ज्ञान आणि अभ्यासक्रम

Rs. 405.00
Rs. 450.00
Rs. 405.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789395596992
Year: 2025
Pages: 304

‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’च्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला ‘ज्ञान आणि अभ्यासक्रम’ हा ग्रंथ शिक्षक घडविणाऱ्या बी.एड् अभ्यासक्रमातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शिक्षणाचा उद्देश, मूल्ये, प्रक्रिया व शैक्षणिक तत्त्वज्ञान यांचे सखोल विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. अभ्यासक्रम म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक दस्तऐवज आहे, ही संकल्पना यामध्ये समजावून सांगितली आहे. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमातील परिवर्तन, मूल्याधिष्ठित शिक्षण, मातृभाषेतील अध्यापन, समावेशकता, आणि नव्या शैक्षणिक दृष्टिकोनांवर भर दिला आहे.
राष्ट्रीय धोरणानुसार आवश्यक असलेल्या 21व्या शतकातील कौशल्ये, नैतिक मूल्ये, नवाचार, आणि समजूतदारपणाचा अभ्यासही यात आहे. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांवर न राहता, अभ्यासक्रमाच्या रचनेतील दृष्टीकोन समजून घेणे किती आवश्यक आहे, हे पुस्तक अधोरेखित करते. यामध्ये अभ्यासक्रम विकास, संकलन प्रक्रिया, धोरण निर्मिती आणि शिक्षणातील परिवर्तनशीलतेचे मांडलेले विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते. शैक्षणिक जगतातील अभ्यासक, विद्यार्थी व भावी शिक्षकांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरेल. समकालीन शैक्षणिक विचार व धोरणांच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाचे बहुआयामी भान देणारा हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त आहे.

1. शिक्षणाचा ज्ञानशास्त्रीय आणि सामाजिक आधार
ज्ञान - अर्थ, स्वरूप
ज्ञानाची उत्पत्ती
ज्ञानाचे महत्त्व
ज्ञानाची रचना
ज्ञानाचे प्रकार - सर्वसामान्य
आधुनिक शिक्षणशास्त्रातील संज्ञान सिद्धांतांवर (Cognitive Theories) आधारित ज्ञानाचे प्रकार
ज्ञान व्यवस्थापन (Knowledge Management) नुसार ज्ञानाचे प्रकार
ज्ञानाचे स्रोत
तत्त्वज्ञानांच्या आणि मानवी अनुभूतींच्या अभ्यासानुसार - ज्ञानाचे स्रोत
ज्ञान निर्मितीची प्रक्रिया
जीन पियाजे, जेरोम ब्रुनर आणि वायगोत्स्की यांनी दिलेली ज्ञान निर्मितीची प्रक्रिया
वैज्ञानिक पद्धती - अर्थ, स्वरूप, पायऱ्या आणि वैशिष्ट्ये

2. शिक्षणाचा सामाजिक आधार
ज्ञान प्रसारणामध्ये जाणकाराची भूमिका
ज्ञान रचनांमध्ये जाणकाराची भूमिका
ज्ञानकेंद्रित समाजाची संकल्पना आणि अर्थ
ज्ञानकेंद्रित समाजाचे स्वरूप
संस्कृती - अर्थ, घटक, स्वरूप आणि महत्त्व
आधुनिकता - संकल्पना आणि महत्त्व
भारतीय संविधानातील मूल्ये

3. भारतीय संविधान आणि मूल्ये

भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्यांचे शैक्षणिक परिणाम
समता आणि समानता - अर्थ आणि शैक्षणिक परिणाम
वैयक्तीक संधी - अर्थ आणि शैक्षणिक परिणाम
सामाजिक न्याय - अर्थ आणि शैक्षणिक परिणाम
प्रतिष्ठा - अर्थ आणि शैक्षणिक परिणाम
लोकशाही - अर्थ आणि शैक्षणिक परिणाम

4. शिक्षणातील बदल आणि अभ्यासक्रम
बहुसांस्कृतिकता - अर्थ, फायदे, तोटे
राष्ट्रवाद - अर्थ, फायदे, तोटे
सार्वत्रिकता - अर्थ, फायदे, तोटे
धर्मनिरपेक्षता - अर्थ, फायदे, तोटे
बहुभाषिकता - अर्थ, फायदे, तोटे
आयसीटीमधील प्रगती आणि शिक्षणातील बदल
शैक्षणिक मानसशास्त्रातील नवीन ट्रेंड आणि शिक्षणातील बदल

