ज्ञान आणि अभ्यासक्रम

Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373446929
Year: 2026
Pages: 94

शिक्षणशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा सखोल अभ्यास करणारा हा संदर्भग्रंथ विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संशोधकांना उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर शिक्षणातील बदल, अभ्यासक्रमाची पुनर्रचना, ज्ञानाचे स्वरूप आणि त्याचे संप्रेषण यांचा स्पष्ट व सुसंगत आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. ज्ञानाचे स्वरूप, प्रकार आणि निर्मिती प्रक्रिया, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, तत्त्वे, घटक, नियोजन व अंमलबजावणी यांचा सखोल अभ्यास, सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक व तांत्रिक घटकांचा प्रभाव, भाषा संपादन, वर्गातील भाषा आणि बहुभाषिक शिक्षणातील आव्हाने व उपाययोजना यांचा समावेश या ग्रंथात आहे. सोपी, स्पष्ट आणि विद्यार्थ्याभिमुख भाषा ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये असून वाचकांना शैक्षणिक यशाबरोबरच विचारशील व जबाबदार नागरिकत्वाकडे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य यात आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाची व्याप्ती सतत बदलत आहे. अशा परिस्थितीत हा ग्रंथ वाचकांना शिक्षणाच्या व्यापक संदर्भाचे आकलन करून देतो आणि त्यांना नव्या शैक्षणिक प्रवाहाशी सुसंगत राहण्यास मदत करतो. वाचकांच्या सूचनांचे स्वागत करून पुढील आवृत्त्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

1. शिक्षणाचा ज्ञानशास्त्रीय आणि सामाजिक आधार
(Epistemological and Social Basis of Education)
ज्ञान
माहिती
ज्ञान रचना
ज्ञानाचे प्रकार : स्पष्ट, अस्पष्ट आणि आसक्त ज्ञान
ज्ञान, माहिती प्राप्त करण्याचे मार्ग
वैज्ञानिक पद्धत
वैज्ञानिक पद्धतीचे टप्पे
वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्ये

2. शिक्ष्ाणातील ज्ञानाचा आधार
(Evolving Knowledge Base in Education)
शिक्षणामध्ये ज्ञानाच्या आधाराची उत्पत्ती
ज्ञान संपादणाची प्रक्रिया
ज्ञान संपादणाच्या विविध पद्धती
ज्ञान निर्मिती
ज्ञान, संप्रेषण आणि ज्ञानाच्या निर्मितीत जाणकारांची भूमिका
ज्ञानाचे पैलू
ज्ञानाचे विविध पैलू आणि त्यांचा संबंध

3. अभ्यासक्रम फ्रेमवर्क
(Curriculum Framework)
अभ्यासक्रम चौकट : संकल्पना आणि आवश्यकता
पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक माहिती
शालेय शिक्षणात पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तकाचे महत्त्व
NEP-2020 मध्ये पाठ्यक्रमाचे घटक
NCF-2005 चे प्रमुख वैशिष्ट्ये आणि परिणाम
NCFTE-2014 चे प्रमुख वैशिष्ट्ये आणि परिणाम

4. अभ्यासक्रम प्रतिबद्धता
(Curriculum Engagement)
पाठ्यक्रम निर्मिती
पाठ्यक्रमातील घटक
पाठ्यक्रम तयार करण्यामध्ये राष्ट्र, राज्य, शिक्षक
आणि विद्यार्थ्यांची भूमिका
पाठ्यक्रम विकासाच्या पद्धती
पाठ्यक्रम रचना आणि संघटनांच्या प्रमुख पद्धती
पाठ्यक्रम विकासाचे मॉडेल
पाठ्यक्रम मूल्यांकन पद्धती
ज्ञान आणि कौशल्य यामधील फरक
अध्यापन आणि प्रशिक्षण यामधील फरक
ज्ञान आणि माहिती यामधील फरक
उपक्रम - संकल्पना, गरज आणि महत्त्व
शिक्षणात शोध आणि संवाद

5. शिक्षणाचे सामाजिक आधार
(Social Foundations of Education)
ज्ञानकेंद्रित समाजाची संकल्पना, अर्थ आणि स्वरूप
संस्कृती आणि आधुनिकतेची संकल्पना
संस्कृती आणि आधुनिकतेमधील परस्पर संबंध
भारतीय संविधानिक मूल्ये आणि शिक्षण
शिक्षण आणि संविधानिक मूल्ये यांचा संबंध
संविधानिक मूल्ये - शिक्षणातील महत्त्व
आयसीटी आणि शैक्षणिक मानसशास्त्रातील प्रगतीमुळे
शिक्षणातील बदलांचे समर्थन

6. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आणि नूतनीकरण
(Curriculum Implementation and Renewal)
अभ्यासक्रम निर्मितीत शिक्षकाची भूमिका
शिक्षण संसाधनांची निवड, विकास आणि अंमलबजावणी
अध्ययन उद्दिष्टांच्या चाचणीसाठी मूल्यांकन पद्धती विकसित करणे
अभ्यासक्रम मूल्यमापन आणि नूतनीकरणाची प्रक्रिया
अभ्यासक्रमावर संशोधन

7. भाषेचे संपादन
(Acquisition of Language)
भाषा संपादनामध्ये मेंदूची कार्ये
समाजीकरणात भाषेची भूमिका
व्यक्तीच्या जीवनात मातृभाषेचे स्थान आणि महत्त्व
मौखिक बुद्धिमत्ता आणि संबंधित क्रियाकलापांचा विकास
मौखिक बुद्धिमत्ता विकासाची फायदे
व्यक्तिमत्व विकासात भाषेचे स्थान
भाषेवर ICT चा प्रभाव
मातृभाषेवर इंग्रजीचा प्रभाव
बहुभाषिक वर्गातील समस्या
बहुभाषिक वर्गातील समस्यांवर उपाययोजना

8. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वर्गातील भाषा
(Classroom Languages of the Teacher and Student)
वर्गातील परिस्थितीत शिक्षकांचे शिष्टाचार आणि शिष्टाचारांचा वापर
वर्गामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षकाकडून कौतुक
जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये विद्यार्थ्याची विनम्र अभिव्यक्ती
भाषणाचे अवयव

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व एन.सी.टी.ई.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!