साधता येईल याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.
हे पुस्तक विद्याथ, शिक्षक, संशोधक आणि मार्गदर्शकांसाठी उपयुक्त ठरेल. गणित अध्यापन अधिक सुलभ, परीक्षाभिमुख आणि विद्याथ-केंद्रित करण्यासाठी हे पुस्तक एक प्रभावी साधन ठरेल.
1. माध्यमिक शाळा स्तरावर गणिताचा अभ्यासक्रम
(Mathematics Curriculum at Secondary School Level)
अभ्यासक्रम व पाठ्यक्रम : संकल्पना, फरक व शिक्षण प्रक्रियेत उपयुक्तता
शालेय अभ्यासक्रमात गणित विषयाची आवश्यकता व महत्त्व
गणित अभ्यासक्रमाची रचना करतांना विचारात घ्यावयाची तत्त्वे
चांगल्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
अभ्यासक्रम विकासातील आधुनिक प्रवाह व त्यांची शिक्षणक्षेत्रातील उपयुक्तता
गणित अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक गरजा
गणित अभ्यासक्रमातील समकेंद्रीत पद्धती
गणित विषयाच्या पाठ्यक्रमातील घटक पद्धतीची वैशिष्ट्ये
अभ्यासक्रमाचा समग्र विकास आणि त्याचे महत्व
2. गणित अध्यापनाचे उपागम, पद्धती आणि प्रतिमाने
(Approaches, Methods and Models of Teaching Mathematics)
गणित अध्यापनात ‘संकल्पना चित्र उपागमाचा’ विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होणारा परिणाम
संकल्पना चित्रण : संकल्पना, वैशिष्ट्ये, फायदे व मर्यादा
जोड अध्ययन : संकल्पना, वैशिष्ट्ये, फायदे व मर्यादा
गणित अध्यापनातील पृथक्करण पद्धती : फायदे व मर्यादा
संयोजन पद्धती : फायदे आणि तोटे
प्रायोगिक पद्धती : स्वरूप, फायदे, तोटे व शिक्षकाची भूमिका
स्वयंशोधन पद्धती : संकल्पना, स्वरूप व उपयुक्तता
पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान : संकल्पना, उद्दिष्टे व वैशिष्ट्ये
अग्रत संघटक प्रतिमान : संकल्पना, वैशिष्टे, फायदे व तोटे
गाभा घटकाची संकल्पना : शालेय जीवनातील गाभा घटकांचा उपयोग
गणिताद्वारे विद्यार्थ्यांना विकसित होणारी जीवनकौशल्ये
महाराष्ट्र शासनाने शिक्षणात समाविष्ट केलेली मूल्ये
3. अध्ययन संसाधने आणि गणित अध्ययन - अध्यापनासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (ICT)
(Learning Resources and ICT for Mathematics Teaching-Learning)
अध्ययन संसाधने : संकल्पना, प्रकार व शिक्षणातील महत्व
गणित प्रयोगशाळा : संकल्पना, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, फायदे, तोटे व शिक्षणातील उपयोग
पाठ्यपुस्तक : महत्व व वैशिष्ट्ये
खउढ (माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान) : भूमिका व महत्व
अध्यापन प्रक्रियेत वापरली जाणारी अध्ययन साधने
4. सर्वांसाठी शिक्षण
(Mathematics for all)
गणित विषयातील अध्ययनकर्त्यांची बलस्थाने
विद्यार्थ्यांमधील गणितीय कमतरता ओळखण्यासाठी प्रभावी पद्धती
गणित मंडळ : संकल्पना, फायदे व शालेय जीवनातील महत्त्व
गणित मंडळाद्वारे राबविण्यात येणारे उपक्रम
पूरक अध्ययन सामग्रीची गरज
गणितीय खेळांचे शैक्षणिक महत्त्व
गणित स्पर्धां : फायदे, प्रश्नमंजूषा आणि गणित जत्रा.
आकलनासाठी पूरक पाठ्यसामग्रीचा प्रभावी वापर.
गणितातील खेळ, कोडी, कूटप्रश्न आणि तर्कशक्ती यांचे योगदान.
गणित शिक्षणात मनोरंजक उपक्रमांचा वापर.
5. मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन
(Assessment and Evaluation)
मूल्यनिर्धारण : संकल्पना व महत्त्व
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत मूल्यनिर्धारणाचे स्थान व भूमिका
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यामापन : संकल्पना, वैशिष्ट्ये व महत्त्व
आकारिक मूल्यनिर्धारण व संकलित मूल्यनिर्धारण : संकल्पना, वैशिष्ट्ये व तुलनात्मक फरक
संकलित मूल्यनिर्धारण : वैशिष्ट्ये, फायदे व तोटे
सातत्यपूर्ण मूल्यनिर्धारण व सर्वंकष मूल्यनिर्धारण यांतील फरक
मूल्यमापन साधने : आवश्यकता व महत्त्व
विशेष शैक्षणिक गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या गणित शिक्षणाचे मूल्यांकन : पद्धती व मूल्यांकन तंत्र
6. गणित शिक्षकाचा व्यावसायिक विकास
(Professional Development of Mathematics Teacher)
शिक्षकांचा व्यावसायिक विकास : संकल्पना, आवश्यकता, महत्व व विकासासाठीचे उपक्रम
सेवांतर्गत प्रशिक्षण : संकल्पना, उद्दिष्टे, गरज व फायदे
डथजउ विश्लेषण: संकल्पना व विश्लेषणाचे फायदे
चांगल्या गणित शिक्षकाचे गुण.
21 व्या शतकातील गणित शिक्षकाची भूमिका : पारंपरिक शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळेपण
21 व्या शतकातील गणित शिक्षकांकडून अपेक्षित डिजिटल व शैक्षणिक कौशल्ये
गणित शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची भूमिका
7. अंकगणित आणि बीजगणिताचा मूलभूत आशय
(Core Content of Arithmetic and Algebra)
संच : संकल्पना व प्रकार
सांख्यिकी : संकल्पना, वैशिष्ट्ये व उपयोग
मध्यांक : संकल्पना, गुण व दोष
बहुलक : संकल्पना, महत्व व गरज
रेखीय समीकरणाची व्याख्या व रेखीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती
अनुक्रम आणि श्रेणी यातील फरक
घातांकाचा गुणाकाराचा नियम
लॉगॅरिथमची संकल्पना व वैशिष्ट्ये
8. भूमितीचा मूलभूत आशय
(Core Context of Geometry)
भूमितीतील मूलभूत संकल्पना : रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल व समांतर रेषा
बहुभूजाकृती : व्याख्या व संकल्पना
कोन : व्याख्या व कोनांचे प्रकार
त्रिकोणाचे प्रकार
चौकोनांचे प्रकार
त्रिकोणाच्या एकरूपतेच्या व समरूपतेच्या कसोट्या
द्विमितीय आकृत्यांचे क्षेत्रफळ
चौकोनाचे प्रकार क्षेत्रफळ व परिमिती
त्रिकोणमिती
शिक्षणात भूमिती आणि भौमितीक रचनांचा उपयोग
भौमितीक रचना आणि तिचे मुख्य प्रकार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्.च्या
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