5. अभ्यासक्रम
अभ्यासक्रम - अर्थ
अभ्यासक्रमाचे स्वरूप
अभ्यासक्रमाचे परिमाण आणि शिक्षणाच्या उद्दिष्टांशी त्यांचा संबंध
अभ्यासक्रमाचे प्रकार
अभ्यासक्रम विकासाची तत्त्वे
अभ्यासक्रम विकासाचे दृष्टिकोन
अभ्यासक्रम विकास दृष्टिकोनांचे महत्त्व
पाठ्यक्रम (Syllabus) - अर्थ
पाठ्यक्रम रचनेच्या विविध पद्धती
पाठ्यपुस्तक (Textbook)
पाठ्यपुस्तक (Textbook) चिकित्सक परीक्षण
अभ्यासक्रम, पाठ्यक्रम (Syllabus) आणि पाठ्यपुस्तक यांच्यातील परस्पर संबंध
अभ्यासक्रम विकास, पाठ्यपुस्तक तयारी आणि संशोधनात विविध संस्थांची भूमिका
अभ्यासक्रम विकासाची प्रक्रिया
अभ्यासक्रम विकासाचे निर्धारक

6. अभ्यासक्रम फ्रेमवर्क
अभ्यासक्रम चौकट (Curriculum Framework) - अर्थ
अभ्यासक्रम चौकटीची (Framework) गरज
अभ्यासक्रम चौकट, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांच्यातील फरक
अभ्यासक्रम चौकट, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांचे शालेय शिक्षणातील महत्त्व
राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट - 2005 (NCF-2005) पार्श्वभूमी, तत्त्वे, घटक, वैशिष्ट्ये आणि परिणाम
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण चौकट - 2014 (NCFTE - 2014) - पार्श्वभूमी, उद्दिष्टे, घटक, महत्त्व, वैशिष्टे आणि परिणाम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 (NEP 2020) - पार्श्वभूमी, उद्दिष्टे, घटक, महत्त्व
NEP 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेल्या अभ्यासक्रमाचे पैलू

7. अभ्यासक्रमाचे विविध दृष्टिकोन
अभ्यासक्रमातील घटक
अभ्यासक्रम तयार करण्यात राष्ट्राची भूमिका
अभ्यासक्रम तयार करण्यात राज्याची भूमिका
अभ्यासक्रम तयार करण्यात शिक्षकाची भूमिका
अभ्यासक्रम तयार करण्यात विद्यार्थ्याची भूमिका
अभ्यासक्रम विकासाचा विषयकेंद्रित दृष्टिकोन आणि शिक्षणातील योगदान
अभ्यासक्रम विकासाचा विद्याथकेंद्रित दृष्टिकोन आणि शिक्षणातील योगदान
अभ्यासक्रम विकासाचा समुदायकेंद्रित दृष्टिकोन आणि शिक्षणातील योगदान
अभ्यासक्रम विकासाचा मूलभूत संकल्पनांचे आयोजन दृष्टिकोन आणि शिक्षणातील योगदान
अभ्यासक्रम विकासाचा शिक्षण परिस्थितीची निवड आणि संघटन दृष्टिकोन आणि शिक्षणातील योगदान

8. अभ्यासक्रम विकासाचे मॉडेल
टायलर & टायलर अभ्यासक्रम विकासाचे मॉडेल
हिल्डा ताबा अभ्यासक्रम विकासाचे मॉडेल
सायलर आणि अलेक्झांडर अभ्यासक्रम विकासाचे मॉडेल
निकोल्स आणि निकोल्स अभ्यासक्रम विकासाचे चक्रीय मॉडेल

9. अभ्यासक्रम संशोधन
अध्ययन उद्दिष्टांच्या चाचणी साठी विकसित होत असलेली मूल्यांकन पध्दती
अभ्यासक्रम मूल्यांकन आणि नूतनीकरणाची प्रक्रिया
अभ्यासक्रमाचे सतत मूल्यांकन करण्याची आवश्यकता
अभ्यासक्रम मूल्यांकन आणि नूतनीकरणाची प्रक्रियामध्ये विद्याथ, शिक्षक, समुदाय आणि प्रशासक यांच्याकडून अभिप्राय
अभ्यासक्रम संशोधन - संकल्पना, महत्त्व, उद्दिष्टे, प्रक्रिया आणि आव्हाने

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी नविन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक महत्त्वाच्या संकल्पना/वस्तुनिष्ठ स्वरूपातील मुद्यांसह...

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!