दुःखमुक्त जीवन : बुद्धांची शिकवण

Rs. 167.00
Rs. 185.00
Rs. 167.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN:
Year: 2026
Pages: 120

लेखक भूगोल विषयाचे अनुभवी व ज्येष्ठ प्राध्यापक आहेत. ते सध्या सहयोगी प्राध्यापक म्हणून भूगोल विभाग, स्व. आण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे येथे कार्यरत आहेत. त्यांना अध्यापनाचा तब्बल 25 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे.
डॉ. अहिरे यांनी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 52 संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी विविध विषयांवर 17 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांनी 1 तउठचड लघु शोध अहवाल पूर्ण केला असून, ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील भूगोलाचे मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शक आहेत.
त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना 5 राष्ट्रीय आणि 2 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते केवळ भूगोल विषयाचे जाणकार नसून, बौद्ध तत्त्वज्ञान आणि बुद्ध धम्माचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणींचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्या विचारांना सोप्या, समजण्यास सुलभ आणि जीवनाशी निगडित स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
“दुःखमुक्त जीवन : बुद्धांची शिकवण” या पुस्तकाद्वारे त्यांनी मानवी जीवनातील दुःखाची कारणे, त्यावरील उपाय आणि शांत, संतुलित व समाधानकारक जीवनाचा मार्ग प्रभावीपणे स्पष्ट केला आहे. त्यांच्या लेखनशैलीत साधेपणा, स्पष्टता आणि जीवनोपयोगी विचारांची समृद्धता आढळते, ज्यामुळे वाचकांना विषय सहज समजतो आणि आत्मपरीक्षणाची प्रेरणा मिळते.
डॉ. अहिरे यांचा उद्देश केवळ ज्ञान देणे नसून, वाचकांना आत्मिक शांतता, समाधान आणि योग्य जीवनदृष्टी प्राप्त करून देणे हा आहे.

परिचय
तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे जीवनचरित्र
दुःखाची संकल्पना
चार आर्यसत्ये
दुःखाची कारणे
अष्टांगिक मार्ग
मध्यम मार्ग
अनित्यता, अनात्म आणि करुणा
मनःशांती आणि ध्यान
आधुनिक जीवनातील बुद्ध विचार
दुःखमुक्त जीवनासाठी मार्गदर्शन
सारांश

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!