गणित अध्यापनशास्त्र हे पुस्तक नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करून तयार करण्यात आले आहे. गणित हा विषय केवळ संख्यांचा किंवा सूत्रांचा अभ्यास नसून विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता, विश्लेषणात्मक विचार आणि सृजनशीलता विकसित करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे अध्यापन करताना विद्याथकेंद्रित, अनुभवाधारित आणि क्रियाशील पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.
या पुस्तकात वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठयोजना, मूल्यनिर्धारणाच्या विविध पद्धती, अभ्यासक्रमातील सुधारणा, तसेच गणित शिक्षकांचा व्यावसायिक विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा सविस्तर आढावा घेतला आहे. साकारिक व आकारिक मूल्यमापन, आशययुक्त अध्यापन, विषय संरचना, पाठ्यपुस्तकांचे चिकित्सक परीक्षण, तसेच भूमिती, त्रिकोणमिती, सांख्यिकी यांसारख्या घटकांचे अध्यापन यांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.
विविध उदाहरणे, आकृत्या, तक्ते आणि उपक्रमांच्या माध्यमातून विषय अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, कार्यरत शिक्षकांना आणि शिक्षणक्षेत्रातील अभ्यासकांना अध्यापनशास्त्रातील सैद्धांतिक बाबींचा प्रत्यक्ष अध्यापनात उपयोग करता येईल.
विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण करणे, तर्कशक्ती विकसित करणे आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढविणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. अध्यापन अधिक सर्जनशील, प्रभावी आणि अर्थपूर्ण बनविण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.