एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी : आशय, स्वरूप आणि प्रवाह

Rs. 356.00
Rs. 395.00
Rs. 356.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395596848
Year: 2025
Pages: 260

एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीने सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पातळीवर नवे क्षितिज गाठले आहे. ग्रामीण-शहरी वास्तव, जात-लिंग-श्रम यांचे भेद, जागतिकीकरणाचे परिणाम, अस्तित्वाचा संघर्ष आणि आत्मशोधाच्या वाटा यांचे विविधांगी चित्रण या काळातील मराठी कादंबऱ्यांमधून समर्थपणे व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल पाटील यांच्या संपादनाखाली साकारलेला ‘एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी : आशय, स्वरूप आणि प्रवाह’ हा ग्रंथ अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समग्र समीक्षणाचा आदर्श नमुना ठरतो. डॉ. पाटील यांची सर्वसमावेशक दृष्टी, काटेकोर व साक्षेपी निवड आणि विषयाशी सुसंगत अभ्यासकांचा सहभाग या ग्रंथाला संशोधनपर आणि संदर्भात्मक मूल्य बहाल करतो. या कादंबऱ्यांचे विश्लेषण करणारे लेखकही महाराष्ट्र व गोव्यातील विविध विद्यापीठांतील, विविध पिढ्यांचे, भिन्न साहित्यदृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी लेखकमंडळी आहेत. त्यांनी त्यांच्या सामाजिक-राजकीय जाणिवा आणि समीक्षात्मक दृष्टिकोनातून या कादंबऱ्यांचे सखोल वाचन करून अतिशय अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.  
विविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि लिंगविवेकाशी निगडित 24 महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण या ग्रंथात आहे. हा ग्रंथ एकविसाव्या शतकातील कादंबऱ्यांची केवळ समीक्षा नसून समकालीन सामाजिक बदलांचा दस्तऐवज आहे. या सर्व कादंबऱ्यांची निवड आणि विविध समीक्षा दृष्टिकोनांतून साकारलेली त्यावरील चिकित्सक चर्चा एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीचा आशयसंपन्न प्रवास तसेच आशय, स्वरूप व प्रवाह समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.
साहित्य, भाषा व समाजजीवनाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमींसाठी हा ग्रंथ एक महत्त्वाचा संदर्भ ठरेल, यात शंका नाही.

1. अंधाराचे वारसदार : झोपडपट्टीचा वास्तवदश आलेख
- डॉ. संदीप कदम
2. बारोमास
- डॉ. राहुल भालेराव पाटील
3. ग्रामीण वर्तमान वास्तवातील अनेक आयाम उलगडून दाखविणारी कादंबरी : बारोमास
- डॉ. विजय रैवतकर
4. गावठाण
- डॉ. राहुल भालेराव पाटील
5. बाकी शून्य
- डॉ. राहुल भालेराव पाटील
6. ब्र
- ऐश्वर्या बाळकृष्ण शेवाळे
7. चेअरमन
- डॉ. शरद लक्ष्मण नागरे
8. बदलत्या गावगाड्याचे जीवनचित्र : ‌‘पाडा‌’
- तनुजा ढेरे
9. शिक्षणाचा दंश झालेल्या विद्यार्थ्याची संघर्षगाथा : दंश
- डॉ. संजय तुकाराम निचिते
10. दुष्काळाचे भीषण वास्तव : ‌‘पांढर‌’
- डॉ. अमृता डोलकर
11. हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ
- डॉ. संभाजी आ. शिंदे
12. अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
- प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे
13. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट : एका उद्ध्वस्त कुटुंबाची
कहाणी 131
- रेणुका राहुल झांबरे
14. काळेकरडे स्ट्रोकस
- शेफाली दळवी
15. ‌‘निळ्या डोळ्यांची मुलगी‌’ कादंबरीतील आंबेडकरी स्त्रीवाद
- डॉ. मनिषा सदाशिव डोंगरे
16. चकवा : स्त्री जीवनदर्शन
- डॉ. माणिक माधव बागले
17. नदीष्ट
- गौतमी कसवणकर
18. ‌‘प्रतिपश्चंद्र‌’ कादंबरीमध्ये चित्रित शिवनीती : एक अभ्यास
- डॉ. राहुल भालेराव पाटील
19. ओरबिन : गोमंतकीय खाण व्यवसायाचे चित्रण करणारी कादंबरी 184
- सोनल संकेत हळर्णकर
20. ‌‘कोरकोंडा‌’ : कायद्याच्या मार्गाने होणारा संघर्ष
- डॉ. अरुण लाडे
21. शेतकरी चळवळीची ‌‘तसनस‌’ : एक अवलोकन
- डॉ. प्रकाश सूर्यवंशी
22. बुर्गांट : कुटुंबप्रधान कादंबरी
- डॉ. अर्चना एस. काटकर
23. ‌‘उसवण‌’ : पारंपारिक शिंपी व्यावसायिकाच्या जगण्याचा संघर्ष 224
- तनुजा ढेरे
24. उसवण
- प्रतिक्षा खराडे फळे
25. सत्ताकारणाच्या चिखलातही चिवटपणे झुंज देणाऱ्या तरुणाची
अंतर्मुख करायला लावणारी कहाणी : ‌‘झुंड‌’
- डॉ. श्रीकृष्ण वामन पदमणे
26. ‌‘विहिरीची मुलगी‌’: एक आत्मशोध आणि स्त्रीवादी मूल्यांकन
- गौतमी गोकुळ कांबळे

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!